पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ एकनाथी भागवत तत्त्वतां । न भजे आणिकां देवां देवतां । मज सांडूनि न बचे तीर्था । माझें वचन सर्वथा नुल्लंघी ॥ १८ ॥ एवं रूपगुणकुलशील । मजसी सदा अनुकूल । पतिव्रता जे केवळ । पत्नी निर्मळ 4 माझी ॥ १९ ॥ मज सांडूनि शून्यगृही । पुत्रसहित साध्वी पाहीं । जातसे स्वर्गाच्या ठायीं । मज अपायीं घालूनी ॥ ६२० ॥ सोऽह शून्ये गृहे दीनो मृतदारो मृतमज । निजीविपे किमर्थ वा विधुरो दु ग्वजीवित ॥ ७० ॥ नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा । येथ म्यां रहावे कवण्या काजा । दुःखें प्राण जाईल माझा । लोकलाजा निदित ॥ २१ ॥ एवढे अगी वाजले दुःख । काय लौकिकी दाखवू मुख । भंगले ससाराचे सुस । जितो मूर्ख ह्मणतील ॥ २२॥ जळो विधुराचे जिणें । सदा निध लाजिरवाणे । न ये श्राद्धींचे अवतणें । सदा वसणे एकाकी ॥ २३ ॥ ऐसेनि वसतां ये लोकी । शून्य गृही एकाकी । धडगोड न मिळे मुखी । परम दुःखी मी होईन ।। २४ ॥ तास्तथैवावृतान् शिग्मित्युग्रतान्विचेष्टत । खय च कृपण शिसु पश्यन्नप्यनुधोऽपतत् ॥ ७१ ॥ ऐसे बोलोनि केले काये । मृतस्त्रीपुत्रांकडे पाहे । काळपाशी बांधिली आहे । चेष्टा राहे निःोप ॥ २५ ॥ ऐसे देखताही अबुद्धी । विवेकें न धरीचि बुद्धी । आपण जाऊनि त्रिशुद्धी । जाळामध्ये पडियेला ॥ २६ ॥ मेल्यामागे मरणे । देखों हेंचि सर्वांसी करणे । परी जन्ममृत्यु निवारणे । हा स्वाथु कवणे न धरिजे ॥ २७ ॥ पहा पां स्त्रीपुत्रांकारणे । आपुलाही जीवू देणे । परी भगवत्पदवी साधणे । हे न मैंने मने सर्वथा ॥ २८॥ त रब्ध्या लुब्धक क्रूर कपोत गृहमेधिनम् । कपोतकाम्कपोती च मिद्धार्थ प्रययौ गृहम् ॥ ७२ ॥ जाळी पडला कपोता दुर्बुद्धी । झाली लुब्धकाची कार्यसिद्धी । सहकुटुंब घेऊनि खादी । निघे पारधी निजस्थाना ॥ २९ ॥ ऐसा जो कोणी गृहमेधी । त्याही सर्वथा काळ साधी । जैसी कपोत्याची बुद्धी । तैसी सिद्धी गृहमेध्या ॥६३० ॥ वाळकांच्या काकुळती । मरण पावली कपोती । ऐसे देखत देखता दुर्मती । तेथ निश्चिती उडी घाली ॥ ३१ ॥ यापरी तो कपोता । कुटुबाची मेधा वाहता । मरण पावला सर्वथा । विवेकु चित्ता न धरीचि ॥ ३२ ॥ एव कुटुम्ब्यशान्तारमा द्वन्द्वाराम पतनियत् । पुष्ण कुटुम्ब कृपण मानुबन्धोऽवसीदति ॥ ७३ ॥ ऐसा कुटुंबी गृहस्थु । कुटुंबपोषणी आसक्तु । विषयवासना अशांतु । पावे घातु सकुटुंब ॥ ३३ ॥ गृहासती गृहाश्रमु । तो केवळ द्वंद्वाचा आरामु । कपोत्या ऐसा पडे भ्रमु । वृथा जन्म दवडावा ।। ३४॥ य प्राय मानुप लोक मुक्तिद्वारमपावृतम् । गृहेषु सगवत्सतस्तमारूदच्युत विदु ॥ ७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्वधे सप्तमोऽध्याय ॥७॥ येवोनिया कर्मभूमीसी । जो पावला उत्तमदेहासी । त्याहीमाजी उत्तमता कैसी । अंग्रवर्णासी पै जन्म ॥ ३५ ॥ आलिया मनुष्यदेहासी । मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी । लव निमिप सर्व दिशी । यावज्जन्मेसी मोकळा ॥ ३६ ॥ इतरां वर्णाची हे , गती । मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती । ते सदा मुक्तचि असती । वृथा आसक्ती गुंतले ॥ ३७॥ विद्वांस आणि, वैराग्य । तें ब्रह्मादिका न लभे भाग्य । वृथा आसक्ती केले अभाग्य । शिश्नोदरा साग १ जात नाही २ सक्टात ३ कडाडरें, कोसटर ४ दावू' ५जीवत राहिला असता ६ मनभार्याचे ७क्षणाचं बोलावणे ८ नड, मूर ९ हकनाक १० मोक्ष ११ मनाला भावडत नाही १२ भ्रमिष्ट १३ गृहस्थाश्रमी पुरुष १४ आवड, आसक्ति १५ अतृप्त १६ ग्राह्मणवर्णामध्ये १७ दार, १८ पडित.