________________
२५६ एकनाथी भागवत दाता तूं मज ।। ५२ ॥ सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोन सुखावला नारायण । माझा उद्धव जाला सज्ञान । हरिखें जगजीवन डोलतु ॥ ५३॥ परमार्थी अवस्था गादी । देखोनि प्रश्नाची अतिगोडी । उद्धवासी ओवाळावया आवडी । जीव कुरवंडी करूं पाहे ॥ ५४ ॥ नुल्लंघ भत्ताचे उत्तर । फोडिले गुह्य ज्ञानभांडार । भक्तकृपा जी अपार । हरि साचार तुष्टल ॥ ५५ ॥ उद्धवाचा प्रश्न गहन । कृपा द्रवला जगजीवन । एका विनवी जनार्दन । आनं दधन वोळला ॥५६॥ त्या आनंदाचा महापूरू । शिष्यसरितेसी येईल थोरू । तेणे चिद्गासांगरू । शिष्य सत्वरू ठोकील ।। ५७ ॥ टाकोनिया ससारआस्था । जो लागला.भक्ति पंथा । तोचि अधिकारी भागवता । परमार्था ग्राहकु ।। ५८॥ ज्याचे पोटीं ससारचिंता । तो कथा ऐकतांचि दुश्चिता । चित्त चिंती ज्या ज्या अर्थी । तो सर्वथा तेथें असे ।। ५९ ॥ चित्त जंव नाही सुचित्त । तंव न कळे श्रीभागवत । गुरूवांचूनि श्रीभागवतार्थ । नव्हे प्राप्त प्राण्यासी ।। ७६० ।। जो ससारापासोनि विरक्त । गुरुचरणी अतिअनुरक्त । त्यासीच फावला एक परमार्थ । फळे भागवत तयासी ।। ६१ ॥ देखता कृष्णाचें श्रीमुख । उद्धवा नीच नवे समाधिसुख । तरी श्रवणाची श्रद्धा अधिक । आवडी देख अनिवार ।। ६२॥ जो श्रुतिप्रतिपाद्य चिढेन । त्या श्रीकृष्णाचें गुह्य ज्ञान । पुढतपुढती होआवया श्रवण । करी प्रश्न अतियोग्य ॥ ६३ ॥ विद्याअविद्येचा निरासु । श्रीकृष्ण सांगेल परेशु । पुढील अध्याय अतिसुरसु । श्रोतां अवकाशु मज द्यावा ।। ६४ ॥ तो कृष्णउद्धवसवादू । पुढिले कथेचा अतिविनोदू । एका जनार्दनीं महाबोधू। परमानंदू प्रकटेल ॥७६५॥ इति श्रीभागवते महापुराणे श्रीकृष्णोद्धवसवादे परमहंससहिताया एकाकारटीकायां दशमोऽध्यायः॥१०॥ अध्याय अकरावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो श्रीगुरु सच्चिद्धन । वरुपताहे स्वानंदजीवन । मुमु(मयूर आनंदले जाण । हरिखें उड्डाण करिताती ॥ १ ॥ तो सजल देखोनियां मेहो। सोहंभावे फोडिती टाहो । रोमाचपिसी पसरूनि पहा हो । सत्वे लवलाहो नृत्याचा ॥२॥ नाचे स्वानंदाचेनि मेळे । तेणे सर्वांगी निघाले डोळे । पिसे देखणी जाहली सकळे । ती शिरी गोपाळे चाहिली ॥३॥ तो मेघ देखोनि सन्मुख । आर्त चातक पसरिती मुख । विदुमाने पावले सुख । नित्य निर्दोख ते जाहले॥४॥आर्ततृपाँ तत्काळ वोळे । निवाले तेणे स्वानदज । मग हरिखाचेनि कल्लोळे । सुखसोहळे भोगिती ॥५॥ सुभूमि देखोनि निर्मळ । जाणोनि वर्पती काळवेळ । वर्षों लागले जी प्रबळ । जळकल्लोळ अनिवार ॥ ६ ॥ तेणे वोलेनि कृपाभरें । शिप्यसरितेसी पूरु भरे । विकल्पवोसणे एकसरें । महापूरे वाहाविली १हान • योलावया ३ ओवाळणे ४ दृष्टि क्रू लागला ५ शिष्यल्प नदीला ६ शाागगेचा समुद्र ७ जाऊन मिल ८ स्वाश स १० श्रुति हाणजे वेद त्यानी प्रतिपादिरेला ११झानखरूप परमात्मा १२ पुन पुन्हा, वारवार १३ सहरु चिद्धन १४ मुसुक्ष हेच कोणी मोर, मयरफले जाण १५ मेघ १६ मी महा आहे या गावाने १७आरोळी १८ अष्ट सात्विक भावाचे रोमाच हाच पिसारा, पिच्छे. १९ खरूपानद प्राप्त झाल्यामुळे सर्वांगदेवणी स्थिति झाली विजातीय, सजातीय व स्वगत, हे भेद स्वरूपाचे ठिकाणी नसल्याकारणाने खरूप सांगदेसणे आहे हाणून रोमाचपिसे देसणी झाली २० आतांची तहान २१ळे, भागून जाते २२ प्राप्त झाल्यानं २३ वोमणे किवा बोसाणे दाणजे पूरामधील लाकडे,केरकचरा वगैरे "वरी तताती पोसाणे । सुमदु माची" हानेश्वरी अध्याय ७-७३