पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥ ३४ ॥ हे वैदिकी उपासकता । वेदज्ञांसीचि तत्त्वतां । नेणत्या योग्य नव्हे सविता । ऐसे सर्वथा न ह्मणावे ॥ ३५॥ तत्काळ प्रसन्न होय सविता । ऐशी सुगम उपासकता । तुज सांगेन आतां । सावधानतां अवधारीं ॥ ३६॥ सकळ वेदांची जननी । सकळ मंत्रांचा मुकुटमणी । ते गायत्री उत्तमवर्णी । सकळ ब्राह्मणी जाणिजे ॥३७॥ तिचा अर्थ विचारिता । तीअधीन असे सविता । त्रिपदा त्रिकाळी अर्घ्य देतां । विद्या तत्त्वतां त्या नाय ॥ ३८ ॥ अर्धमात्रा अर्धबिंवध्यान । त्रिपदा त्रिकाळी अर्घ्यदान । तेणे सतोपे चिद्धन । आपणासमान भक्त करी ॥ ३९ ॥ हे प्रथम माझें अधिष्ठान । सूर्यपूजा याचि नाव जाण । आतां अमिपूजेचे लक्षण । सांग संपूर्ण ते ऐक ॥ १३४० ॥ सर्वांगा मुख प्रधान । ते माझे मुख अग्नि जाण । ये अर्थी वेदशास्त्रपुराण । साक्षी सपूर्ण गर्जती ॥४१॥ ब्राह्मण माझे आवडते । माझे मुखी होआवया सरते । म्यां लाविले अग्निसेवेतें । तेही तेथें चूकले ॥ ४२ ॥ घालूनि मजमुखी अवदान । इंद्राय स्वाहा ह्मणती जाण । कर्मकांडे किले ब्राह्मण । शुद्ध मदर्पण चूकले ॥ ४३ ॥ केवळ मजमुखीं अर्पिता । आड आली त्यांची योग्यता । इद्र यम वरुण सविता । नाना विकल्पती अवदानीं ॥ ४४ ॥ देवो देवी मीचि आहे । हेही सत्य न मानिती पाहें । मजवेगळा विनियोग होये । नवल काये सांगावें ॥ ४५ ॥ जे जे सेविजे तिहीं लोकीं । तें तें अर्पे माझ्या मुखी । हैं न मनिजे याज्ञिकी । कर्माविखी विकल्पू ॥ ४६ ।। विकल्पबुद्धि ब्राह्मण । अद्यापि संशयीं पडिले जाण । करूनि वेदशास्त्रपठण । शुद्ध मदर्पण न बोलती ॥४७॥ माझें मुख वैश्वानर । येणे भावें विनटले नर । साडूनि भेद देवतांतर । मजचि साचार अर्पिती ॥४८॥ त्यांचे समिधेनी मन तृप्त झाले । तेथही जरी हविद्रव्य आले । तरी माझं निजसुख सुखावले । सर्वस्व आपुलें त्यासी भी दे ॥४९॥ मज नैराश्यतेची आस । त्यांच्या हाताची मी पाहें वास । त्यांलागी सदा सावकाश । अल्पही ग्रास जे देती ॥ १३५० ॥ त्याचेनि हाते निर्विकल्पें । मभावें जे अग्नीस अ । तृण काष्ठ तिळ तुपें । तें म्यां चिद् सेविजे ॥ ५१ ॥ यापरी अग्नीची उपास्ती। जे दुजे स्थानीची पूजास्थिती । सागीतली म्यां तुजप्रती । ब्राह्मणभक्ती अवधारी ॥५२॥ पूजेमाजी अतिश्रेष्ठ जाण । शीघ्र मत्प्राप्तीचे कारण । ब्राह्मण माझें पूजास्थान । अतिगहन उद्धवा ॥ ५३ ॥ त्यांचिया भजनाची नवलपरी । आड पडावें देसोनि दूरी। मस्तक ठेवावा चरणावरी । चरणरज शिरी चंदावे ॥५४॥ आवाहनविसर्जनेवीण । शालग्राम माझं अधिष्ठान । परी ते केवळ अचेतन । ब्राह्मण सचेतन मद् ॥ ५५ ।। मी अव्यक्तरूप जनार्दन । तो मी व्यक्त ब्राह्मणरूपें जाण । धरातळी असें मी नारायण । धरामर ब्राह्मण यालागीं ॥५६॥ ब्राहाणमुखें वेदासी महिमा । ब्राह्मणे यज्ञदानतपतीर्थगरिमा । ब्राह्मणे देवासी परम प्रेमा । ब्रह्मत्व ब्रह्मा ब्राह्मणमुखें ॥ ५७ ॥ त्या ब्राह्मणासी अपमानिता । अपमानिल्या यजदेवता । वेदादि तपदानतीर्था । परब्रह्म तत्त्वतां अपमानिले ॥ ५८ ॥ मज त्रिलोकी नाही साठवण । मजहूनि अधिक माझे ब्राह्मण । त्यामाजी पहिल्या वर्णातले पुरुष ने ग्राह्मण त्यांनी २ जाण ३ श्रेष्ठ ४ आहुती ५ फसले ६ माल जात नाही नाम ८ आदय पडे ते १० नित्य राहण्यान स्थान ११ यज्ञ, दान, तप, तीर्थ, इत्यादिकाना प्राहाणामुळे महत्व आहे १२ गिलोकीहन भी अधिक व्यापक आहे 'असतिष्ठदशांगुलम्