________________
अध्याय अकरावा. २९३ झाले येथें । मरे उपजे जेधींच्या तेथे । कोठेही नव्हे वाढतें । तेणे सताते ठाकिले ॥ ४६॥ सत्यासी सतासी होतां भेटी । तंव सत्यस्वरूपी पडली गांठी । सत्य सतत्वे उठी। झाले सृष्टी चिरायु ॥ ४७ ॥ यापरी सत्य सतदृष्टी । सत्य सारे आले पुष्टी । वळे वाढले सृष्टीं । सत्ये भेटी परब्रह्मीं ॥४८॥ सतासी होआवया उतरायी । सत्य लागले त्यांचे पायीं । सतचरणावेगळा पाही । थारा नाही सत्यासी ॥४९॥ ऐसे सत्यास आधारभूत । ज्यांचे पाखोबा सत्य जीत । ज्याचेनि वळे सत्य समर्थ । ते शुद्ध सत जाणावे ॥ ८५० ॥ ज्यासी सवाह्य सत्यत्वे तुष्टी । जे सत्यस्वरूप आले पुष्टी । सत्यें धाली दे ढेकर दृष्टी । ज्याची उठी सत्यत्वें ॥५१॥ या नाव जाण सत्याचे सार । हे सताचे वसते घर । हे मज मान्य सत साचार । मी निरतर त्यापाशीं ॥ ५२ ।। जिही असत्याची पाहूनि आण । ज्यांमाजी सत्य सप्रमाण । जे सदा सत्यत्वे सपन्न । हे मुख्य लक्षण साधूंचे ॥ ५३ ॥ या नाय सत्य सार । सतलक्षण साचार । हा चौथा गुण संघर । अनवद्य अपार ते ऐका ॥५४॥ निंदा असूयादि दोप समस्त । निजात्मबोधे प्रक्षाळित । अत्यंत पवित्र केले चित्त । अनिदित निजबोधे ॥५५॥ गुरुआज्ञातीर्थी न्हाला । न्हायोनि सर्वागी निवाला । त्रिविधता सोडवला । पवित्र झाला मद्रूपें ।। ५६ ॥ काय सागू त्याची पवित्रता । तीय मागती चरणतीया । मीही पदरज वाछिता। उतराची कथा कायसी ॥५७॥ कृष्ण ह्मणे उद्धया। हा अनवध गुण पाचवा । ऐक आता सहावा । सम सा समभावे ॥ ५८ ॥ निजरूप सर्वसमता । समचि देखे सर्वा भूता । निछोप निमाली विषमता । जेवीं सैधवता सागरी ॥ ५९॥ नाना अलंकार पदार्था । सोनेपणे विकत घेता । ते ते पदार्य न मोडिता । स्वभावता सम सोने ॥ ८६० ॥ तैसे नाना आकार नाना नाम । अवघे जग दिसे चिपम । साधूचि चिद् सर्व सम । न देसे विपम निजबोधे ।। ६१ ॥ ऐशिया समसाम्यावस्थेसी । दैवें आलिया सुखदु खासी । तेही मुकली हंभावासी । सहजे समरसीं निजसाम्य ।। ६२ ।। सव्ये मिनल्या महानदीसी । अपसव्ये आल्या गावरसासी । गंगा दोहातेही संमरसी । गुणदोपासी उडवूनी ॥ ६३ ॥ तेथ पवित्रअपवित्रता । बोलूचि न ये सर्वथा । गोडकडूपणांची वार्ता । निजागें समता करी गगा।।६४॥ तैसे सुखदुःखाचे भान । साधूसी समत्वे समान । सदा निजबोधे सपन्न । हे अगाध लक्षण सताचें ॥६५॥ नटिया एकचि एकला। गायव्याघ्राचे सोंग अवगला । भीतरील खेळ्या जै वोळसिला । तै फिटला भवभ्रमू ॥ ६६ ॥ तैशी भयाभयवार्ता । द्वैतभावें उठी सर्वथा । साधु उभयसाम्य पुरता । भय. निर्भयता तो नेणे ।। ६७॥ द्वंद्वसाम्य परिपूर्ण । साधूचा हा सहावा गुण । ऐक सातवे लक्षण । परोपकारीपण तयाचे ॥ ६८ ।। पत्र पुष्प छाया फळ । त्वचा काष्ठ समूळ । वृक्ष सर्वांगें सफळ । सर्यासी केवळ उपकारी ॥ ६९ ॥ जो वृक्षा प्रतिपाळी । का जो पायो पाली मूळी । दोनीते वृक्ष पुष्पी फळीं । समानमेळी सतुष्ट ।। ८७० ॥ मोडूनि फळे आलिया वृक्ष । १ पखासाली २ जिवत राहात ३ चाहिली ४ चळकट ५शुद्ध ६ गुणावर दोषाचा आरोप करणे सोडला ८ द्वैतभाव क्षारत्व १. अनेक ११ ऐक्यामध्ये १२ डायीकडून १३ मिळाल्या १४ उजवीकडून १५ एक्स्वरूप करून सोडिते १६ आत्मज्ञानान १७ नद, सोंग घेणारा १८ नटला, सोंग भेतले १९ आता शेळ्या २० मोड़न येणे-फळानी लगटर्ण शनिवनियोळिया मोहोनि माला । तरि तो काउळियासीच मुकाळ झाला" (ज्ञानेश्वरी भ. ९-४३६)