________________
अध्याय दहावा. २२५ आह्मां सद्गुरुकृपा सदा लाध्य । गुरुसेवे आही सभाग्य । परम योग्य गुरुस्तवने ॥३४॥ सद्गुरूचे नाममात्र । तेंचि आमां वेदशास्त्र । सकळ मंत्रांवरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरूचे ॥ ३५ ॥ सद्गुरूचें तीर्थमात्र । सकळ तीर्थी करी पवित्र । गुरुचरण ते आमुचे क्षेत्र । वृत्ति स्वतत्र ते आह्मां ॥ ३६ ॥ तू पुरे पुरे ह्मणसी स्तवन । परी वर्णितां तुझे उदार गुण । अतृप्त सर्वथा नुठी मन । तुझी आण वाहातसे ।। ३७ ।। तुझे गुण वर्णावया तत्त्वता । मी प्रवर्तलों श्रीभागवता । त्वा मज लाविले भक्तिपंथा । निजकथाकीर्तनीं ॥ ३८ ॥ जय जय सद्गुरू जनार्दना। भयंगजपंचानना । एकाकी शरण आलों जाणा । तुझ्या श्रीचरणा पावलो ॥३९॥पावलों शास्त्र श्रीभागवत । अवधारा तेथींचा मथितार्थ उद्धवासी श्रीकृष्णनाय। परम परमार्थ सागेल॥४०॥ यदुअवधूतसंवादेसी लक्षणोक्त चोविसा गुरूंसी। परिमोनिया उद्धचासी । भावना नहाँसी लिंगटली ॥४१॥ ब्रह्म सर्वगत सत्य होये । मज सबाह्य कोदले आहे। तेही माझें मज ठाउके नोहे । कोण उपाये करावे ॥४२॥ ऐसी उद्धचाची चिता । कळों सरली कृष्णनाथा । तोचि उपायो सर्वथा । होय सागता अविरोधे ।। ४३ ।। श्रीभगवानुवाच-मयोदितेष्यवहित स्वधर्मधु मदाश्रय । वर्गाश्रमकुलाचारमकामामा समाचरेत् ॥ ३॥ पूर्वी वेदरूपें वर्णाश्रम । मीचि बोलिलों स्वधर्म । पर्चेरानादि वैष्णवधर्म । हे उपासनाचर्म गुह्य माझे ॥ ४४ ॥ जो वर्ण जो आश्रम । तेणेचि ते करावे स्वधर्म । आचरता परधर्म । दुःख परम पाविजे ॥ ४५ ॥ उद्धवा येव जाण । कर्ता पाहिजे सावधान । ते सावधानतेचे लक्षण । अतिविचक्षण जाणती ॥ ४६॥ कर्म चतुर्विध येथ । नित्य आणि नैमित्त । काम्य आणि प्रायश्चित्त । जाण निश्चित विभाग ।। ४७ ।। येथ कर्म आचार निश्चिती । सावधान राखायी वृत्ती । आचरावयाची व्युत्पत्ती । विचिन स्थिती सागेन ॥४८॥ नित्य आणि नैमित्तिक । हे कर्म जाण आवश्यक । साडोनिया फलामिलाख । विधिममुख आचरावे ॥४९॥ नित्यकर्म अधिक वाढे। ते नमित्ताचे आग चढे । काम्य उचंचळले विपयचाडे । तैचि पडे निषिद्धी ॥ ५० ॥ फलामिलापेंविण । नित्य नैमित्तिक जाण । कराये गा कृष्णार्पण । अर्पिती खूण जाणोनी ॥५१॥ काम्य कर्म आवश्यक । त्यजावें गा निशेप । जेवी का पमिलें चमक । परतोनि लोक न पाहती ।। ५२ ।। समूळ कामने दंडावे । तेचि काम्य कर्म साडावें । येन्हवीं कर्मत्यागुन सभवे । कामना जीवे राखता ॥५३॥ अतरी अनिवार कामना । बाह्य विरक्ती दावी जना । ते सविया निटबना । त्यागु विचक्षणा तो नव्हे ॥ ५४ ॥ कामाचेनि अधिक मदें। कम निपजती निषिद्धे । समूल कामनेचेनि छेदें। सर्व निपिद्धे, मावळती ॥ ५५ ॥ अथवा देसताचि निपिद्ध दिठी । जो हरिनामें गर्जत उठी। निषिद्ध पळे बारा वार्टी। मायश्चित्तकोटी हरिनामें ॥ ५६ ॥ जेथ हरिनामाचे उमाळे । तेथ निषिद्ध तत्काळ जळे । निपिख भका आदळे । भक्तांजवळ ते न ये॥ ५७ ॥ काम्यनिपिद्धाची कथा | भक्तासी नौतळे सर्वथा । भगवंतु रक्षी निजभक्का । दोपु तत्वता त्या नाहीं ।। ५८ ॥ नामें प्रायश्चित्ताच्या कोटी। १ पूज्य २ ससारस्पी हत्ती नाहीसा करणाच्या मिंहा भावना प्रदाला झोपली, महारूप झाली शारदपचरात्र नावाचा ५ झाते, चतुर अनेक प्रकाराने ७ अर्पण करण्याचा सूण पुट ६५-७३ ओंब्यांत सांगितली आहे ८ ओकारी ९ तैसें देख त्यजाये १० सहज, सादायया. ११ प्रेमातिरेकाचे रस.१शिवत गादी