________________
अध्याय अकरावा २८३ अवतारामाजी उत्तमोत्तम । श्रीरामकृष्णादिजन्मकर्म । नाना चरित्रे सनम । अविश्नम जे गाती ॥ १२ ॥ सेतु वापिला अवलीळा । सागरी तारिल्या शिळा । गोनधनु उचलिला हेला। दावानळा प्राशिले ॥१३॥ ताटिका वधिली एके वाणी । पूतना शोखिली तानेपणीं। अहल्या तारिली चरणीं । यमलार्जुन दोन्ही उद्धरिले ॥ १४ ॥रावणू आदळला धनुष्य वाहता । तें भंगोनि पर्णिली सीता । मथूनि चैद्यादि समस्ता । भीमकदुहिता आणिली ॥ १५॥ मारिला सुबाहु खरदूषणू । अघ बक केशिया मारी श्रीकृष्णू । सुग्रीवू स्थापिला राज्य देऊनू । येरे उग्रसेनू स्थापिला ॥ १६ ॥ मेळवूनि वानराचा पाळा । वधू केला राक्षसकुळा । मेळवून वाळा गोपाळा । मल्ला सकळा मदिले ॥ १७॥रावणकुभकर्णा केला मारू । मारिला कसचाणूरू । रामें उफिली बाळी वानरू । ठकिला महावीरू काळयवनू ॥ १८ ॥ रामें विभीषण स्थापिला । कृष्णे धर्म सस्थापिला । एक पितृवचने वना गेला । एक घेऊनि आला गतपुत्र ॥ १९॥ ही अवतारचरित्रं वर्णिता । चोरटा वाल्मीकि झाला तत्त्वता । व्यास जारपुन सर्वथा । केला सरता तिही लोकीं ॥ २०॥ या दोही अवताराची पदवी । वर्णिता दोन्ही झाले महाकवी । व्यास वाल्मीकि बंदिजे देवीं । कीर्तिगौरवीं गौरविले ॥२१॥ त्या महाकवीची कवित्वकथा । शेप नेत्रद्वारे श्रवण करिता । दोन सहन नयनी आइकता।धणी सर्वथा बाणेना ॥२२॥ हेचि कथा स्वर्गाच्या ठायी। श्रवण करावया पाहीं। इंद्र लागे बृहस्पतीचे पायीं । कीर्ति लोकत्रयीं वर्णिती ॥२३ ।। असो कथेचे महिमान । माझेनि नाममाने जाण । तारिला अजामिळ ब्राह्मण । गजेन्द्रउद्धरण हरिनामें ॥ २४ ॥ पक्ष्याचे मिकरूनी । राम या दो अक्षरस्मरणीं । महादोपाची श्रेणी । तत्काळ कुंटिणी तारिली ॥ २५ ।। माझिया नामासमान । नव्हे वेदशास्त्रशब्दज्ञान । वेदशास्त्राचा वोधु कठिण । तैसे जाण नाम नव्हे ॥२६॥ पठणमाने वेदशास्त्रवक्ता नव्हे मजेमाजीं येणेंचि सैरता । स्वभाव माझें नाम घेता । अतिपढियता मज होये ।। २७ ।। वेदशास्त्राचा अधिकारी ब्राह्मण । नामासी अधिकारी चान्ही वर्ण । जग उद्धरावया कारण । नाम जाण पें माझें ॥ २८ ॥ जेथ नित्य नामाचा उच्चार । तेथ मी असे साचार । येथ करणे न लगे विचार । नाम संधर तारावया ॥२९॥ ते माझे जन्म नाम कीर्ति गुण । जे वाचेसी नाही पठण । ते चाचा पिशाचिका जाण । घृथालापन वटवटी ॥ ६३० ॥ माझे कीतींवीण जे वदन । ते केवळ मद्यपानाचे भाजन । त्या उन्मादविटाळाभेण । नाम जाण तेय नये ॥ ३१॥ जेय उच्चारू नाहीं नामाचा । ते जाणावी वाश वाचा । गर्भ न धरी हरिकथेचा । निष्फळ तिचा उद्योगू ॥ ३२ ॥ उद्धवासी ह्मणे श्रीरगू। आइकें वापा उपावो चागू । माझा नाममार्ग मुगमू सागू । न पडे पागू आणिकाचा ॥३३॥ हरिनामेंवीण वाणी । कदा न रासायी सजनी । हाचि अभिप्रानो चक्रपाणी । प्रीति करोनि सागीतला ॥ ३४ ॥ करूनिया शब्दज्ञान । अतियोग्यता पंडितपण । तेणं माझी प्राप्ति नव्हे जाण । वैराग्येवीण सर्वथा ॥ ३५ ॥ अथवा वैराग्यही जाले । परी ते १ लीटर, सहज २ विधिली ३ शान्हेपत ४ वारली ५ वष मारला ७ गतगर्भ ८ को पाटमादा होता तो बालीक झाला सरता १. मान्य, पूज्य ११ तृमी १२ निमिरा, गांव फस्न १३ मामा पद पन्न मिळणारा १४ आषडता १५ समथ, सपळ १६ हडट, टखीप, १७ बाबर १८ मा -मीटीन