पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत, एवं सुर नरलोक लोकीं । आत्ममरणे सदा दुःखी । ते केवीं भार्येसी करिती सुखी। भजावें मूखी ते ठायीं ॥ ५४ ॥ धन्य माझी भाग्यप्राप्ती । येचि क्षणी येचि राती । झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति तुष्टला ॥ ५५ ॥ . नून मे भगवान्प्रीतो विष्णु केनापि कर्मणा । निर्वेदोऽय दुराशाया यन्मे जास सुसायह ॥ ३६॥ . ' ये जन्मींचे माझे कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म । मज तुष्टला पुरुपोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥ ५६ ॥ मज कैचे पूर्वजन्मी साधन । ज्याचें नाम पतितपावन । कृपालु जो जना. र्दन । त्याचे कृपेने हे घडलें ॥ ५७ ॥ दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालची संसारू। तिसी मज वैराग्ययुक्त विचारू । विष्णु साचार तुष्टला ॥ ५८ ॥ जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हते मी आपण । योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एक ॥ ५९॥ यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ । तेणे कृपा करून येथ । केले विवेकयुक्त वैरागी ॥ २६० ॥ तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटले दुःख । मज झाले परम सुख । निजसंतोख पावले ॥६१॥ दुःख आदळतां अगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी। भगवंतें कृपा केली कैशी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥ ६ ॥ ___ मैव स्युभन्दभाग्याया रेशा निर्वेदहेतव । येनानुबन्ध निहत्य पुरप शममृच्छति ।। ३७ ॥ अंगी आदळतां दुःखद्वंद्व । अभाग्यासी ये सबळ क्रोधार्थिता 'विवेक होय अंध। भाग्यमंद ते जाणा ॥ ६ ॥ दुःख देखतांचि दृष्टी । ज्यासी वैराग्य विवेकेंसी उठी । तेणे छेदूनि स्नेहहृदयगांठी । पावे उठाउठी निजसुख ॥ ६४॥ पुरुषासी परमनिधान । विवेकयुक्त वैराग्य जाण । तेणे होऊनिया प्रसन्न । समाधान पावती ॥ ६५ ॥ मी पूर्वी परम अभाग्य । महापुरुषांचें जें निजभाग्य । ते भगवंतें दिधले वैराग्य । जाले श्लाघ्य मी तिही लोकी ॥६६॥ तेनोपकृतमादाय शिरसा माम्यसङ्गता । त्यक्त्वा दुराशा शरण प्रजामि तमधीश्वरम् ॥ ३८ ॥ कृपा करोनि भगवंतें । निजवैराग्य दिधलें मातें । तेणें सांडविले दुराशेतें । ग्राम्य विपयांते छेदिले ॥ ६७ ॥ तो उपकार मानूनिया माथा । त्यासी मी शरण जाईन आतां । जो सर्वाधीश नियता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥ ६८॥ सन्तुष्टा अधत्येतद्यथालाभेन जीवती । विहराम्यमुनवाहमात्मना रमणेन वै ॥ ३९ ॥ शरण गेलियापाठी । सहज संतुष्ट मी ये सृष्टी । स्वभावे सत्श्रद्धा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ।। ६९ ।। मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा । जो कां पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा बालभू ।। २७० ।। ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चिती । भगवजनाची स्थिती । अतिप्रीती का ह्मणसी ॥ ७१॥ मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी । तारकु तोचि भवसागरौं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥ ७२॥ १ पूर्वपुण्याने २ जननेंद्रियाच्या द्वारान ३ सचित ४ विरक ५ कोसन्ता ६ उपजत नाहीं ७ असणारा नेहसुहदगाठी ९मोलवान ठेवा १० संपन्न 11मी शरण गेल्यै मणजे आपल्यासह सर्व जगारमाय माहस मदभवास येईल " आपुली देविण । माझे जाणिजे में एकपण । तयाचि नाव शरण मिग येणें गा" ज्ञानेश्वरी अध्याय १८-११९८ १२ सात्विक श्रदा १३ पूर्वांचे योगाने फळ भोगण्याकरिता शरीर निर्माण झाले, ते शरीर पटै पर्यत पूर्पक्मान ठरलेटेच त्याला मिळणार १४ गतर्यामी परमेश्वर १५ प्रागेश - -