Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/368

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. विजनवासू एकांतशीळ । जेथ वैसंतांचि तत्काळ । सत्वासी वळ चढोवढी ॥७३॥ एकांती स्थिरावल्या आसन । सहजें वाडे सत्वगुण । मनी हव्यासू चढतां जाण । वस्तु चिद्धन साधावया ॥७४ ॥ साधकांसी काळ यथोचित । अवश्य ब्राह्ममुहूर्त । का जे काळी उद्धेगरहित । हर्षयुक्त मन होय ॥ ७५ ॥ प्रेमयुक्त अतःकरणे । जो काळ जाय कथाश्रवणें । कां जयंत्यादि महापूजा करणें । जागरणे हरिदिनीं ॥ ७६ ॥ थोर काळाची सार्थकता । हरिकीर्तनीं गाता नाचतां, । त्या काळाचा महिमा तत्त्वतां । माझेन, सर्वथा न बोलवे ॥ ७७ ॥ निरभिमान कीर्तन करणे । निर्लोभ गाणे नाचणे । तो कालू वंदिजे म्यां श्रीकृष्णें । महिमा कोणें वोलावा ॥ ७८॥ कर्म हणिजे ते निवृत्त । जे आशापाशफळरहित । का क्रिया जे उपकारार्थ । सात्विक निश्चित तें कर्म ॥ ७९ ॥ गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुपासी नवें जन्म जाण । गुरु मायबाप सपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ।। ८० ॥ उपजलिया वाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता । जनिता आणि उपनेता ।तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ।। ८१॥ जो भयापासूनि सोडविता । जो बंधविमोचन करविता । जो देहाचे मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थे ॥ ८२ ॥ यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पचभूता । मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥ ८३ ॥ ज्याचे देखिलिया चरण । बांधू न शके भवबंधन । तो सद्गुरु पिता जाण । भाग्येवीण न पाविजे ॥ ८४ ॥ उपजल्या वाळकासी सर्वथा । वेगळाली माता पिता । एक वीर्यात निक्षेपिता । धारणपोपणता जननीची ॥ ८५॥ तैसा सद्गुरु नव्हे पिता । निजवीर्य न चिता। योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥ उदराबाहेरौं घातल्यांपाठी । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी। वाहेरिले सूनि आपुले पोटीं । निजहें गोमदी गुरुमाता ॥ ८७॥ यालागी शिष्यासी तत्त्वता । सद्गुरूचि माता पिता । निजस्नेह वाढविता । तदात्मता 'अभेदें ॥८८॥मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण । माता पिता भिन्नमिन्न । सखेपण त्यां कैचें ॥८९॥ यालागी सद्गुरु जो संकृपू । तो सच्छिप्यासी सखा चापू । पित्यापुत्रांमाजी अल्पू । कांही विकल्पू उपजेना ।।,९० ॥ त्या सद्रूपासून जाण । शैवीवैष्णवीदीक्षाग्रहण । अथवा : उपदेशी निर्गुण । चैतन्यधन निजबोधे ॥ ९१॥ ऐक दीक्षानामाची युक्ती । दें चारी पुरुषार्थ चारी मुंक्ती । नि-शेष अविद्येची नाशी स्थिती। दीक्षाव्युत्पत्ती त्या नाव ।। ९२ ॥ एवं दीक्षाजन्माची जे कथा । उद्धया सागीतली म्या तत्त्वतां । ध्याननिष्ठ जे सात्विकता । ऐक आतां सांगेन ॥९३।। सत्वोपाधि शरीर साचे। चैतन्यधन स्वरूप ज्याचे । तो श्रीविष्णु ध्येय सात्विकांचें । ध्यान त्याचे करावे ॥ ९४ ॥ अथवा धैवळधाम गोक्षीर-1 कर्पूरगौर पंचवक्र । ध्यानी आणावा शंकर । ससारपार तराचया ॥९५ ॥ या मूर्तीचे ध्यान करितां । हारपे ध्येय ध्यान ध्याता। ठसावे चैतन्यधनता । सात्विकता है ध्यान ॥ ९६ ॥ जैशी दीक्षा तैसे ध्यान । हे आगर्मशास्त्रींचे प्रमाण । त्या ध्यानाचे पर्यवसान । चैतन्यधन पावावें ॥ ९७ ॥ केवळ' जें चैतन्यधन । तें सद्गुरुस्वरूप जाण । त्याचे करावे नित्य ध्यान । अनुसंधान निजनिष्ठा ॥ ९८ ॥ पंचभूतदेहाची मूस । " जनवनवास २ पहाट ३ निष्काम कम-पारमाथिर ४ उपदेश घेणे ५ उपनयन हाणजे मुज करणारा ६ निरास ७ घालणारा, ठेवणारा ८ घालून, घाली ९दयाङ्क १० कल्पना, मेदभाव ११ धर्म, अर्थ, काम व मोक्ष १२ सलोकता, समीपता,सरूपताप सायुज्यता १३ कैलासात राहणारा १४ पाच मुखाचा. १५ नाहीसा होतो १६ शेवर.