Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ एकनाथी भागवतः विवेकहीन उपजले । जैसे धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आले । नेवीण गेलें स्वराज्य ॥ ३६॥ तैसें वैराग्य विवेकेंवीण । केवळ आंधळे अनधिकारी जाण । नाही सन्मार्गदेखणेपण । वृथा परिभ्रमण तयाचें ॥ ३७॥ जो विवेके पूर्ण भरित । त्यावरी वैराग्य वोसडत । माझी जिज्ञासा अद्भुत । तेंचि निश्चित सागतू ॥ ३८ ॥ ___ण्व जिज्ञासयाऽपोय नानास्वभ्रममारमनि । उपारमेत विरज मनोमय्यप्यं मर्यगे ॥ २१ ॥ नित्यमुक्त अध्ययो । स्वरूप जाणावया पहा हो । ज्याचा लागला दृढ भावो । आन आठवो नाठवे ॥ ३९ ॥ ऐशी मज जाणावयाची अवस्था । त्या नाव बोलिजे जिज्ञासता । माझे प्राप्तीलागी सर्वथा । पांडित्यमान्यता तो नेघे ॥ ६४० ॥ देहादि अध्यासू आपुल्या ठायीं । श्रवणे मनने मिथ्या केला पाहीं । दृढ विश्वास गुरूच्या पायीं । पूर्णब्रह्माच्या ठायीं निर्धारू ॥४१॥ तेथ पुढारी चालावया वाट । भगवद्भजनी अतिउद्भट । कां सांडोनि कर्मकचाट । ध्याननिष्ठ तो होय ॥ ४२ ॥ तेथ ध्येय ध्याता ध्यान । न दिसे निपुटीचे भान । कोदले चैतन्यघन । वस्तु सनातन तो पावे ॥ ४३ ॥ तेथ कैंचा कर्ता क्रिया कर्म । फिटला नानात्वाचा भ्रम । सवाह्य कोंदले परब्रह्म । जाला, उपरम गुरुकृपा ॥४४ ॥ सर्वगत सर्वकाळ । सर्वदेशी सर्वी सकळ । वस्तु असे जे केवळ । तेथ निश्चळ निजबोधू ॥ ४५ ॥ ऐशिये वस्तूची धारणा । ज्याचेनि न करवे जाणा । तरी सुगम उपाया आना । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ४६॥ यद्यनीशो धारयितु मनो ब्रह्माणि निश्चलम् । मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्ष समाचर ॥ स्वभावता मन चंचळ । विषयवासना अतिचपळ । निर्गुण ब्रह्मीं केवळ । नाहीं बळ प्रवेशावया ॥४७॥ तरी सांख्य योग सन्यासू । हा ना करावया आयासू । माझिया भक्तीचा विलासू । अतिउल्हासू करावा ॥४८॥ मागें बद्धमुक्तांचे निरूपण । सांगीतले, मुक्तांचें लक्षण । वृथा शान्दिकांचे शब्दज्ञान । तेही व्याख्यान दाविले ॥ ४९ ॥ आतां आपुली निजभक्ती । सागावया उद्धयाप्रती । अतिआदरें श्रीपती । भक्तीची स्थिति सांगतु ॥६५० ॥ उद्धवा चढत्या आयडी मत्कर्म । जे भक्तीसी विकावा मनोधर्म । माझें स्मरावे गुणकीर्तिनाम । नाना सभ्रमविनोदें ॥५१॥ माझेनि भजने कृतकृत्यता । दृढ विश्वास धरोनि चित्ता । भजनी प्रवावे सर्वथा । अविश्रमता अहर्निशीं ॥५२॥ माझ्या भजनाच्या आवडी । नुरेचि आराँणुकेसी वाडी । वायां जावों नेदी अर्धघडी । भजनपरवडी या नांव ॥ ५३॥ माझ्या भजनीं प्रेम अधिक । न सांडावे नित्यनैमित्तिक । वैदिकलौकिक-दैहिक । भक्तांसी वाधक नव्हे कर्म ॥५४ ॥ आचरता सकळ कर्म । न कल्यावा फळेसभ्रम । हेंचि भक्तीचें गुह्य वर्म । उत्तमोत्तम अधिकारू ॥ ५५ ॥ उँचग न मनूनि अत्तरी । माझ्या प्रीती सर्व कर्माते करी । जो फळाशेतें कही न धरी । भक्तीचा अधिकारी तो जाणा ॥५६ ॥ पिपुरें" खावयाचे चानलाविती पिंपळाची झाडें । तेवीं कम करितां वोडेकोडें । फळाशा पुढे उठेना ॥५७॥ माझें भजन करिता । न पडे ज्ञानाची पगिस्तता। १ प्राप्त होते २ नाशरहित ३ चिंतन ४ पुटच्यानी ५ अतिआवेशी ६ कर्माचे जाळें, गुतागुत ५ व्यापलेले, ब्रह्म ८ मिनपणाचा, द्वैताचा ९ आराम १० गुरुकृपेनें १५ मन निश्चल करून ध्यान करणे १२ धम १३ वधमोक्षाचे १४ शब्दपडिताचे १५ वाढत्या प्रेमाने १६ प्रवृत्त व्हावे १७ सतत १८ समाधानाला १९ कामना. २० कटाग २१ पिंपगची फळे २२ भगद्धतीच्या आवडी २३ सटसट, प्रास