________________
१९८ एकनाथी भागवत आधिव्याधी । वहु उपाधी वाधक ॥९॥ जे उपाधीचेनि कोडें । जन्ममृत्यूंचा पूर चढे । दुःखभोगाचे साकडें । पाडी रोकडें जीवासी ॥ ९५ ॥ येणें वैराग्यविवेकवळें । छेदूनि दुराशेची मूळे । उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥९६ ॥ नित्य सिद्ध सुखदाता । तो हृदयस्थु कांत आश्रितां । विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हदयस्था मानली ॥ ९७ ॥ त्यासी देखतां अनुभवाचे दिठी । ऐक्यभावें घातली मिठी । निजसुस पावली गोरेटी । उठाउठी तत्काळ ॥ ९८ ॥ बोलु घेऊनि गेला वोली । लाज लाजोनियां गेली । दृश्य द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विपयांची ॥ ९९ ॥ सुखें सुखावले मानस । ते सुखरूप जाले निःशेष । सकल्पविकल्प पडिले वोसें । दोषों सावकाश निजप्रीती ॥३००॥ नावद पडलिया उदकात । विरोनि तया गोड करित । तेवीं निराशी पावोनि भगवंत । समरसत स्वानंदें ॥१॥ तेथ हेतूसी नाही ठावो । निमाला भावाभावो । वेडावला अनुभवो । दोघा प्रीती पाहाहो अनिवार ॥२॥ सांडूनि मीतूंपणासी । खेंच दिधलें समरसी । मग समाधीचिये सेजेशी । निजकांसी पहुडली ॥३॥ झणे मायेची लागे दिठी । यालागी स्फूर्तीचिये कोटी । निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥ ४॥ ऐसी समाधिशेजेसी । पिंगला रिघे निजसुखेंसीं । अवधूत ह्मणे यदूसी । वैराग्य वेश्येसी उपरमु ॥५॥ वैराग्य छेदिले आशापाश । पिगला जाली गा निराश । निराशेंसी असमसाहस । सुखसंतोष सर्वदा ॥ ६॥ आशा हि परम दु ख नैराश्य परम सुखम् । यथा सछिद्य कान्ताशा सुस मुवाप पिङ्गला ॥ ३ ॥ आशा तेथ लोलुप्यता । आशेपाशी असे दीनता । आशा तेथ ममता । असे सर्वदा नाचती ॥७॥ आशेपाशी महाशोक । आशा करवी महादोखें । आशेपाशी पाप अोख । असे देख तिष्ठत ॥ ८॥ आशेपाशी अधर्म सकळ । आशा मानीना विटाळ । आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी ॥९॥ आशा अंत्यजातें उपासी । नीचसेवन आशेमाशी । आशा न सांडी मेल्यासी । प्रेतापाशी नेतसे ॥३१०॥ आशा उपजली अनंतासी । नीच वामनत्व आले त्यासी । आशा दीन केलें देवासी । कथा कायसी इतरांची ॥११॥ जगाचा जो नित्य दाता । तो आशेने केला भिकेसवता । वैऱ्याचे द्वारी झाला मागता । द्वारपाळता तेणे त्यासी ॥१२॥ आशा तेथ नाहीं सुख । आशेपाशी परम दुःख । आशा सर्वांसी वाधक । मुख्य दोप ते आशा ॥ १३ ॥ ज्याची आशा नि शेष जाये । तोचि परम सुख लाहे । ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धी राहे दासीत्वे ॥१४॥ निराशाचा शुद्ध भावो । निराशापाशी तिष्ठे देवो । निराशाचे वचन पाहाहो । रावो देवो नुलंघी ॥ १५ ॥ निराश तोचि सद्बुद्धि । निराश तोचि विवेकनिधी । चारी मुक्ती पदोपदी । नैराश्य आधी वंदिती ॥ १६ ॥ निराशा तीर्थाचे तीर्थ । निराशा मुमुक्षुचा अर्थ । निराशेपाशी परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥ १७ ॥ जाण नैराश्यतेपाशीं । वैराग्य होऊनि १सकट २ दृष्टीने ३ गोरी, मुदरी ४ ओसाड ५ वी व आत्माराम ६ साखर ७ कदाचित् ८ मूळ स्फूर्ति उत्पा होर्ताक्षणी मन तिचे ग्रहण करितें व इद्रियांकइन ते काय पडवून आणते, अशा रीतीने सर्वांचे मूळ जी स्कर्ति तीच मओयादा साकिसरी दाणने माया नाहीशी झाली ही पी स्फूर्ति तीच मूरमाया ९ अत्यत, अनिवार १० मोठाली पात ११मिवारी १२ समानद १३ आठही सिद्धी १४ आशा ज्यांनी जिंकली आहे त्याचा