पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ एकनाथी भागवत. सर्वथा बुडालें ॥ १३ ॥ नवल रोगाचा पंडिपाडू । गोड परमार्थ तो जाला कडू । विष प्राय विषय कडू । तोचि गोडू झाला ॥ १४॥ ते व्याधीचिया उफाडा । देतां सत्कथाकाढा । श्रवणमुखींच्या भावार्थदाढा । पाडी पुढां दांतखिळी ॥ १५ ॥ देतां तुलसीमकरद नसू । वरता जावों नेदी श्वासू । मस्तक झाडी मानी त्रासू । रोगें बहुवसू व्यापिला ॥१६॥ ऐसा रोग देखोनियां गाढा । वैद्य आचार्य घडफुडा । कृपा पाहे याजकडा । तो रोकडा वांचवी ॥ १७ ॥ निधडा वैद्य तो सुबुद्धि । जीवु गेलिया मरों नेदी । जीवेवीण यांचवी त्रिशुद्धी । अगाध सिद्धि तयाची ॥ १८ ॥ शुद्धभाग्येकरूनि जाण । तो करी कृपापूर्मावलोकन । तेंचि रोगियां अमृतपान । होय सावधान तत्काळ ॥ १९ ॥ एवं जालिया सावधान । रोगी आपणिया आपण । नित्यानित्याचे पाचन । करी सेवन साक्षे ॥२०॥ तेणें न फिटेचि जीर्णज्वरू । न तुटे क्षयाचा महामारू । हे देखोनिया वैद्यसद्गुरू । रसोपचारू मांडिला ॥ २१ ॥ तेणे अक्षररस अर्धमात्रा । दाखविताच क्षयाचा थारा । मोडूनियां शरीरा । पूर्वपरपरा अक्षय केले ।। २२ ।। दारुण चुकवावया कुपथ्य । वैराग्य राखण ठेविले नित्य । लावूनि अनुसंधानाचे पथ्य । निर्दाळिला तेथ भवरोगू ॥ २३ ॥ रोगी उपचारिल्यावरी । प्रबळ क्षुधा खवळे भारी । चित्तचिंतेच्या लाह्या करी । क्षणामाझारी खादल्या ॥ २४ ॥ काळे गोरे चतुर्वर्णचणे । आश्रमेंसी भाजिले फुटाणे । अहं सोहगुळेंसी तेणे । निःशेप खाणे तत्काळ ॥ २५ ॥ फळामिलासी आशा । चौड़ें, भरली होती खसखसा । तेही खादली घसघसां । न लगतां घांस गिळियेली ॥ २६ ॥ गूळ साखरेचा पडिपाडू । खादले कर्माकर्माचे लाडू । खाता न झणे गोड कडू । लागला झोडूं स्वइच्छा ॥ २७ ॥ ब्राहमस्मीची गोमटीं । पक्वान्ने देखिली दिठी । तीही खाऊनि उठाउठी । मायेपाठी लागला ॥२८॥ ते धार्केधार्केचि निमाली । मियात्वे नासोनि गेली । स्वानंदें पुष्टि जाली । झाडी केली भवरोगा ॥ २९ ॥ ऐसा सद्गुरु वैद्य गाढा । जेणे उपचारोनि केलों निधडी । शरण रिघावे तुजपुढा । तंव चहूंकडां तूंचि तूं ॥३०॥ तुजवेगळे आपणियातें। देखोनि शरण यावें तूतें । तव मीतूंपण हारपले "थितें । कैसेनि तूतें भजावे ॥३१॥ ज्याच्या सुटल्या जीग्रंथी। जाले आत्माराम निश्चिती । तेही अहेतुक भक्ति करिती । प्राप्ताची स्थिति हे जाणा ॥ ३२ ॥ गुरुभजनापरते सुख । मोक्ष मानिती तेही मूर्ख । मोक्ष गुरुचरणींचे रंक । विरळा लोक हे जाणती ॥ ३३ ॥ आह्मां सद्गुरुहष्टी परम योग्य । १ जोर २ व्याधी उपटण्यासाठी पालविण्याकरिता ३ तपकीर किंवा तुळशीच्या रमासारखें नाकात मोदण्याचं किंवा घालायाचे औषध ४ सरसाऊन, ५ मोठा हुशार, ६ जीवदशा घालवून मृत्यूच्या ताब्यात देत नाही देहात्मयुद्धीची जीवदशा ती सगुरुकृपेन मिथ्या झाली झणजे जन्ममरणापासून सुटतो ५ फुपारूप कासवीचे पाहणे कासवी दृष्टीन आपल्या पिलाचे संगोपन करिते ८ मतिपालट, भ्रमनिरास ९ काळजीपूर्वक १० महापूर ११ मी ब्रह्म आहे, मी देह नन्हें, असा अनुभव अधमानेच्या ठिकाणी सद्गुसने दाखविताच देहयुद्धिरूपी क्षय नाहीसा होका मला जन्ममरण नाही, व अनादि अक्षय मी भाहे, असे प्रचीतीस येतें त्रिगुणाच्या तीन माना ही गुणमयी माया अविद्या अर्थमाना ही मूळ माया किंवा विद्या ही सर्वसाक्षिणी तुर्यावस्था हिचे ठिकाणां द्वैत आहे अर्वमाचा भोलाइन विंदूमध्ये शिरकाव झाला हाणजे पूर्ण गत बालें १२ अव्याहत आत्मानात्मचिंतनाचें. १३ सोह भनुभवाने भह देही-अमुक चूर्णाचा व अमुक आश्रमाचा हैं विशेष जार्ने १४ ब्रह्माहमस्मि हा मूळ मायेंतील अनुभव तो घेऊन वरच्या पायरीवर गेला दणजे माया नाहीशी झाली १५ भीतीनंच १६पाहतान दिसेताही झाली.१७भारोग्ययुशा. १८असलेले.१९मी जीव भाहें ही कल्पना निमाली