________________
एकनाथी भागवत. देह जैपासोनि जाला । तैपासूनि मृत्यु लागला । जेवीं सा चेडूक धरिला । गिळू लागला लवनिमि ॥ ३६॥ साप वेडूकातें गिळी । बेडूक मुखें माशांतें कवळी । तैशी मृत्युमुखी पडली । विषयभुली झोंबती ॥ ३७ ॥ येथ आळसु जेणे केला । तो सर्वस्वं नागवला । पिता परमार्थ हातींचा गेला । आवर्ती पडला भवचक्रीं ॥ ३८ ॥ ऐसें जाणोनि यदुराया। देहाचिया लवलाह्या । परमार्थ साधावया । ब्रह्मोपायौं उद्यत व्हावे ॥ ३९ ॥ छेदोनियां आळसासी । दवडूनियां निद्रेसी । आत्मचिंतन अहर्निशीं । अविश्रयेसीं साधावे ॥३४०॥ रणी रिघालिया शूरासी । न जिणता परचनासी । विसांवा नाही क्षत्रियांसी । तेणे वेगेंसी साधावे ॥ ४१ ।। साधावया आत्मलग्न । सावधान विजवराचे मन । तेणें साक्षे आपण । सायुज्यलग्न साधावे ॥ ४२ ॥रायाचें एकुलतें एक । चुकत्या अवचटें वाळक । तो जेवीं शोधी सकळ लोक । तेवी निजसुख साधावें ॥४३॥ काळाचा चपेटघात । जंव वाजला नाही येथ । तंव साधावया परमार्थ । आयुष्य व्यर्थ न करावे ॥४४ ॥ नरदेहींचेनि आयुष्ये । प्रपंचाचेनि हरु । विपयाचेनि विलासे । भोगपिसे नर जाले ॥ ४५ ॥ पश्चा. दियोनींच्या ठायीं । विषयांवांचोनि आन नाही । तोचि विषयो नरदेहीं । वाढविल्या कायी हित जाले ॥ ४६ ।। विचारितां विवेकदृष्टी । विषयांसी प्रारब्धे भेटी । घृथा करितां आटौटी । मुद्दतुदी नरदेहा ॥ ४७ ॥ नरदेह परम पावन । पावोनि न साधी ब्रह्मज्ञान । तो लांडा गर्दभ जाण । पुच्छेचीण दुपायी ॥४८॥ अपरोक्षैज्ञानेवीण वांझट । उदरार्थ दभ खटपट । जेवीं मदिरापानी मर्केट । उडे उभट तडतडां ॥४९॥ ब्रह्मज्ञानेवीण शास्त्रज्ञ । ते अधारीचे खद्योत जाण । अज्ञाननिशीमाजी तेज गहन । सूर्योदयीं कोण त्यां देखे ॥ ३५० ॥ ब्रह्मज्ञानेवीण संन्यासी । नटाच्या ऐसें मुंडण त्यांसी । सोकले मिष्टानभिक्षेसी । वृथा गेरूंसी नाशिलें ॥५१॥ मनी विषयांचे अभिलापण । धरूनि करिती वेदाध्ययन । ते वर्षाकाळींचे दुर्दुर जाण । कर्दमपाने जल्पती ॥ ५२ ॥ विषयप्राप्तीलागी मौन । तें वकाचे वकध्यान । विषयवुद्धी जे गायन । तें खेरी देखोनि खर भुंके ।। ५३ ॥ विषयालागी उपन्यास । नाना युक्तीचे विलास । जेवी पिंड देखोनि वायस । करिती बहुवस अतिशब्द ॥ ५४ ॥ पोट भरावया भीड । सैरों वाजविती तोंड । तैसे विपयालागी वितंड । शास्त्रपाखंड बोलती ॥ ५५ ॥ विपयवासना धरूभि थोर । वाह्य मिरविती आचार । जेवीं कागांचा शौचाचार । विष्ठातत्पर मानसीं ॥ ५६ ॥ हृदयी धरूनि जीविका चाग । करिती अग्निहोत्रयाग । जेवी वेश्या विकोनि अग । चालवी साग ससारा ॥५७॥ नरदेहीचा हाचि स्वार्थ । साधावा चौथों पुरुषार्थ । तो न करिता जो कां अर्थ । तो अनर्थ जाणावा ॥५८ ॥ साधीना देही ब्रह्मज्ञान । तो श्वानसूकरांसमान । अथवा १ अत्यल्प काळात २ पकडतो ३ असलेला, सहज मिळालेला ४ ब्रह्मप्राप्तीरा ५ सतत, विसावा न घेता ६ त्याच दक्षतेने आणि श्रमान ७ आपरें ला, जीव परमात्मा याची ऐक्यता ८ चापटीचा तडासा ९ दाणकन बसला १० विषयभोगाविषयी वेडे ११ खटपट, बारा १२ मूयचाच नाश १३ दोन पायाचा, द्विपाद पशु १४ आत्म साक्षात्कारावाचून १५ व्यर्थ, फुक्ट १६ सवय झाली, गोडाघरे १७ काव, (ही वो भगवी करायाला रागते) १८ बेटुक १९ गाटवी २० आरम, उद्योग, वचनारम २१रकट तमासगीर २२ स्वैरपणाने, वाटेर तर्स, सैरावैरा २३. उसाट २४ शाबाचे भलभलते अर्थ करून मागतात २५ कावळ्याने मनात विष्ठेचे चिंतन करावं, आणि बाहेर शुद्धपणाचा दभ मिरवावा त्याप्रमाणे २६ पोट भरण्याची लालसा २७ जहाज्ञान, मोक्ष २८ ज्याला अर्थ मणताच तोच अनर्थ, 'अर्थमन भाषय त्य' आचार्य २९ सूकराप्रमाण नात विटान, पादेशलागते)