Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. ३५५ सेवन ॥ ५० ॥ सात्विक पदार्थ सेविता । सत्ववृद्धि होय सर्वथा । सत्वविजयें वर्ततां । पवित्रता जीवाची ।। ५१ ॥ सत्वउत्कर्षाचे लक्षण । धर्मनिष्ठा स्वधर्माचरण । तैसें तेथील वासनाबंधन । इहामुत्र जाण पाछीना ॥५२॥ झालिया शुद्ध अतःकरण । तेव्हां निःसीम पाढे सत्वगुण । पुरुपासी मद्भक्तिलक्षण । धर्म जाण उपतिष्ठे ॥ ५३ ॥ सत्व वाढल्या धर्मप्रवृत्ती । तें गुरुभजनी अतिप्रीती ।' का सत्वचिग्रही माझी मूर्ती । ते ठायीं भक्ती उल्हासे ।। ५४ ॥ कायिक वाचिक मानसिक । मदर्पण करी स्वाभाविक । मजवेगळा आणिक | भावार्थ देख स्फुरेना ॥ ५५॥ गुरु भगवंत अभिन्न । है ते काळी प्रकटे चिह्न । ते अतिसत्वाची चोळखण । हे धर्म पूर्ण सात्विक ॥ ५६ ॥ ___धर्मो रजतमो हन्यात् सत्यवृदिरनुत्तम ! आशु नश्यनि सन्मूलो यधर्म उगये हते ॥३॥ ऐसा वाढलिया सात्विक धर्म । ते सत्ववृद्धि सर्वोत्तम । जे सत्वी प्रकटे पुरुषोत्तम । विश्रामधाम मुमुक्षा ।। ५७॥ एवं सत्ववृत्ती वाढला धर्म । तो तत्काळ नाशी अधर्म । अधर्माचें मूळ रजतम । त्याचे रूपनाम उरी नेदी ।। ५८ । सात्विकसेयने सत्ववृद्धी । तेणे सेद्विद्येची उपलब्धी हे उपायाची विधानविधी । कृष्ण कृपानिधी वोलिला ॥५॥ करावें सात्विकसेवन । ते सात्विक पदार्थ कोण कोण । ऐक त्याचेही निरूपण । दर्शलक्षण सागेन ।। ६०॥ आगमोऽप प्रजा देश काल कर्म च जन्म च । ध्यान मन्त्रोऽथ मस्कारो दशैते गुणहेतय ॥४॥ . गुणवृद्धीचे कारण । आगम माणिजे शास्त्र जाण । आप मणिजे ते जीवन । आवइतें स्थान तो देश ॥ ६१ ॥ ऐक प्रजाचें विदीन । प्रजा हणिजे त्रिविध जन । जैशी ज्याची सगती जाण । तैसे लक्षण तो पावे ॥ १२ ॥ काळ हणिजे दिवसभाग । कर्म हणिजे जे करी अग । जन्म ह्माणिजे दीक्षा साग । मत्राचे लिंग यथारूचि ॥ १३ ॥ काचा जेथ अत्यादरू । त्या नाच वोलिजे सस्कारू । हा दशलक्षणमकारू । गुणवृद्धिविचारू तो ऐक ॥४॥ येथ सत्ववृद्धीसी प्रस्तुत । साधकांसी शास्त्र निवृत्त । उपनिषद्भागेंसी वेदात । त्याचा मथितार्थ सेवावा ।। ६५ ॥ आप ह्मणिजे जळपवित्रता । गौतमीभागीरथ्यादि पुण्यसरिता । ज्याचा अवचटे शिंतोडा लागता । पाप सर्वथा उरेना ॥६६॥ का माझ्या प्रतिमाचे चरणामृत । ज्यालागी ब्रह्मादिक आर्तभूत । किवा शालिग्रामशिळेचें तीर्घ । सकळ दुरित निवारी ॥६॥ जेणे सकळ तीर्थ होती पावन । तें ब्राह्मणाचे चरणतीर्थ जाण । स्वयें वदी श्रीनारायण । निजहृदयी चरण वाहतसे ॥६८॥ भैलतेसे हो का पाणी । में लागलें सद्गुरुचरणी । ते सकळ तीर्थी शिरोमणी सेविता तत्क्षणी उद्धरी ॥६॥ सत्ववृद्धीचे कारण आप । तें इये तीर्थी जाण पुण्यरूप । सेविता सलवृद्धीचे स्वरूप । आआप प्रकाशे ॥७॥ मजा हणिजे महाजन । सेवावे साधु निवृत्त जन । ज्याचे सगतीस्तव जाण । उद्धरण जडजीवां ।। ७१ ॥ सत्ववृद्धीसी कारण । मुख्यत्वे सत्सगतीचि जाण । त्या सत्सगाचे महिमान । केले निरूपण द्वादशी ।। ७२ ॥ देश पुण्यभूमिका सिद्धिस्थळ । १ सत्वबुद्धि २ सत्वगुणाच्या वादण्याने ३ या आणि परलोकातील विषय ४ अमर्याद ५ मास होतो ६ मला मर्पण ७ भासत नाही ८ विसाव्याची जागा ९ तस्त्रज्ञानाची १. दहा लक्षणे ११ उदक १२ लक्षण, विवरण ११ चाग. १४ फार आदर १५ निवृत्तिार वेदातशास्त्र १६ पविन नया १७ सहजी १८ लाळ घोटतात १९भापल्या वक्षस्थळावर. २० कोणतेही २१ सजन. २२ पुण्यभूमि नैमिषारण्यादि २३ सत्पुरुषानों प्रतिष्ठित स्थल