पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ एकनाथी भागवत. देहाचे बांदवडी । भोगितां दुःखकोडी । संवुड बुडी बुडालीं ॥ १३ ॥ पहा पां नीचे सर्व वर्णासी । निंद्य कर्मे निंदिती कैशीं । वैराग्य उपजलें वेश्येसी । देहबंधासी छेदिले ॥ १४॥ देहबंध छेदी त्या उक्ती । वेश्या बोलिली नाना युक्ती । झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवती परीस पां ।। १५ ।। पिङ्गलोवाच-अहो मे मोह वितति पश्यताविजितात्मन । या कान्तादसत. काम कामये येन बालिशा ॥ २९ ॥ मिथ्या मोहाचा विस्तार । म्यां वाढविला साचार । माझ्या मूर्खपणाचा पार । पाहतां विचार पागुळे ॥ १६ ॥ नाही अंतःकरणासी नेम । अपार वाढविला भ्रम । असतपुरुपांचा काम । मनोरम मानितां ॥ १७ ॥ जरी स्त्रीसी पुरुप पाहिजे । तरी जवळील पुरुष न लाहिजे । हेचि मूर्खपण माझ । सदा भुजें असंतां ॥ १८ ॥ सन्त समीपे रमण रतिप्रद वित्तप्रद नियमिम विहाय । अकामद दुसभयादिशोकमोहप्रद तुच्छमह भजेऽज्ञा॥३०॥ सतपुरुपाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती । ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ति तत्काळ ॥ १९ ॥ काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्य सुख । वित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणे ॥ २२० ॥ सकळ ऐश्वर्य निजपदेसी । सतोपोनि दे रतीसी । रमवू जाणे नरनारीसी । रमणू सर्वांसी तो एकू ॥ २१ ॥ साडोनि ऐशिया कांतासी । माझी मूढता पहा कैसी । नित्य अकामदा पुरुपासी । काममाप्तीसी भैजिन्नलें ॥ २२ ॥ आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवी करिती निष्काम । त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःस परम पावले ॥ २३ ॥ त्याचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते । भयशोकआधिव्याधीते । त्यांचेनि सागात पावले ॥ २४ ॥ अहो मयाऽstमा परितापितो वृथा साङ्केत्यवृत्याऽतिविगार्थवार्तया । स्त्रैणानरादर्थतृपानुशोच्यान् क्रीतेन वित्त रतिमात्मनेच्छती ॥ ३ ॥ जारपुरुपापासोनि सुख । इच्छिते ते मी केवळ मूर्ख । वृथा परितापू केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥ २५ ॥ स्त्रैण पुरुप ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम । त्यात कृपणु तो अधमाधम । तयांचा सगम मी वांछिती ॥ २६ ॥ जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतेळता त्या भीती । योनिद्वारे जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारू ॥ २७ ॥ अल्प द्रव्य जेणे देणे । त्याची जाती कोण हैं नाही पाहणे । याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें मैं माझें ॥ २८ ॥ जया पुरुषासी देह विकणे । ते अत्यंत हीनदीनपणे । काय सागो त्याची लक्षणे । सर्वगुणे अपूर्ण ॥ २९ ॥ वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता । प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुता तो नेदी ॥ २३० ॥ ऐशियापासाव सुख । वाछिता वाढे परम दुस । जळो त्याचे न पाहें मुस । बोकारी देख येतसे ॥ ३१ ॥ एव जारपुरुषाची स्थिती । आठविता चिळसी येती । पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति विटली ॥ ३२॥ पेदसान्यांत २ सयळ ३ निख ४ पांगळा होनो ५ मिथ्या लबाड पुल्यांची इच्छा ६ असत झणजे दुष्ट पुरुष भशापा सदा उपभोग पेत ७ सर्वव्याप्त परमेश्वराची ८ धन देणारा ९ अकल्पित १० आत्मपदासह ११ रतले. १२ सताप, मारा ११दुर १४ जवळ येण्गाला १५ उदरनिर्वाहाचे साधन १६ अशा पुरुषापासून