पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा येविपी मधुमाशी गुरु केली ।। १२ ।। रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसग्रहो करी मधुमाशी । तो सग्रहोचि करी घातासी । मधु न्यावयासी जे येती ॥ १३ ॥ सग्रहो यला. चिया चाडा । मोहळ वांधिती अवघडा कडा । ते दुर्गमी रिगू करिती गाढा । अर्थचाडा मधुहर्ते ॥ १४ ॥ का झाडितां मोहळासी । नाशु होतसे माशियासी । सग्रहाची जाती ऐसी । जीवघातासी करवितु ॥ १५ ॥ ऐसे देखोनियां जनीं । भक्तभिक्षुकयोगिसजनी । सग्रहो न करावा भरवसेनी । नाशु निदानी दिसतुसे ।। १६ ॥ आचरावे सत्कर्म । सनहावा शुद्ध धर्म । हेचि नेणोनिया वर्म । धनकामें अधम नाशती ।। १७ ।। अर्थ विनाशाचे फळ । दुसरें एक नाशाचे मूळ । विशेष नागाचे आहळबाहळ । स्त्री केवळ घोळख पा ॥ १८ ॥ मूळनागासी जीविता । कनक आणि योपिता। जव जव याची आसक्तता । तंव तव चढता भवरोगू ॥ १९ ॥ कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनीहुनी । तोचि जनार्दनू जनीं । भरवसेनी ओळस पा ॥ १२० ॥ जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें स्त्रियेसी । येचिविपयी मदगजासी । गुरु विशेपी म्यां केला ॥२१॥ पदापि युवती भिक्षुन स्पशेदारवीमपि । स्पृशन्करीव यध्येत कारण्या अगमहत ॥ १३ ॥ __ पहा पा पटिहायन भद्रजाती । त्यांपुढे मनुष्य ते किती । ते हस्तिणीचे अगसगी । बंधन पावती मनुजाचे ॥ २२ ॥ जो दृष्टी नाणी मनुप्यासी । तो स्त्रियों यश केला मानवासी । त्याचेनि बोले उठी वैशी । माथा अकुशी मारिजे ॥ २३ ॥ एव जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ सन्यासी । तिहीं देखोनिया योपितासी । लागवेगेंसी पळावे ।। २४ ।। नको त्रियाची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी । स्त्री देखताचि दिठी । उठाउठी पळावे ॥ २५ ॥ पळता पळता पायातळीं । आल्या काथची पुतळी । तेही नातळावी कुशळीं । निर्जीव स्त्री छळी पुरुपातें ॥ २६ ॥ अनिरुद्धं स्वमी देखिली उसा । तो धरूनि नेला चित्ररेखा । बाणासुरें बांधिला देखा । कृष्ण सखा जयाचा ॥ २७ ॥ त्यासी सोडवणेलागी हरी । धावता आडवा आला कामारी । युद्ध जाले परस्परी । शस्त्रास्त्री दारुण ॥ २८॥ एवं हरिहरा भिडतां । जो वांधला स्वनीचिया कांता । तो सहसा न सुटेचि शोचिता । इतराची कथा कायसी ॥ २९ ॥ पहा पा स्वमीचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता । मा साचचि स्त्री हातीं धरिता । निर्गमता त्या कैची ॥ १३० ॥ पुरुप आपणया हणविती । शेखी स्त्रियाचे पाय धरिती । त्यासी कैसेनि होईल मुक्ती । स्त्रीसगती अध पात ॥३१॥ नाधिपरिचय प्राई कहिचिन्मृत्युमारमन । बसाधिके, स ह येत गजान्तो यथा ॥ १४ ॥ क्रीडता गजीमाजी गजपती । त्यावरी सवळ भद्रजाती । येऊनिया युद्ध करिती । निजन मारिती तयातें ॥ ३२ ॥ तो मारोनिया हस्ती । त्या हस्तिणी समम्ती । सबळ भोगी भद्रजाती । नाशाप्रती स्त्री मूळ ॥ ३३ ॥ अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंविला १ याविषयी २ यत्नाने सगृहीत केलेले मोहोळ नीट रहाचे या इच्छेन ३ मधाकरिता ४ स्थिती, चाल ५ अखेरीस ६ आळे ७ कनक आणि काता ८ सर्वाशी ९ साठ वर्षे जगणारे १० हती ११ आणीत नाही १२ दिग्गजांसी १३ जिंकण्याला १४ कडाची बी १५ ह्मणूनच तुकोया “अगतात "लियाचा हा समनको नारायणा । काष्ठा या पापाणा मृत्तिकेच्या" १६ शकर, १७ सोडवे सोडिता १०रलाही १९ पंधन