________________
एकनाथी भागवत. हपीकेशता । त्यासचि तत्त्वतां ह्मणताती ॥४८॥ एवं विचाराचा निर्वाहो । करितां निज हृदयीं असे देवो । तो पहावया वाहेरी धांवों । तै मूर्ख पहा हो मी झालों ॥४९॥ तीर्थी क्षेत्री भेटेल देवो । हा आपुले हृदयींचा भावो । निजभायेंवीण पहा वो । तीर्थीही देवो असेना ॥ ११५० ॥ एवं देवो तो मजमाजी आहे । त्याचेनि टवटवती इंद्रियें । क्रिया कर्म जे जे होये । ते त्याचेनि पाहें तत्त्वतां ॥५१॥ देह तंव वापुडें । केवळ अचेतन म. । त्याचेनि कर्म नुपजे फंडें । हे तंव कुंडे सर्वथा ॥५२॥ इंद्रियांचेनि चेतविता । कर्म क्रिया कर्तव्यता । देहाचेनि नोहे तत्त्वतां । मुख्यत्वे कर्ता हृदयस्थु ॥ ५३॥ यापरी जे काही कर्तव्यता । ते भोळेपणे नेघे माथां । सर्व कर्माचा आत्मा कर्ता । विश्वासे सर्वथा दृढ मानी ॥ ५४ ॥ मग अन्नपानादि सेविता । मानी आत्मारामु भोक्ता । सर्वकर्मकर्तव्यता । अह कर्ता हे ह्मणो नेणे ॥ ५५ ॥ ऐसे भोळिवेचेनि समजें । माझे भजन निपजे पोजें । ते म्या आवडी सेविजे । जाण ते माझं खाजुकें ॥ ५६ ॥ सर्वभावे सर्वथा । वाळकांसी जेवी माता । तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मी सर्वथा सर्वस्वें ॥ ५७ ॥ धावोनि मिठी घालावयासी । हित गुज आळोंचासी । खाणे जेवणे विश्रातीसी । जेची वाळकासी निजजननी ॥ ५८ ॥ तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मीचि जाण जिवलग माता । अर्थ स्वार्थ परमार्थता । जाण तत्त्वता मी त्यासी ॥ ५९ ॥ तोडीचे पोटींचे गांठींचें । माता बाळकालागी वेचे । तेवी भाविकालागी आमुचें। सर्वस्व साचें मी वेंची ॥ ११६०॥ बाळक न मागता धांवोनी । कळवळोनि माता लावी स्तनी । तेवीं भोळ्या भक्तालागुनी । मी अनुसधानी लाविता ॥ ६१ ॥ ज्येष्ठ कनिष्ठ पुनाते पिता एकचि जाण प्रतिपाळिता । ज्येष्ठातें निग्रहो करिता । लळे पुरविता बाळकाचे ॥ ६२ ॥ ज्येष्ठ वाकुडे बोलतां । तोडायरी हाणे पिता । वाळक बोबडे बोलता । सतोपे सर्वथा सर्वस्वे ॥ ६३ ॥ सजानासी अवद्ध पडता । दोप वाजती त्याचे माथां । भोळ्या भक्ताची अवद्ध कथा । तेणे देवो तत्त्वतां सतोपे ॥६४ ॥ कर्माकर्मप्रत्यवायता । हे सज्ञानासीच सर्वथा। भोळ्या भक्तासी कर्मवाधकता। मी सर्वथा येऊ नेदीं ॥६५॥ भोजनी वैसता बापासी । दूरी वैसवी ज्येष्ठ पुत्रासी । अकीं बैंजिनि वाळकासी । तृप्ति निजग्रासी देतुसे ॥ ६६ ।। तेथें जें जें गोड आपणासी । ते तें दे वाळकासी । न घेतां प्राथूनि त्यासी । तृप्तीच्या प्रासी जेववी ॥ ६७ ॥ तेवीं साधनी शिणतां सनानासी । प्राप्ती होय अतिप्रयासीं । माझिया भोळ्या भक्तासी। मीचि अनायासे उद्धरीं ॥ ६८ ॥ वाट चुकल्या भुयाळासी । फेरा पडे चालो जाणत्यासी । वाळक वापाचे कडियेसी । श्रमू तयासी येवों न, शके ॥ ६९ ॥ तेवीं साधनी अंगविकलेता । ते वाजे सज्ञानाचे माथा । भोळ्या भक्तातें मी उद्धरिता । प्रयास सर्वधा त्या नाहीं ॥ ११७० ॥ त्यामी वाऊनि आपुल्या खादी । मी पाववीं सायुज्यसिद्धी । नवल त्याची भोळी बुद्धी । तेथही भजनविधी न साडी ॥ ७१ ॥ हृदयीं कपटाचा थारा । तोचि १६पाई मणजे इदिगें लांचा इश दाणजे खामी, हाणून हृषीरेश मणजे इद्रियांचा चालक २ दिसेना. ३ जड ४ गरें ५ पर्ष ६ आयी ७माणे 'गाजुर्ग, खाने ८ कानांत हदच सांगण्याला सर्च करिते १० सन्मार्गी ११ वायोत रेवणारा दटावतो १२ बोक्देतिकडे दाद, अपशब्द १३ भादळनात १४ वेडंवाक्हे गाणे १५ अडथळे। प्रयायत १६ मारन, टेपून १७ भोयाग, बाटाम्पास ( मागें अध्याय ३-८०५ पहा) १८ कमीपणा, सदोपता