पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा. ३४५ विषयांतें सेविती ॥४८॥ ग्राम्य विषयीं अतितत्पर । यालागी वोलिजे ग्रामचर । ग्राम गीध जैसे घार । तैसे सादर विषयासी ॥४९॥ जेवी का घार गगना चढे । तेथूनि आविसा उड़ी पड़े। तेवी नरदेह पावोनि चौखडे । विपयों झडपडे झोंबती ॥४५०॥ एव विपयासक्त जे चित्त । जे अधोगतीते पावते । ते दुःखफळाचे भोके । जाण निश्चितें उद्धवा ॥५१॥ साडोनिया गार्हस्थ्य । धनवासी वानप्रस्थ । त्यासचि सुखफल प्राप्त । जाण निश्चित उद्धवा ॥ ५२ ॥ त्या सुसफळाचे विभाग । ब्राँसदनात इतर स्वर्ग । कर्मे करूनिया साग। जेयींचा मार्ग चालिजे ॥५३॥ ब्रहाचर्य वेदाध्ययन । गार्हस्थ्य पूजिते अग्निब्राह्मण । वानप्रस्थाश्रमी जाण । वन्यफळभोजन वनवासी ॥ ५४ ।। येणे क्रमेचि क्रममुक्तिस्थान । जिंही ठाफिले ब्रह्मसदन । सुखफळाचे भोक्ते ते जाण । ब्रह्मभवननिवासी ॥ ५५ ॥ इतर स्वर्गी सुखप्राप्ती । जेथें आहे पुनरावृत्ती । ब्रह्मसदनी पावल्या वस्ती । त्यासी को मुक्ती होईल ॥५६॥ मूळींचे पद 'अरण्यवासी । तेणे धोतिले वानप्रस्थासी । तेथ नाही घेतला सन्यासी । त्यासी बनवासी ह्मणो नये ॥ ५७ ॥ सन्याशासी निवासस्थान । घेदी चोलिलें नाही जाण । तिहीं स्वदेहाचे केले दहन । नेमिले स्थान त्या नाही ॥५८॥ जे विद्यादिकर्मप्रवृत्ती । विरजाहोमी स्वयें जाळिती । ते भववृक्षाची फळे खाती । हेही युक्ती घडेना ।। ५९ ॥ जागृतींच्या पाहुण्यासी । जेवू घाडावे स्वमगृहासी । तेवीं न्यस्तसकल्प सन्यासी । ससारसुबासी केवीं भोक्ते ॥४६० ॥ स्वकर्म जाळोनि विरजाहोमी । जिहीं साध्य केले ब्रह्मास्मि । त्यासी निवासस्थान कोण नेमी । वनीं ग्रामी नेमस्त ॥६॥ विहार द्यावया आकाशासी । कोण घर नेमावे त्यासी । तेवी न्यस्तसकल्प सन्यासी । त्यांच्या निवासासी कोण नेमी ।। ६२ ।। जे न्यस्तसकल्प सन्यासी । त्यासी कोण ह्मणे अरण्यवासी। भायिक भववृक्षांच्या फळासी । भोक्ते त्यासी ह्मणों नये ॥६३॥ मूळींचे पद 'अरण्यवासी'। ते भागा आले वानप्रस्थासी । घानप्रस्थ सदा वनवासी । दुसऱ्या फळासी तो भोका ॥६४॥ ऐक सन्याशाची सुखप्राप्ती। दोनी फळे मिथ्या जाणती । मीचि एक विजगतीं । हे प्रतीति निश्चिती त्या झाली ॥ ६५ ॥जो हा बहुरूपें विस्तारू । तो मी चिदात्मा साचारू। जाणोनि गुरुमुखें निर्धारू । माझें सुख साचारू पावले ॥६६॥ ते मद्रूपें मज पावले । माझेनि सुसें सुखरूप झाले । सुखदुःसफळात मुकले । येवों चुकले ससारा॥ ६७ ॥ ससार मायामय मिथ्याभास । जाणे तोचि वेदज्ञ विद्वास । त्यासीच बोलिजे परमहस । विश्व निवासनिवासी ॥ ६८ ॥ ऐशी होआवया पदप्राप्ती । सुदृढ करावी गुरुभकी । तेणे होय ससारनिवृत्ती । तेचि श्रीपति सागत ।। ६९ । पहिली सागितली सत्सगती। तेणे जाहली मत्पदमाप्ती । तेचि अध्यायाच्या अर्ती । करावी गुरुभक्ती सागतू ।। ४७० ।। एवं गुरूपासनयैव भाया विद्याकुठारेण शितेन धीर । विश्य जीवाशयमनमा सपथ चात्मानमथ स्यज्ञानम् ॥ २४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादायक"धे श्रीकृष्गोववसवादे द्वादशोऽध्याय ॥ १२ ॥ निय, पीमत्म २ शामिपावर, मांसावर ३शन प्राप्तीस योग्य ४ गृहस्थाश्रम ५ प्रदासदापर्मतचे सर्व सर्ग. ६ तिसरा भाश्रम अज्ञानजन्य ८ गेल्या आहेत मनोवासना ज्याच्या असे मी मा आहे असे ज्यांनी जाणमा पस्पिटेरया ११ आगा १२ अनुभव १३ समारहा पेपळ वरूपनाकारित आहे, अर्थात् गर नान सामासमान आहे है ज्यांना पटले खानाच वेदार्थयेते पडित सणावे, तेच परमहरा, व चराचर आपण मारेले विश्वाीवासीही तेष होत ए मा ४४