पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ एकनाथी भागवत म्यां गुरु करणे । दुःख नेदितां कार्य साधणे । तीही लक्षणे परिस पां ॥ ९१ ॥ - स्तोक स्तोक ग्रसेद्रास देहो वर्तेत यावता । गृहानहिसन्नातिऐवृत्तिं माधुकरी मुनि ॥ ९॥ __ भ्रमरु रिघोनि पुप्पामधी । फूल तरी कुचुयो नेदी । आपुली करी अर्थसिद्धी । चोसंट बुद्धि भ्रमराची ॥ ९२ ॥ तैसीच योगियांची परी । ग्रासमात्र घरोघरीं । भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्था ॥ ९३ ॥ प्राणधारणेपुरते । योगी मागे भिक्षेतें । समर्थ दुर्बळ विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥ ९४ ॥ रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासी । पद्म सकोचे अस्तासी । तेचि भ्रमरासी बंधन ॥ ९५ ॥ जो कोरडे काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळी गुंतला ठाये । प्रिया दुखवेल ह्मणौनि राहे । निर्गमें न पाहे आपुला ॥ ९६ ॥ तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहे लोलुप्येसी । तेचि बंधन होये त्यासी । विपयलोभासी गुंतला ॥ ९७ ॥ ___ अणुभ्यश्च महन्यश्च शास्त्रेभ्या कुशरो नर । सर्यत सारमादद्यात्पुष्पेभ्य इव पदपद ॥ १० ॥ अतिलहान समन जें कांही। श्रमरा तेथ उपेक्षा नाहीं। रिघोनी त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥९८ ॥ थोरथोरा ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणी । त्याच्याही ठायी रिघोनी । सारांश सेवुनी जातसे ॥ ९९ ॥ तैसाचि योगिया नेटकू । शास्त्रदृष्टी अतिविवेकू न करी लहान थोर तर्क । सारग्राहकू होतसे ॥ १०० ॥ वेदाती ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुती । इतर स्तोत्री ब्रह्मव्युत्पत्ती । तेही अतिप्रीती मानितू ॥१॥ पंडितांचे वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं । तेंही अतिआदरें मानुनी । सार निवडुनी घेतसे ॥ २॥ प्रीति होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासन्यांसी । मान देतसे त्याच्या दासासी । तेचि भीतीसी लक्षुनी ॥ ३ ॥ भेसळल्या क्षीरनीरासी । निवडूनि घेइजे राजहंसी । तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥४॥ सर्वभूती भगवद्भावो । हा सारभागु मुख्य पहाहो । हे निष्ठा ज्यासी महावाहो । त्यासी अपावो स्वमीं नाहीं ॥ ५॥ भरलेया जगाआतू । सारभागी तो योगयुक्तु । यदूसी अवधूत सांगतु । गुरुवृत्तातु लक्षणे ॥ ६ ॥ गुरुत्वें म्या मानिली माशी । ऐक राया दों प्रकारेंसीं । एक ते मोहळमासी । ग्रामवासी दूसरी ॥७॥ सायतन वस्त्रन वा न सहीत भिक्षितम् । पाणिपानोदरामनो मक्षिकेव न सङ्गही ॥१॥ पहा पा घरींची माशी । वैसल्या साखरेचे राशी । हाती धरोनि घाली मुखाशी । संग्रहो तिसी पै नाहीं ॥ ८॥हे होईल सायकाळां । हे भक्षीन प्रात काळा । ऐसा सग्रहो वेगळा । नाहीं केला मक्षिका ॥९॥ तैशी योगसन्यासगती । प्राप्तमिक्षा घेऊनि हाती । तिशी निक्षेप मखाप्रती । सग्रहस्थिति त्या नाही ॥ ११० ॥ भिक्षेलागी पाणिपात्र । साठ वण उदरमात्र । यावेगळे स्वतंत्र । नाहीं घरपात्र साठवणे ॥ ११॥ . __सायतन श्वसन वा म सहीत भिक्षुक ! मक्षिका इव सहन सह तेन विनश्यति ॥ १२ ॥ सायंकाळमातम्काळासी । भक्ष्यसग्रहो नसावा भिक्षूसी । संग्रहें पावती नाशासी । १ जुरडू २ शुद्ध, निर्मक, ३ लाधला, आमोद-परिमळ, मुगध ४ कमलिनीवर नाथानी 'प्रिया' शब्दाने गोड रूपक शुचविलें आहे ५ बाहेर जाण्याचा मार्ग ६ बाल ह्मणून साविषयीं तुच्छना नाही . दूध पाणी एकत्र पेल्यास राजहस दूध तेवढे घेतो राजहसापुढे । चाचूचे भागर । तोधी जवि झगदे । क्षीरनीराचे' ॥ ज्ञानेश्वरी अध्याय १४-२०७ मुमति पालनो ९ हात हच त्याचे भाड १० मिचकासी