________________
अध्याय अकरावा २५७ ॥७॥ तेणें प्रवाह निर्मळजळें । चिर्दक्यसागरी सरिता मिळे । मग समरसोनि तेणे जलें। राहे निश्चळे निजरूपे ॥ ८॥ वैराग्यरावें शुद्ध केली । पृथ्वी निजबोला चोलली । कठिणत्वेविण मार्दवा आली नाही अकुरली पहुचीजे ॥९॥ अखंड वर्पता जळमेळी। वासनेची ढेपें विराली । सदायाची चोल जाली । वाफ लागली बोधाची ॥१०॥ तेथे न पेरिताचि जाण । सहज निजवीजें परिपूर्ण । अकुरली आपणिया आपण । सिद्ध सपूर्ण स्वभावे ॥ ११ ॥ ते परम कृपेचिये पुष्टी । स्वानंदे पिकली ममदृष्टी । परमानंदें कोंदली सृष्टी । ऐक्य सघसाटी जीवशिवा ॥ १२ ॥ फिटला दुःखाचा दुष्काळू । जोला सुखाचा सुकालू । वोळला सद्गुरु कृपाळू । आनदकल्लोळू सच्छिप्या ॥ १३ ॥ वरुपता निजपर्जन्यधारा । वर्षला नाना अवतारगारा । कार्यानुरूपं तदाकारा । विरोनि निराकारा त्या होती ॥ १४ ॥ त्या पर्जन्याचा वोसाडा । दैवे लागला जडमूढा । तो सरता होय सतापुढा । अवचटेंसी तोंडा जे लागे ॥ १५ ॥ तो महामेघ श्रीहरी । सद्गुरुकृपा पोळे जयावरी । तोचि धन्य चराचरी । पूज्य सुरनरी तो कीजे ॥ १६ ॥ गुरुनाम अतिघनवटु । शिप्य तारूनि अतिहळुबहु । ज्याचा आदि मध्य शेवटु । न कळे स्पष्टु वेदासी ॥ १७ ॥ तो सद्गुरु श्रीजनार्दनु । वोळलासे आनदधनु । तेणे एका एकु केला पावनु । सांडवोनु एकपण ।। १८ । एक तेंचि अनेक । अनेक तेंचि एक । हेही केले निष्टंक । स्वबोधे देख बोधोनी ॥ १९ ॥ बोधोनिया निजऐक्यता । ऐक्यें लाविले भक्तिपथा । मज प्रवर्तविले श्रीभागवता । निजकथा गावया ॥ २० ॥ तेचि श्रीभागवतीची कथा। दशमाध्यावो सपता । ते बद्धमुक्ताची व्यवस्था । उद्धवें कृष्णनाथा पूशिली ॥ २१ ॥ सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनिया श्रीकृष्ण । निजहदयाचे गुह्यज्ञान । उद्धवासी जाण सागेल ॥ २२ ॥ येणे प्रश्नोत्तरश्रयणे । उठे जन्ममरणाचे धरणे । ससाराचे खत फाडणें । फिटले लाहणे विपयाचें ॥ २३ ॥ मोक्षमार्गाचे कापड़ी। साधनी शिणती बापुडी । तिही शीघ्र यावे तातडी । जिणावया बोढी बधमोक्षाच्या ॥ २४ ॥ जे कटती जपतपसाधने । शिणती ध्येयध्यानअनुष्ठाने । ते ते शीघ्र या विदीनें । ज्ञानाज्ञाने जिणावया ।। २५ ॥ ऐशी कथा आहे गहन । श्रोतां व्हाये सावधान । एका विनवी जनार्दन । स्वानंदधन तुष्टला ॥ २६ ॥ अकरावे अध्यायी जाण । इतुकें सागेल श्रीकृष्ण । बद्धमुक्ताचे वैलक्षण्य । आणिक लक्षण साधूचे ॥ २७ ॥ तेणेच प्रसगें जाण । सागेल भक्तीचे लक्षण । अकराही पूजेसी अधिष्ठान । इतुके निरूपण हरि बोले ॥२८॥ श्रीभगवाउपाच-बद्धो मुक्त इति व्याख्या गुणनो मे न वस्तुत । गुणस्य मायामूलचाल में मोक्षो न वन्धनम् ॥ १॥ उद्धवा वद्ध मुक्त अवस्था । जरी सत्य ह्मणसी वस्तुता । तरी न घडे गा सर्वथा । ऐक आता सागेन ॥२९॥ वद्ध मुक्त अवस्था । माझे स्वरूपी नाही तत्त्वतां । हे गुणकार्याची १ एक्पणानं मिसका २ वोलापली ३ वासनारूपी दिपळे ४ बरोबरी, साम्यता ५पाहला ६ शितोडा ७ अवच शिंतोडा ८ सर्व प्रमाडाचा नाश आहे परंतु खरूप अविनाश आहे झण्च घनवट झट आहे पायांमर्य जी वस्तु फारच हलकी भरते तीच तरते, घुडत नाही परंतु भवसागरांत गुरुयतु इतकी हलफी आरे 4 आपणन पुस शिष्यासाररया युद्धणान्या वस्तूलाही तारते “गुर जेन्डा चा तेव्हढाचि तासनि ल ।” मग म०९-१९ निधयात्मक १० तगादा १५ महण करणे १२ यानेकर १३ जिंकावयास १४ पौशलानं १५ नेद