Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ध्यान ध्याता । तिहींसी एकी गांठी नसतां । तंवचिवरी ध्यानावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४३॥ ज्याच्या जीवी ध्यानाची आवडी । ज्याच्या मनासी माझी गोडी । उद्धचा हे तेचि जोडे जोडी । जै जन्मकोडी निजभाग्य ॥४४॥ निष्काम करोनियां मन । जन्मजन्मांतरी साधन । केले असेल ते माझें ध्यान । विश्वासे जाण दृढ लागे ॥ ४५ ॥ दृढ लागल्या माझें ध्यान । अनन्यभावे माझें भजन । सर्व पदार्थसी जाण । आत्मसमर्पण मज करी ॥४६॥ वैदिक लौकिक दैहिक । या क्रियांचे लाभ देख । जरी झाल्या अलोलिक । भक्त भाविक ते नेघे ।। ४७ ॥ वैदिक लाभ दिव्य सामग्री । स्वर्गादि सत्यलोकवरी । भक्त तेही हाती न धरी । भजन सुखें करी संतुष्ट ॥४८॥ लौकिक लाभाची श्रेणी । कल्पतरु कामधेनु चितामणी । भक्त अपी कृष्णार्पणीं । हरिभजनी संतुष्ट ॥ ४९ ॥ दैहिक लाभाची थोरी | गजांतलक्ष्मी आल्या घरी । भक्त कृष्णार्पण करी । भजन सुखें करी सतुष्ट ॥ १२५० ॥ आविरिच्यादि लाभ जाण । सर्वहि मानोनियां गौण । माझे भक्तीसी विकिला प्राण । सर्व समर्पण मज करी ॥ ५१ ।। जेणे सेवेसी विकिला प्राण । तो वृथा जावो नेदी अर्ध क्षण । माझी कथा माझें ध्यान । महोत्साहो जाण माझाचि ॥ ५२ ॥ मजन्मकर्मकथन मम पर्वानुमोदनम् । गीतताण्डववादिनगोष्टीभिर्मद्गृहोत्सवम् ॥ ३६ ॥ ध्यानावस्थें करी ध्यान । नातरी कथानिरूपण । अनुसधानी सावधान । रिते मन राहूं नेदी ।। ५३ ।। माझी जन्मकर्मे निरूपिता । आवडी उल्हास थोर चित्ता । स्वेद रोमांच द्रवतां । सप्रेम कथा उरहासे ।। ५४॥ ऐकूनि रहस्य हरिकथा । द्रव नुपजे ज्याचिया चित्ता। तो पापाण जाण सर्वथा । जळी असता कोरडा ।। ५५ ॥ ऐक माझे भक्तीचे चिह्न । माझ्या पर्वाचे अनुमोदन । करी करवी आपण । दीनोद्धरणउपायो ।। ५६ ॥ पर्वविशेष भागवतधर्मी । नृसिंहजयंती रामनवमी । वामनजयंती जन्माष्टमी । उत्तमोत्तमी शिवरात्र ॥ ५७ ॥ वैष्णवांसी शिवरात्रि विरुद्ध । हे वोलणे अतिअवद्ध । सकळ पुराणी अविरुद्ध । व्यास विशुद्ध बोलिला ॥ ५८ ॥ शिव श्याम तमोगुणी । तो शुद्ध झाला विष्णूच्या ध्यानीं । विष्णु श्याम शिवचिंतनीं । विनटले गुणी येरयेरां ॥५९ ॥ शिव धवळधाम गोक्षीरू । विष्णु धनश्याम अतिसुदरू । वाप ध्यानाचा डिवारू । येरे येरू व्यापिला ॥ १२६० ।। मुदला दोहींसी ऐक्य शुद्ध । मा उपासकासी का विरुद्ध । शिवरात्री वैष्णवासी अविरुद्ध व्रत विशुद्ध सर्वाही ॥६१॥ जे पर्वणी प्रिय चक्रपाणी । जे सकळ कल्याणाची श्रेणी । उभय पक्षा तारिणी । वैष्णवजननी एकादशी ॥ १२ ॥ जे शुक्लकृष्णपक्षविधी । भक्त वाऊनिया खांदीं । नेऊनिया सायुज्यसिद्धी । मोक्षपदी वैसवी ॥ ६३ ॥ करावी शुक्ल एकादशी । त्यजावे कृष्णपक्षासी । उपडलिया एका पक्षासी । सायुज्यासी केवीं पांव ॥६४ ॥दों पासी उड्डाण पक्ष्यासी। एकु उपडिल्या नुडवे त्यासी । तेवीं पा त्यजिता कृष्णपक्षासी । सायुज्यासी न पविजे ॥६५॥ तेवीं एकादशी पाहीं । जो जो उत्सवो जे जे समयीं। तो तो उपतिष्ठे माझ्या ठायीं । सदेहो नाही सर्वथा ॥ ६६ ॥ जो एकादशीचा घेतधारी । १ दांत सांगितलेल्या २ लोक्रूटीन मानलेल्या ३ देहसंयधी. ४ पकी ५ मापदापर्गतचे सर्व जम ६ रिकामे पर्य-जयत्यादि पुण्यदिवस ८ मोठी योग्यता ९शकर पाणि विष्णु यार्च अन्योन्य भजनामुळे पूर्ण ऐक्य असून शेव प यंग यौनांत विरुद्धपण को व्हावें १० की ते नेना."प्राप्त होतो १२ मत चालविणारा