Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ एकनाथी भागयत. हे म्या सांगीतली गुह्य गोठी । प्रकट न करावी सृष्टी । गुप्त पोटी राखावी ॥ ५९॥ काम्यनिपिद्धाचे त्याग ! तुज म्यां सांगीतले सांग । नित्यनैमित्तविभाग । तोही विनियोग परियेसीं ॥ ६० ॥ मैदर्पणे आवश्यक । करावें नित्यनैमित्तिक । तेंचि चित्ताचे शोधक । साधन मुख्य परमार्थी ।। ६१ ।। एक ह्मणती स्वधर्म निर्फळ । वर्म नेणतीच ते वरळ । स्वधर्मे होय जन्म सफळ । परमार्थफळ स्वधर्मा ॥ ६२ ॥ किडाळ झाडावया दृष्टीं । रंज देऊनि पाठींपोटीं । सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठी निजतेजें ॥ ६३ ॥ तैसा मज अर्पितां स्वधर्म । त्याचें सफळ होय निजकर्म । ऐसे नेणोनिया निजवर्म । कर्मभ्रम कर्मठा ॥६४ ॥ मज अर्णिती हातवटी । अवघड वाटेल जगजेठी । ज्यासी माझी आवडी मोटी। त्याची दृष्टी मदर्पण ॥ ६५ ॥ कृष्णी निश्चळ ज्याचें मन । त्याचे कर्म तितुकें कृष्णार्पण । त्यासी न अर्पिताही जाण । सहजें मदर्पण होतसे ॥६६॥ जो रथीं निश्चळ होऊनियां वैसे । तो न चळतांही चालतु दिसे । जाण स्वकर्म त्याचें तैसे । अनायासे मज अर्प ॥ ६७ ॥ यापरी होऊनि अंकामात्मा । सुखें आचरावे स्वधर्मा । तेणें साडूनि रजतमा । सत्वे पुरुषोत्तमा पावती ॥ ६८ ॥ वर्णाश्रमसमुद्भवा । मूळ आश्रयो भी वोळखावा । कुळकर्मनिजस्वभावा । उपासावा मी एकु ॥ ६९ ॥ वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध । जे जन्मले मुखवारुपाद । आश्रमा आश्रयो मी विशद । गर्जती वेद ये अर्थी ॥ ७० ॥ देवो देवी कुळाचार । याचे वस्तीचे मी घर । एवं मी सर्वाधार । हा कर्मी विचार देखावा ॥७१ ॥ गुज परियेसीं उद्धवा । कमोध्यक्षु मी जाणावा । कर्मी मीचि अमिलापावा । क्रियेनि धरावा मी एकू ॥ ७२ ॥ एवं कर्माआदिमध्यअती । मी अविनाशु धरिता चित्ती । ती कमचि निष्कम होती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ७३ ॥ ____ अन्वीक्षेत विशुद्धात्मा देहिना विषयात्मनाम् । गुणेषु तत्वध्यानेन सर्वारम्भविपर्ययम् ॥ २ ॥ यापरी स्वधर्म जाण । ज्याचे विशुद्ध अतःकरण । ते विषयीं उदासीन । हे वोळखण तयांचें ॥७४॥ तयासी विषयाची आस्था । नाहीं नाही गा सर्वथा । परी सर्वार्थविपरीतता । विषयासक्तता देख ती ॥ ७५ ॥ भरली मृगजळाची तळी । तेणे न पिकती साळी केळी । तैसी विषयवुद्धी जवळी । स्वसुखफळी फळेना ॥ ७६ ॥ पाहें पा विषयासक्त । कारंभी सकल्प करित । आयुःकामार्थ क्षेमार्थ । धनधान्यार्थसमृद्धी ॥७७॥ या हेतू कर्म आरभित । ते स्वकर्म नव्हे निश्चित । स्वधर्ममि मनोरथ । उपासित सर्वदा ॥ ७८ ॥ वैलाची कांस दुहितां । शिपीभरी दूध न ये हाता । तेवीं मनोरथ उपासिता। न लभे सर्वथा निजसुख ॥७९॥ कर्मचि ते नव्हे । केल्याही सिद्धी न पवे । ते विनवाहुल्य नाश पावे । विष्ट सभवे देवांचें ॥८०॥ विषयसेवनी आहे सुख । या बुद्धी शिणशिणोनि मूर्ख । पावले परम दुःखें दुःख । मुख्य याज्ञिक घालूनी ॥ ८१॥ वेदत्रयी जाणूनि चपळ । १ प्रकार २ ईश्वरार्पणसुद्धीने ३ तिर्मळ करणारें ४ बडबडे, भाद ५ सोटे, लटके ६ सोने साफ करण्याची पूड, खागी ७ ऐसा ८ कर्मश्रम ९ अर्पण करण्याचा प्रकार १० कामनारहित, निष्काम ११ "ब्राहाणोऽस्य मुरामासीद्वाह राजन्य कृत । अरू तदस्य यद्वैश्य पझ्या शनो अजायत" अशी श्रुतीच आहे १२ इच्छा, लपटता १३ विषयासक्त पुरुष सर्व कर्मे विपरीत हेतूने पाइतात १४ आयुष्य दीर्घ होण्यासाठी, कल्याणासाठी व धाधान्यसमृद्धीसाठी मी हे कर्म करितों, असा लोक कारीच सकरप करितात या हेतूनी केलेले कम ते खकर्म नव्हे १५ लोक बहुधा सधर्माच्या निमित्ताने भापमा मनोरयाचीच उपासना करितात १६ पुष्कल विनाघ्या मोगाने, १५ परम कष्ट करून,