________________
३४८ एकनाथी भागवत सद्गुरु कामधेनु करी जाणा । वत्सरूपें भावी आपणा । आवडी चाटवी वोधरसना । स्वानंदपान्हा सेवितू ॥ ५२० ।। तुझ्या सकळ वृत्तीची सेवा । म्यांचि करावी गा गुरुदेवा। ऐसे प्राथूनि सद्भावा । हा वरू मज द्यावा कृपानिधी ॥ २१ ॥ तेथ सतोपोनि गुरुनाये । वरू दीधला वरदहस्ते । हर्षे वोसडत चित्तें । धन्य मी वरातें लाधलों ॥ २२ ॥ ऐशी लाहोनि वरदस्थिती । तेचि सेवा आदरी प्रीती । अतिधन्य भावार्थ गुरुभक्ती । नाना उपपत्ती गुरुभजना ॥ २३ ॥ सद्गुरूची दहाही करणे । मनवुद्ध्यादि अतःकरणे । क्रियामात्र मीचि होणें । ऐसें जीवेमाणे भावितु ॥ २४ ॥ सद्गुरू जे जे भोग भोगिती । ते मीचि होईन निश्चिती । एवं मीचि एक गुरुभक्ती । दुजी स्थिति हों नेदी ॥ २५ ॥ सद्गुरु जेथे उभे ठाकती । तै पायांतळी मीचि क्षिती । सद्गुरु जेथे जेथे चालती । ते मार्गीची माती मी होईन ।।२६॥ चरणक्षालनासी समस्त । मीचि उदक मीचि तस्त'। मीचि चरण प्रक्षा लित । चरणतीर्थ मी सेवी ॥२७॥ सद्गुरुचरणींचे रजाकण । मीचि होईन आपण सद्गुरु करिती आरोहण । तें सिंहासन होईन मी ॥ २८ ॥ सद्गुरूचे सिंहासन । ते मीचि होईन आपण । त्यावरी बैसतें आसन । तेही जाण होईन मी ।। २९ ।। सद्गुरूसी स्नेह लागे । तें भी होईन सर्वांगें । गुरूसी वोठंगावया पुढे मागें । मुंदुळी सर्वागं मी होईन ॥५३०॥ मनींचा ऐसा आवांका । सद्गुरूच्या सिद्ध पादुका । त्या मी होईन देखा । नेदी आणिकां आतळों ॥ ३१॥ मी होईन गुरूच्या श्वासोच्छ्वासा । वेगी बाहेर निघेन नौसा । गुरु घेतील ज्या सुवासा । त्या त्या विलासा मी होईन ॥ ३२॥ गुरु अवलोकिती कृपादृष्टी । त्या दृश्याची मी होईन सृष्टी । गुरूची देखती देखणी पुष्टी । ते भी उठाउठी होईन ॥ ३३ ॥ गुरूसी आवडतें निरूपण । तें मी श्रवणी होईन श्रवण । अथवा रुचेल जे कीर्तन । ते गाता गायन मी होईन ॥ ३४ ॥ सद्गुरुमुखींची जे कथा । ते मी आदरें होईन तत्त्वता । अक्षरी अक्षर अक्षरार्थी । मीचि सर्वथा होईन ॥ ३५ ॥ सद्गुरु जेथ करिती स्नान । तें मी अगस्पर्शनाचे जीवन । गुरु करिती जे आचमन । तेही जाण होईन मी ॥३६॥ गुरु परिधान करिती चौस । "ते मी होईन सुवास । गुरुचरण पुसावयास । तेही धूतवास मी होईन ॥३७॥ गुरूसी करिती विलेपन । ते मी होईन शुद्ध चंदन । चरणी अर्पित सुमन । मीचि जाण होईन ॥ ३८ ॥ सद्गुरु करिती भोजन । तेथ मीचि, ताट मीचि अन्न । रसस्वाद पक्वान्न । पंक्तिकारु जाण मी होईन ॥ ३९ ॥ मथोनियां दही मथित । सारांश तें नवनीत । पैराग्यअग्निसंतप्त । भोजनी मुख्य घृत मी होईन ॥ ५४० ॥ परिपाकी स्वादिष्ठपण । सर्वा चवीचे कारण । मी होईन घरी लवण । न्यून ते पूर्ण गुरु करिती ॥४१॥ गुरु करिती प्राशन । तें मी होईन जीवन । सद्गुरूचें धोलेपण । ते उद्गार जाण मी होईन ॥ ४२ ॥ गुरूसी झानरूप जीभ १ भरून पाहतो ३ युक्ति ४ पाच कर्मेंद्रियें व पाच ज्ञानेंद्रिये ५ एकदर काम ६ पाणी सोडण्याचं पान. ७ तेल ८ टॅकायाला ९ मृदोली किवा मृदुली झणजे गिर्दी, “मऊसी गिर्दी " विचिन घातली आसने, सुकुमार मृदुपणे । गाया पडगाद्या ठेंगणे 1 वोठंगणे मृदोलिया ॥" रुक्मिणीखयर, प्रसग १५-४० १० सवेग ११ उत्कट इच्छा १२ नाकावाटे १३ गुरूसी १४ नेसतील १५ यत्र १६ तो १७ पुसावयाचे पत्र १८ पत्तीचा नवणारा पक्तिकार, पक्तिकर, पातिकर हे तीनही शब्द याच अर्थाचे आहेत. येराही रसा पातकरा जाहला मान" होपरी भन्याय ११-२. १९ तृप्ति २०'टेकर -