पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ एकनाथी भागवत सोनि मतांतरे । अद्वैत स्थापिलें दृढतर । हेंचि निजज्ञान साचार । चराचरवरिष्ठ ॥ ६ ॥ अद्वैतज्ञान शुद्ध चोख । ऐकोनि उद्धवा जाले सुख । हृदयीं दाटला जी हरिख । पाहे श्रीमुख कृष्णाचें ॥७॥ चालिलें सात्विकाचे भरितें । चित्त विसरले चितनाते । अश्रु लोटले जी तेथें । आप आपणियातें विसरला ॥८॥ उद्धवासी नावेक । पडोनि ठेले जी ठेक। सावध होऊनियां देख । कृष्णासमुख तो जाला ॥९॥ अद्वैतभजने जे भजते । ते भक्त कृष्णासी आवडते । ते केवों प्राप्त होय मातें । यालागी हरीते पुसतु ॥ ७१० ॥ उद्धव उवाच-गुणेषु वर्तमानोऽपि देहजेवनपावृत । गुणर्न यध्यते देही वध्यते वा कथ विभो ॥ ३५ ॥ उद्धच ह्मणे कृष्णनाथा । आत्मा देहामाजी असतां । वंधन पावे जी तत्त्वतां । की सर्वथा पावेना ॥ ११॥ गुण असतां मुक्ति घडे । की गुण गेलिया मुक्ति जोडे । हेचि सांगावे मजपुढे । अंतिनिवाडे निश्चित ॥ १२ ॥ गुण असतां मुक्ति घडे । हे सर्वथा बोलणे कुडे । ज्वर असतां आरोग्य न घडे । वृक्ष न वाढे भिरंडेंसीं ॥ १३ ॥ वाही बांधोनि पापाण । समुद्रामाजीं तरे कोण । तैसे देही असतां त्रिगुण । मुक्तपण कैसेनी ॥ १४ ॥ गुण जे रजतमादिक । त्यांचे कार्य देह देख । गुणासारिखी आवश्यक । कर्म अनेक आचरे ॥ १५ ॥ कर्माचे फळ सुखदुःख । भोगणे पेडे गा अचुक । गुणांसी मुक्ति न घडे देख । हे ज्ञाते लोक ह्मणताती ॥ १६ ॥ गुण गेलिया मुक्ती । हेही न घडे गा श्रीपती । येहीविषयी विनंती । कृपामूर्ती अवधारीं ॥ १७ ॥ गुणाचे कार्य देहेद्रिये । ते गुण जाऊनि देह राहे । भूमीविण वृक्ष होये । हे अवद्ध पाहे बोलणे ॥ १८ ॥ कारण जाऊनि कार्य राहे । हे बोलणे घडे काये 1 गुण जाता देहोचि जाये । मुक्त वर्तताहे कैसेनी ॥ १९॥ एवं गुण असतां नसतां । मुक्ति न घडे गा सर्वथा । येचिविषयीं कृष्णनाथा । तुज मी तत्त्वता पुसतू ॥ ७२० ॥ आणिक एक जगन्नाथा । तुज मी विनंती करीन आतां । गुण आत्म्यासी एकत्रता । न घडे सर्वथा निश्चित ॥ २१ ॥ भरलें मृगजळाचे तळे । चंद्रमा विवेना तेणे जळें । तेवी आत्मा गुणांसी नोकळे । स्वभावे नातळे गुणातें ॥ २२ ॥ गुण ते अज्ञानाची रोती । आत्मा स्वप्रकाश गमस्ती । त्यासमोर ते कैचे येती । मग बाधिती आत्म्यातें ॥ २३ ॥ अंधार सूर्यातें गिळी । काउळा कैलास आतळी । वागुल हनुमंतातें सळी । मशक गिळी गजातें ॥ २४ ॥ माशी पांखें गगन उडे । सगळा मेरु थिल्लरी बुडे । मृगजळी जे तारूं पडे । तै आत्मा सांपडे गुणात ॥ २५ ॥ जेवीं आकाश नातुडे जाळी । तेवी आत्मा नाकळे गुणमेळी । मा सुखदु.खांची नँवाळी। गुणकल्लोळी का भोगी ॥ २६ ॥ यापरी न घडे गा बद्धता । मा मुक्ताची कायसी कथा । कैसेनि बद्धमुक्तव्यवस्था । घड़े कृष्णनाथा ते सांग ॥ २७ ॥ येथ बद्धासी काय कारण । आणि मुक्ताची कोण खूण । एव बद्धमुक्कलक्षण । मज सपूर्ण सागावें ॥ २८॥ . कथ घर्तत विहरेरकेर्वा ज्ञायेत लक्षण । कि मुजीतीत विसृजेच्छयीताऽऽमीत याति या ॥ ३६ ॥ आता बद्धमुक्ताची स्थिती । मज सागावी श्रीपती । कोणे लक्षणे जाणिजेती । दोघे १ दुसम्याचे भत, विरुद्धपक्ष २ वारंवार तिष्ठत ३ साविक अष्टभाव प्रकट झाले ४ क्षणभर, अमळ ५८क, एकाप्रता, तादाम्य ६ मोकळेपणाने, सष्ट असें ७ वाईट, रोट ८ भोवरा ( भुगा) ९घडे १० चुकीचे, मेडेपणाच ११ सापडत नाही ११रान १३ सूर्य १४ मुट १६ . १८ माप्ती