________________
३१२ एकनाथी भागवत. वंदन । अतिशयसी सुप्रसन्न । जिचेनि घवघवाटें निवे मन । प्रतिमा संपूर्ण ती नांव ॥ १२९० ॥ तेथे मेळवूनि साधुश्रेष्ठां । अग्न्युत्तारण करावे निष्ठा । चक्षुन्मीलन प्राणप्रतिष्ठा । करावी वरिष्ठाचेनि हातें ॥ ९१ ॥ देवालय करावे गहन । वन उद्यान उपवन । खंडकुलिया विश्रामस्थान । आराम जाण करावे ॥ ९२ ॥ नाना जातींचे वृक्ष तें वन । फळभक्ष वृक्ष तें उपवन । पुष्पवाटिका ते उद्यान । कृष्णार्पण पूजेसी ॥ ९३ ॥ हाट हाटवटिया चौपासी । नगर वसवावें देवापाशीं । वेदाध्ययन शास्त्रश्रवणेसी । अहर्निशी कीर्तने ॥ ९४ ॥ इतुकें करावया असमर्थ । श्रद्धा आहे परी नसे वित्त । तरी साह्य मेळवून असमर्थ । मदावयुक्त करावे ॥ ९५ ॥ का मेळवूनि भगवद्भक्त । त्यांत श्रद्धाळू जे वित्तवंत । भावपूर्वक दिधल्या वित्त । तेणें हें समस्त करावे ॥ ९६ ॥ देउळी करूनि मूर्तिप्रतिष्ठा । परतोनि न बचे जो त्या वाटा । तो आळशी जाणावा करंटा । नव्हेचि चोखेटा भावाचा ॥ ९७ ॥ जो करूं जाणे मूर्तिप्रतिष्ठा । धन वेचून भावार्थी मोटा । नीचसेवा तो माझा वांटा । झाडितां खरांटा न “सडी ॥ ९८॥ . समार्जनोपलेपाभ्या सेकमण्डलवर्तने । गृहशुश्रूपण महा दासवद्यदमायया ॥ ३९ ॥ ___ असतां शिष्य सेवकजन । ते प्रतिष्ठा सांडूनि सन्मान । स्वये करी सडासंमार्जन । देवालयी जाण निर्दभ ॥ ९९ ॥ रंगमाळा घाली कुसरी । नाना यंत्रे नानाकारी । नाना परीचे रंग भरी । आवडी भारी मद्भजनी ॥ १३०० ॥ जैसे का नीच रक । तैसी सेवा करी देख । नीचसेवेचे अतिसुख । निर्मायिक मभजनीं ॥१॥ र अमानित्वमदम्भिरव कृतस्यापरिकीर्तनम् । अपि दीपावलोक मे नोपयुष्यातिवेदितम् ॥ ४० ॥ - अपार वेचूनि नाना अर्थ । प्रासादप्रतिष्ठा म्या केली येथ । मी एक देवाचा मोटा भक्त । न धरी पोटात अभिमान ॥ २॥ शुद्ध भावो नाही चित्तीं । खटाटोपें अहाच भक्ती । ऐशी जे दांभिक स्थिती । भक्त नातळती भाविक ॥ ३॥ भ न धरावा अभिमान । नापेक्षावा मानसन्मान । न करावे दामिक भजन । अभिलाप जाण न धरावा ॥४॥ अनुभव जाला तो आपण । का देवालयीं वेचिलें धन । अथवा जे दिधले दान । ते वाच्य जाण न करावे ॥५॥ यजमान जै केले वोले। ते जे केले ते निर्वीर्य जाले । माणेवीण प्रेत उरले । तैसे झाले ते धर्म ॥ ६॥ कृपीवल पेरूनियां धान्य । सवेचि आच्छादी आपण । ते पीक लगडूनि ये जाण । तसे सफळ दान न बोलता ॥७॥ देवासी समर्पिले आपण । का आणिकी केले निवेदन । तें घेऊ नये आपण । देवर्लकण तो दोपू ॥८॥ देवाचा प्रसाद घेता । लोभ न घ्यावा सर्वथा । आधी वाटावा समस्ता । अल्पमात्रता स्वयें घ्यावा ॥९॥ दीपु समर्पिला श्रीहरी । तेणे न वावे गृहव्यापारी । हे बोलिले आगमशास्त्रीं । स्मृतिकारी सज्ञानी ॥ १३१०॥ हे तंब अवघी साधारण बाह्य पूजा । परी दृढविश्वासे भावो माझा । ते भक्ति आवडे अधोक्षजा । भाविकांची पूजा भावार्थे ॥ ११ ॥ ऐक पा भक्तीचा इत्यर्थे । जेणे भजने मणिजे भक्त । तरी जे जे उत्तम या लोकातू । आवडता पदार्थे मज अपी॥१२॥ १ मूर्ति घडताना अमीचा ताप च ताहन घडते त्याच्या निवारणार्थ विधी ३ नेत्र उघडणे ३ उपवन (मागें अध्याय ७-४६३ पहा) ४ याजार ५रामदिवस ६ धनिर जाई ८जाण पा ९सरळ १०सोडी ११ मोठेपणा विराम १२ दजळ व सभामदप बांधः १३ परवर, दामिरपणाची १४ उच्चारू नये १५ समपण १६ पूजारीपणा १७ रहस्य H