________________
.. . ३५४ एकनाथी भागवत. उद्धवाचे जीवीचा भावों । सखोल हृदयींचा अभिप्रावो । सकळ आकळोनियां सद्भावो । स्वयें श्रीकृष्णदेवो बोलत ॥ २७ ॥ ह्मणसी लागोनि सूत्र त्रिगुण । जीवासी आले जीवपण । ते अगी असतां तीनी गुण । सद्विद्या जाण उपजेना ॥ २८ ॥ तोंडीचा खिळू नन्हता दूरी । नारेळजळ न चढे करीं । तेवीं गुण न वचतां निर्धारी । विद्या कैगापरी उप. जेल ॥ २९ ॥ ऐसा आशंकेचा भावो । जाणोनियां श्रीवासुदेवो । तिही श्लोकीं तो पहा हो । गूढाभिप्रावो निरसितू ॥३०॥ ॥ श्रीभगवानुवाच ॥ सत्व रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मन । सत्येनान्यतमो हन्यारसत्व सत्वेन चैव हि ॥१॥ · सत्वरजतमादि गुण । निश्चयेंसी मायेचे जाण । हैं द्वादशाध्यायीं निरूपण । तुज म्यां सपूर्ण सांगीतले ॥ ३१॥ सच्चिदानंदू जो येथ । आत्म्यासी अभिन्न नित्य । तैसे गुण नव्हती समस्त । ते प्राकृत प्रकृतिकायें ॥ ३२ ॥ जे सद तेंचि चिद । जे चिद तोचि आनंद । स्वरूपी नाही विविध भेद । तें एकवद सच्चिदानंद ॥ ३३ ॥ जेवीं श्वेतता मृदु मधुर । त्रिविध भेदें एक साखर । तेवीं सच्चिदानंद अविकार । वस्तु साकार एकवद ॥३४॥ प्रकृति गुणांतें उपजविती । गुणांस्तव सेवळ प्रकृती । गुणांसी आत्म्यासी सगती । न घडे कल्पांती उद्धवा ॥ ३५ ॥ येथ विद्याउत्पत्तिलक्षण । स्वयें सांगे नारायण । करूनि गुणे गुणांचे मर्दन । सद्विद्या जाण साधावी ॥३६॥ सत्व वाढवून सुरवाडें । जै रज तम निःशेष झडे । तै सद्विद्या हाता चढे । सत्वाची बाढी मोडे निर्जसत्वेकरूनी ॥ ३७॥ सर्प लागला होय ज्यासी । विप खादल्या उतार त्यासी । तें विष खाता येरे दिशीं । आत्मघातासी वाढवी ॥ ३८ ॥ तैसे रजतमलोपें सत्व वाढे । वाढले सत्व वाधकत्वे कुडें । तेही बाधा मी तुजपुढें । अतिनिवाडे सागेन ॥ ३९ ॥ मी अलिप्त कर्मकार्या । मी ज्ञाता मी महासुखिया । ऐशा वाढवूनि अभिप्राया । गुणे गुणकार्या गोविजे सत्वे ॥ ४० ॥ ऐसा वाढला जो सत्वगुण । त्यासी उपशमात्मक निजसत्वे जाण । समूळ करावे निर्दळण । ते समाधान पाविजे ॥४१॥ उद्धचा तूं ऐसे लणसी । समानता तिहीं गुणासी । केवीं वाढी होईल सत्वासी । गुण गुणासी राखण ॥ ४२ ॥ वाढल्या तमोगुण । नावडे तेव्हां ज्ञानध्यान | नावडे त्याग भोग चंदन । निद्रा दारुण का कलहो॥४३॥ वाढल्या रजोगुण । ऐकता ज्ञाननिरूपण । त्याचे भोगासक्त मन । सदा ध्यान विषयाचें ॥४४॥ धनलोभ सुंदल्या. दिठी । पापरी घेतल्या क्रोध नुठी। हे रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटी स्खीपुत्रां ॥४५॥ वाढलिया सत्वगुण । स्त्रियादिभोगी उदासीन । सदा करी भगवचिंतन । कां करी कीर्तन हरिभक्ती ॥ ४६॥ क्रोधलोभमोहलक्षण । सत्वकाळी नुठे जाण । परी एकला केवीं वाढे सत्वगुण । गुणांसी राखण गुण होती ॥४७॥ मागें तम पुढे रज पूर्ण । मध्ये अडकला सत्वगुण । तो कैसेनि पाढेल जाण । अडकलेपण सुबद्ध ॥४८॥ ऐशी आशंका धरूनि जाण । ह्मणसी वाढेना सत्वगुण । तें सत्ववृद्धीचे लक्षण । ऐक संपूर्ण सागेन ॥४९॥ सवादो भवेद्वद्धाधुसो मद्भतिरक्षण । सात्विकोपासया सत्व ततो धर्म प्रपतते ॥ २ ॥ ये श्लोकीचे निरूपण । पहिले उत्तरार्धव्याख्यान । तेथें सत्ववृद्धीचे कारण । सात्विक महाविया २ नारयाच्या तोंडावरची सीळ ३जाता ४ एक्वटपणाने ५बलान्य ६आवेशाने ७खरूपयोधा ८ सपदद्या विष पिपसाजन उतरते,पण ते विष दुसन्या वेळी सेविलें असताटार करिते ९भातल्या. १० पाहणा ११ जाती, प्रकार, - - - - -