पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत वृक्षु एकही स्वयं न चाखे । तेवी कर्मफळा जो न टेंके । तो यथासुखें परब्रह्म ।। ७१ ॥ तैसा कायावाचामनेप्राणें । साधु वाढला उपकाराकारणे । आपुले परावे ह्मणों नेणे । उपकारू करणे सर्वांसी ॥७२॥ हो कां चंद्र उगवोनि अंवरी। जेवीं जगाचे आंधारे निवारी । विश्वाचा ताप दूर करी । निववी निजकरी सर्वाते ।। ७३ ।। तेथ चंद्रामृत चकोरी सेवावे । येरासी चंद्रन ह्मणे न द्यावे । जो जो भजे जेणे भावे । तो तो पाये ते सुख ॥७४ ॥ तैसेचि जाण साधूपाशी । जो जो श्रद्धा करी जैसी । त्या त्या देतसे सुखासी । होत जगासी उपकारी ॥ ७५ ॥ काउळे चंद्रासी हेळेसिती । चकोर चंद्रामृत सेविती । तेवीं दुष्ट साधूतें धिकारिती । भावार्थी पावती निजलाभू ॥७६ ॥ सातव्या लक्षणाचा उभारा । सांगितले परोपकारा । पुढील श्लोकी लक्षणे अकरा । साधुनिर्धारा सांगत ॥ ७७ ॥ कामैरहतधीर्दान्तो मृदुः शुचिरपिञ्चन । अनीहो मितभुक् शान्त स्थिरो मच्छरणो मुनि ॥ ३० ॥ उर्वशी आलिया सेजेसी । कामक्षोभ नुपजे ज्यासी । स्वानंद भोगिता अहर्निशी । विषयकामासी विसरला ॥ ७८ ॥ रकू पालखिये वैसला । तो पूर्वील वाहना विसरला । तेवी हा निजानंद तृप्त झाला । काम विसरला तुच्छत्वे ॥ ७९ ॥ काही अप्राप्त पावावया कामांवे । साधूसी अप्राप्तता न सभवे । प्राप्तपदी यथागौरवे । निर्जीनुभवे विराजतू ॥ ८८० ॥ खद्योता सूर्य भेटों जातां । खद्योता न देखे सविता । सूर्यासी न भेटवे खद्योता । तेवीं अप्राप्तता साधूसी ॥ ८१ ॥ एवं उभय परी पाहतां । कामू निमाला सर्वथा । हे आठवें लक्षण तत्त्वतां । अकामता साधूची ॥ ८२ ॥ सावधाने अतर नेमितां । तेचि वाडेंद्रिया नियामकता । जेवी का लेकीशी शिकवण देता । सून सर्वथा चळी कापे ॥ ८३ ॥ मुख्य धूरै रणी लागल्या हाता । येर केटक जितिले न झुंझता । का मूळ छेदिले असतां । शाखा समस्ता छेदिल्या ॥८४॥ एव अतरवृत्तीचा जो नेम । तोचि बायेद्रिया उपरम । ऐसेनिहीं जे निपजे कर्म । तें निर्धम अहेतुक ।। ८५ ॥ अंतर जडले आत्मस्थिती । वाह्य रगले मद्भक्ती । तेथें जी जी कर्मे निपजती । ती ती होती ब्रह्मरूप ॥ ८६ ॥ बाह्येद्रिये करिता नेम । अतरौंचे कर्मी प्रकटे ब्रह्म । हा वायेंद्रियांचा नेम । आत्माराम जाणती ॥ ८७ ॥ ऐशी वाडेंद्रियनियामकता । हे जाणावी साधूची दांतता । हा नववा गुण तत्त्वता । ऐक आता दशमातें ॥ ८८ ॥ आकाश सर्वांसीही लागे। परी कठिण नव्हे कोणेहि भागें। तेवीं साधु जाण सर्वांगें । मृदु लागे सर्वासी ॥ ८९ ।। पिंजल्या कापुसाचा गोळा । फोडू नेणे कोणाच्या कपाळा । तैसाचि साधूचा जिव्हाळा । अतिकोवळा सर्वांसी ।। ८९० ॥ पाहे पा जैसे गंगाजळ । गायीव्याघांसी करी शीतळ । तैसाचि साधुहि केवळ । मृदु मंजुळ सर्यासी ॥ ९१ ॥ साधूंची अतिमृदुता । या नाव जाण सर्वधा । हे दशमलक्षणयोग्यता । । ऐक आता अकरावे ॥१२॥ साधूंची जे शुचिमतता । ते भगवद्भजनेचि तत्त्वता । व्रततपदानादितीर्था । शैचिप्मतता त्याचेनी ॥ ९३ ॥ परदारा आणि परधन । सर्वथा नातळे ज्याचे मन । गंगादि तीर्थे त्याचे जाण ! चरणस्पर्शन वाछिती ॥९४ ॥ स्वदारास्वधन १शिवत नाही २ तुच्छ रेसतात, धिकारितात ३ इच्छा करावी ४ निजानदभावे ५ काजव्यास मनाचे नियमन झालं की बायेंद्रियाचे दमन झालेच झणून समजावे ७ लकीला बोलले की सुनेला लागतं ८ माघाडीच सैन्य १ सेन्य १० भात्म्याच्या ठिकागी रमणारे पुष्प, ११ अत करण, १२ शुद्धता १३ सरोसर