________________
अध्याय अकरावा. २८५ माझे भजने नित्यमुक्तता । जाण ममता मद्भावे ।। ५८ ॥ ज्ञानेवीण भक्ति न घडे। लणती ते शब्दज्ञान धडफुडें । भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥ ५९ ।। यालागी माझं भजन करिता । ज्ञानाचा पांग न पड़े भक्तां । देहगेहामाजी वर्तता । बंधन मद्धता लागेना ।। ६६० ॥ ज्याच्या मुखी माझें नाम । ज्यासी माझा भजनसभ्रम । ज्याच्या मनी मी आत्माराम । त्याचे दासीकाम मुक्ति करी ॥ ६१ ॥ मुक्तीमाजी विशेप कायी । वृत्ति निविपय असे पाहीं । भक्तांसी सर्व कर्माच्या ठायीं । स्फुरण नाहीं विपयांचे ॥६२॥ भक्ताचे विषयीं नाही चित्त । त्यांचा विपय तो मी भगवंत । ते सदा मजमाजी लोलुप्त । नित्यमुक्त यालागी ॥६३ ॥ भक्त विपयो सेविती । ते ग्रासोग्रासी मज अर्पिती। तेणेचि त्यासी बंदी मुक्ती । सर्वभूती मदावो॥६४॥यालागी कर्मबंधन । मद्भक्तांसीन लगे जाण । करितां माझें स्मरण कीर्तन । जगाचे बंधन छेदिती ।। ६५ ।। माझ्या भक्ताचे वसतें घर । ते जाण माझे निजमदिर । मुक्ति तेथें आठौ प्रहर । चोळगे द्वार तयांचे ॥६६॥ माझें भजन करिता । कोण्या अर्थाची नाही दुर्लभता । चहूं पुरुषार्थाचे माथा । भक्ति सर्वथा मज पंढियती ॥ ६७॥ ज्ञान नित्यानित्यविवेक । भक्तीमाजी माझे प्रेम अधिक । तैसे प्रेमळाचे मजलागी सुख । चढतें देख अहर्निशी॥ ६८॥ जेवीं एकुलते बाळक ।जननीसी आवडे अधिक । तैसे प्रेमळाचे कौतुक । चढतें सुख मजलागीं ॥ ६९ ॥ यालागी आपुलिये सवसाठी मी प्रेमळ घे उठाउठी। वरी निजसुख दें सदेंटीं। न घेत शेवटी सेवकू होयें ।। ६७० ।। प्रेमाचिया परम प्रीतीं । जेणे मज अपिली चित्तवृत्ती । तेव्हाचि त्याचे सेवेची सुती । जाण निश्चिती म्या घेतली ॥७१॥ प्रेमळाचें शेष खाता । मज लाज नाहीं घोडी धुता । शेखीं उच्छिष्ट काढिता । लाज सर्वथा मज नाही ॥७२॥ मज सप्रेमाची आस्था । त्याचे मोचे मी वाहें माथा । ऐशी प्रेमळाची सागता कथा । प्रेम कृष्णनाया चालिले ।।७३ ॥ कंठू जाला सद्गदित । अग झाले रोमाचित । धावोनि उद्धघासी खेव देत । प्रेम अद्भुत हरीचे ॥ ७४ ॥ सजल जाहले लोचन । वरुपताती स्वानंदजीवन । भक्तिसाम्राज्यपट्टामिविचन । उद्धवासी जाण हरि करी ।। ७५॥ सहजे प्रेमळाची करिता गोठी । समुख उद्धव देखिला दृष्टी । धावोनिया घातली मिठी । आवडी मोठी भकाची ॥ ७६ ॥ आनडीं पडिले आलिंगन । विसरला कार्यकारण । विसरला स्वधामगमन । मीतूंपण नाठवे ॥७७॥ नाठवे देवभक्तपण । नाठवे कथानिरूपण । नाठवे उद्धवा उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नावे ॥७८॥ प्रेमळाचे गोठीसाठी । परात्पर परतटीं । टोघा ऐक्य पडली मिठी । आवडी मोठी प्रेमाची ॥ ७९ ॥ आजि भक्तीचे निजसख । उद्धवासीफावले देख । भक्तीचे प्रेम अलोलिक । उद्धवें सम्यक विस्तारिले ॥ ६८० ॥ श्रीकृष्ण निजधामासी जाता । उद्धव जरी हैं न पुसता । तरी ज्ञानवैराग्यभक्तिकथा । का सागता श्रीकृष्ण ॥ ८१॥ विशेष भक्तिप्रेम अचुवित । उद्धवे काहिले निश्चित । उद्धवमों श्रीभागवत । झाले सनाथ तिहीं लोकी ॥८२॥ यालागी तनुमनप्राणें । उद्धवू जीव ओवाळणें । याहूनि अधिक पानणें । १ शब्दांडिल्य, निखालस पोक्त २ दास्य ३ स्वगृह ४ सेवा करीत उगी राहते ५ प्रिय परोपरीन, सद्वापान ७ शिवाय ८ शेवटी १ विचार, किंवा अभिमान १० उच्छिट ११ अजुनाची पोडी धुना १२ धर्माच्या राजसूयमर्शत उस कारतास १३ अवस्था १४ आलिंगन, १५ मषिसाम्राज्याच्या गादीवर घरापिणे १६ पटगमन १७ पैलपारी. १८ प्राप्त झाले, पले, १९ सहज, सुपार्ने २० मान्य, पूज्य २१ वर्णन करणे 14