पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ एकनाथी भागवत. येरांसी लाटांच्या कल्लोळी । कासाकुळी करीतसे ॥ ४६ ॥ तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी । आपभये भीती आपसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥ जाल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुलंघे सागरा । तैसे नुलंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥ ४८ ॥ मळु न राहे सागरी । लाटांसरिसा टाकी दुरी । तैसाचि मलु योगियाभीतरी । ध्याने निर्धारी न राहे ॥४९॥ समुद्री मीनली ताम्रपर्णी । तेथ जाली मुक्ताफळाची खाणी । योगिया मिनली श्रद्धा येऊनी । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥ ५० ॥ जो समुद्रामाजी रिघोनि राहे । तो नानापरीची रत्ने लाहे । योगियांमाजी जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिंद्रलें ॥५१॥ जैगी समुद्राची मर्यादा । कोणासी न करबे कदा । तैगी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥ प्रवाहेंवीण जळ । समुद्री जेवी निश्चळ । मृत्युभयेवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥ ५३॥ समुद्री प्रवाहो नव्हे कहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायी । तैसे योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाही सर्वदा ॥ ५४॥ समुद्रलक्षण साधिता । अधिक दशा आली हाता । ते योगियाची योग्यता । परीस तत्त्वता सागेन ॥ ५५ ॥ समुद्रामाजी जळ । लाटाखाली अतिचचळ । योगिया अतरी अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥ समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणे काळें । सर्वथा योगी नुचबळे । योगवळे सावधु ॥ ५७ ॥ समुद्री भरते पर्वसबंधे । योगिया परिपूर्ण सदानंदें । समुद्री दुवोहटू चौदें । योगिया निजबोधे सदा सम ॥ ५८ ॥ समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर । तो सर्वां जीवासी मधुर । बोधु साचार पं त्याचा ।। ५९ ॥ जयासी बोधु नाही पुरता । अनुभवु नेणे निजात्मता । त्यासी कैची मधुरता । जेवीं अपक्वता सेदेची ॥६० ।। सागरी वरुपल्या धन । वृथा जाये ते जीवन । तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥११॥ अल्पही योगिया होये घेता । तेणें निवारी भवन्यथा । यालागी मुमुक्षी सर्वथा । भगवभक्तां भजावें ।। ६२ ।। समृद्धिकामो हीनो वा नारायणपरो मुनि । नोत्सत न शुप्येत सरिनिरिव सागर ॥ ६ ॥ वर्षाकाळी सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ । तेणें हईं हरुपेजेना प्रवळ । न चढे जळ जळाब्धी ।। ६३ ॥ ग्रीप्मकाळाचिये प्राप्ती । सरिताचे यावे राहती। ते मानूनिया खंती । अपापती चोहटेना ॥ ६४ ॥ तैसेचि योगियांच्या ठायीं । नाना समृद्धि आलिया पाहीं । अहंता न धरी देहीं । गर्बु काही चढेना ॥ ६५ ॥ समृद्धि चेंचलिया पाठी । संती नाहीं योगिया पोटीं । तो नारायणपरदृष्टी । सुखसतुष्टी वर्ततू ॥६६॥ सपत्तीमाजी असता । मी सपन्नु हे नाठवे चित्ता । दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७ ॥ दरिद्र आणि सपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता । नाहीं मपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधे ॥ ६८ ॥ या प्रपंचाचा कठिण लागू। नाशासी मूळ स्त्रीसगू । येचिविपी गुरु पतंगू । केला चागू परियेसीं ॥ ६९॥ १उसाळी २ कामावीस इतर जन लाटा पाहताच घाव, जातात. ३ खेह ४ लागलीच, पाहतांक्षी ५ व्यापारी ६ लाटावरोवर ७ मिगली ८ एका नदीचें नाव ही मलय पर्वतापासून निघालेली असून हिच्या पोटात मोत्ये असल्य आहेत, अशी प्राचीन काली हिची प्रसिद्धी होती ९ मुकीची साम १० मिळून राहतो. ११ ज्ञानरमें १२ इयत्ता १३ पाणिना व अमावास्या या तिवीस १४ भरतीओहटी १५ चद्रामुळे १६शंदाड, शंदाद कय भसल सणजे फह भराते परंतु पक झाले की लाला गोटी येते. १७ प्रवाह १८ समुद्र १९ सबंध