पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. सुख पावले ॥१२॥ तो उपदेश कोण ह्मणसी । जे वियोग चित्तविषयांसी । हे म्यां सांगोनियां त्यांसी । आत्माभ्यासी लाविले ॥ ६३ ॥ मन जेथे जेथें जाये । तेथें तेथें वस्तूचि आहे। येणे अभ्यासें लवलाहें । सनकादिक पाहे सिद्ध झाले ॥६४॥ चित्तासी विषयांचा वियोगू । हा सनकादिकी साधिला योगू । त्यांसी उपदेशावया सांगू । मी स्वयें श्रीरगू उपदेष्टा ।। ६५ ॥ तें ऐकोनि उद्धव पाहीं। विचारी आपुलिया ठायीं। मी श्रीकृष्णावेगळा काहीं नाहीं । सनकादिक कंही उपदेशिले ॥ ६६ ॥ सनकादिक ब्रह्मशीळ । पूर्वी जाहले बहुकाळ । कृष्ण ये काळींचें देवकीवाळ । गुरुत्व केवळ घडे कैसें ॥ ६७ ॥ * उध उवाच ॥ यदा व सनकादिभ्यो येन रूपेण फेशव । योगमादिष्टयानेतद्रूपमिच्छामि चेवितुम् ॥ १५ ॥ उद्धव ह्मणे गा केशवा । सनकादिकांसी केव्हां । उपदेश केला गा तुवां । जवळी तेव्हां मी को नव्हतों ।। ६८ ॥ येणेचि रूपें हपीकेशी । योग सांगितला तयांसी। किवा रूपांतरें ह्मणसी । ते जाणावयासी मज इच्छा ।। ६९ ॥ कोण काळ समयो कोण । कोण योग कैसा प्रश्न । ते कृपा करोनि आपण । मज संपूर्ण सांगावे ॥ २७० ॥ ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । कृ कळवळला नारायण । हंसइतिहासनिरूपण । आपुलें आपण सांगत ॥७१ ॥ श्रीभगवानुवाच ॥ पुना हिरण्यगर्भस्य मानसा सनकादय । पप्रच्छु पितर सूक्ष्मा योगस्यैकान्तिकी गतिम् ॥१६॥ ब्रह्मयाचे मानसपुत्र । महाप्रसिद्ध सनत्कुमार । तिहीं सत्यलोकी प्रश्न थोर । अतिर्दुस्तर पूशिला ॥ ७२ ॥ अतिसूक्ष्म योगगती । दुर्जेय स्वस्वरूपस्थिती । परम कठिण प्रश्नोक्ती । पित्याप्रती पूशिली ॥ ७३ ॥ सनकादय ऊचु ॥ गुणेष्वाविशते चेतो गुणाशेतसि च प्रभो । कथमन्योन्यसत्यागो मुमुक्षोरतिसिती ॥१७॥ सनकादिक पुसत । विषयांच्या ठायीं चित्त । स्वभावे असे विषयासक्त । ते विषयी सतत आवेशले ।। ७४ ॥ तैसेचि विषय पाही । प्रवेशले चित्ताच्या ठायीं । वासनारूमें जडले तेही । निघों कहीं नेणती ॥ ७५॥ फळ काळ दोनी नाहीं । तरी तेचे आवे गोड पाही । ऐसे विषय चित्ताचे ठायीं । रिघाले कहीं न निघती ॥ ७६ ॥ पगिली काता माहेरा जाये। चित्ती रिघाली दूरी न राहे । यापरी विषयो पाहें । जडला ठाये चित्तासी ॥ ७७ ॥ चित्त विपयो अन्योन्यत्यागू । मुमुक्षा केवी घडे चांगू। ये उपायी उपाययोग । स्वामीने सागू सागावा ॥ ७८ ॥ ॥ श्रीभगवानुवाच ॥ एव पृष्टो महादेव स्वयभूर्भूतभावन । ध्यायमान. प्रश्नबीज नाभ्यपधत कर्मघी ॥ १८ ॥ __ ज्यासी अग्रपूजेचा.सन्मान । श्रेष्ठ देवांमाजी महिमान । महादेव ह्मणावया कारण । ब्रयासी जाण या हेतू ।। ७९ ॥ जो आगें जी चराचर । जो वेदांचे निजमंदिर । त्या ब्रयामति अतिगंभीर । प्रश्न महाथोर पुत्री केला ॥२८०॥ त्या प्रश्नाची प्रश्नोत्तरविधी। ब्रह्मासी न कळे त्रिशुद्धी । कर्मजड झाली बुद्धी । चोधकसिद्धी स्फुरेना ॥ ८१ ॥ प्रश्न अत्यत सखोल पडिला । तेणे ब्रह्मा वेडावला ठेला काही न बोलवे जी बोला । तो चिंतू । १चित्त व विषय यात्री गाठ पडू देऊ नका हाच उपदेश २ ग्रामस्वरूप ३ ब्रह्मनिष्ठ ४ काय ५ दुसन्या रूपाने ६ हसाची क्या ७ मनापासून उत्सम झालेले, अयोनिज ८ फार कठिण ५ विषयात गुतलेले १० चित्त खाभाविक प्रेमामुळे विषयात शिरते व विषय चासनारूपाने चित्तात शिरतात ११ केव्हाही १२ विवाहित १३ जडून राहता १४ मुख्य पूजेचा १५ उत्साप्त करितो १६ निखालस