पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत न करितां सद्गुरुभजन । नव्हे भववृक्षाचें छेदन । जरी कोटिकोटी साधन । आनेआन केलिया ॥७१॥ भववृक्षातें छेदिती । केवळ जाण गुरुभक्ती । अरिनिर्दळणी निश्चिती । जेवी निजशक्ति शूरांची ॥७२॥ दूरी करावया दुरित । जेवीं गंगाजळ समर्थ । तेवीं भवभया भस्म करित । जाण निश्चित गुरुभक्ति ॥ ७३ ॥ करितां सत्यव्रतग्रहण । पाप स्वये जाय पळोन । तेवीं करितां गुरुभजन । भवनिर्दळण स्त्रये होय ॥ ७४ ॥ हनुमंत देखतां दिठीं । भूते पळती वारा वाटी । तेवी गुरुभजनपरिपाटी । पळे उठाउठी भवभय ॥ ७५ ॥ मरतां घडे अमृतपान । ते मरणासचि आले मरण । तेवीं करितां गुरुभजन । जन्ममरण निमाले ॥७६ ॥ अती अवचटें हरि ह्मणता । पीपरा हाणे यमदूतां । तेवीं सद्गुरूते भजतां । हाणे लाता भवभया ॥ ७७ ॥ करावया भवनिर्दळण । मुख्य करावे गुरुभजन । हेचि श्रेष्ठ गा साधन । सभाग्य जाण गुरुभक्त ॥ ७८ ॥ कोण सद्गुरु कशी भक्ती । ऐसे काहीं कल्पिसी चित्ती । तेही मी येथानिगुती । मागां तुजप्रती सागितली ॥ ७९ ॥ जो शब्दपरनिष्णात । शिष्यप्रबोधनी समर्थ । तोचि सद्गुरु येथ । जाण निश्चित उद्धवा ॥४८०॥ जो स्वरूपी करी समाधान । तोचि सद्गुरु सत्य जाण । त्यावेगळे सद्गुरुपण । होआवया कारण असेना ॥ ८१॥ त्या सद्गुरुभजनाची परी । तुज मी सांगेन निर्धारी । सर्व कर्मधांचियां गिरी । जो का करी गुरुभजन ॥ ८२ ॥ गुरु ह्मणो पित्यासमान । तंव तो एकजन्मींचा जाण । हा मायबापू सनातन । जनक पूर्ण जगाचा ॥८॥ गुरु मातेसमान पाहो । तंव गर्भजन्में तिचा स्नेहो । गर्भवास निवारी गुरुरायो । अधिक स्नेहो पुत्रापरिस ॥ ८४ ॥ उदराबाहेर पडल्यापाठी । पुत्रस्नेहें माता उठी । ते बाहेरील घालून पोटीं । सोहें गोमटी गुरुमाता ॥ ८५ ॥ गुरु मानूं स्वामीसमान । स्वामी निवारू न शके मरण । सद्गुरु चुकवी जन्ममरण । स्वामी सपूर्ण गुरुरावो ॥८६॥ गुरु मानूं कुल देवता । तंव तिसी कुलधर्मी पूज्यता । हा कुलदेवतेची देवता । नित्य पूज्यता निजकर्मी ॥७॥गुरु मानूं कल्पतरूसमान । तंव कल्पतरु दे कल्पिले दान । सद्गुरु दे निर्विकल्पता पूर्ण । अगाध दान निलाम ॥८८॥चितामणी दे चिंतिल्या अथो । सद्गुरु करी चितेच्या घाता। चित्ता मारूनि दे चैतन्यता । अक्षयता निदान ॥ ८९ ॥ कामधेनूचे दुभते । ते कामनेचपुरतें । सद्गुरु दुभे स्वानंदीर्थ । कामनेते निर्दली ॥ ४९० ॥ गुरुसमान ह्मणों सागरू । तो गंभीर परी सदा क्षारू । हा स्वानंदें नित्य निर्भरू । अतिमधुरू निजबोधे ॥९१ ॥ गुरु पर ब्रह्मसमान । हेही बोलणे किचित् न्यून । गुरुवाक्ये ब्रह्म सप्रमाण । येरवीं ब्रह्मपण शब्दमात्र ॥ ९२ ॥ शव्दी लोपूनि शब्दार्या । गुरु प्रवोधी सविदा । त्याहूनि पूज्य परता । नाही सर्वथा त्रिलोकीं ॥ ९३ ॥ गुरु माता गुरु पिता । गुरु स्वामी कुळदे. वता । गुरुवांचोनि सर्वथा । आणिक देवता स्मरेना ॥९४॥ थोर माडलिया साकडे । ज १ छेदणारी २ निजभक्तिसुराची 3 गगाजळी सामथ्र्य र राय ५यथास्थितपणे ६ सागेन तुजप्रति उद्धवा ७ सदर शब्दनानिष्णात असावा च परनमनिष्णात झणजे स्वानुभवीही असावा 'शाद पर च निष्णात 'ताच सहा शब्दनापर ८प्रसार, तन्हा ९सर्व कर्मधर्मात गुरुसेवाच श्रेष्ठ होय १० जर ह्मणावा तर ११ चागला १२चित साक्षस करून चतन्य देणारा य याप्रमाणे शाश्वत वस्तूचे दान करणारा तोच सदरु होय १३ कामिता, मान कामधेनु देते। पर सहर वागदरस देणारा असल्यामुळे घामनाच नाहीशी करितो १४सारट १५ज्ञानरूप वस्तुस १६ पलीकडे, अधिक.