________________
१६६ एकनाथी भागवत. प्रपंच निजवोधे असे धूतु । यालागी वोलिजे अवधूतु । येन्हवीं विख्यातु ब्राह्मणू ॥ ७१॥ अहं धुईव तो अवधूतु । तोचि योगी तोचि पुनीतु । जो कां अहंकारग्रस्तु । तोचि पतितु जन्मकर्मी ॥ ७२ ॥ वार्धक्य यावे देहासी । तंव देहपण नाही देहापासीं । रिंगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥ ७३ ॥ आणिकही त्याची लक्षणे । निर्च नया बोधु मैळी नेणे । भोगिजे नित्य नूतनपणे । परम तारुण्ये टवटवला ।। ७४ ॥ निजवोधाचिया सत्ता । द्वैत जितिले तत्त्वता । ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा, त्या नाहीं ॥ ७५ ॥ ऐशी लक्षणे निर्धारितां । अवधूत निजबोधे पुरता । यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥ ७६ ॥ करूनि साष्टाग दंडवत । अति नत्र श्रद्धायुक्त । हात जोडूनि पुसत । प्रसन्नचित्त रायाचें ॥ ७७ ॥ यदुरुवाच-कुतो युधिरिय ग्रहकर्तु सुविशारदा । यामासाद्य भवालोक विद्वाश्चरति बालमत् ॥ २६ ॥ अपूर्व बुद्धि हे स्वामी । तुमचे ठायीं देखों आली । जे न लभे यमनियमी । कर्मधर्मी आचरतां ।। ७८ ॥ दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी काही न करूनि निश्चळ । अकर्तात्मवोधे तूं केवळ । जैसे वाळ अहेतुक ॥ ७९ ॥ तूं वालाऐसा वर्तसी । परी वालबुद्धि नाहीं तुजपासीं । सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसे आह्मासी दिसतसे ॥ २८० ॥ येवोनिया या लोकासी । पावोनियां नरदेहासी । सार्थकता तुझ्याऐसी । आणिकापाशी न देखों ।। ८१॥ प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानया । हेतुनैव समीहन्ते आयुपो यशस श्रिय ॥ २७ ॥ प्रायशा ये लोकी लोक । धर्मअर्थकामकामुक । येचिविखी ज्ञान देख । आवश्यक करिताती ।। ८२॥ आही स्वधर्म करितों ह्मणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती । शेवटीं गायत्रीचे फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥ ८३ ॥ वेदोक्त आह्मी करितों याग । संस्थापितों वेदमार्ग । शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वाछिती ॥ ८४॥ एक ह्मणती आह्मी स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक । समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥ ८५ ।। दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंविती । देवपूजा झळफळीत दाविती । शंख लाविती दों हाती ॥८६॥ आयुष्यदानी पुण्यपुरुष । आह्मी चिकित्सक अहिंस । स्थावर जंगम जीव अशेप । मारूनियां यश मिरविती ॥ ८७॥ यश वाढवावयाचे कारण । तुळापुरुष करिती दान । देहो मूत्रविष्ठे परिपूर्ण । धन, त्यासमान जोखिती ॥८॥परी परमार्थाचिया चाडा कोणी वेचीना कपडा। भल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥ ८९ ॥ पूर्वी अदृष्टी नाही प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती। श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें न भजती अभाग्य ॥२९०॥ लक्ष्मी विश्वगुरु हरीची पली। तीते जो तो राखे अमिलापूनी । नेदिती हरीची हरीलागोनी । त्याते पचनी हरि पचवी ॥११॥रोगत्यागें आयुष्य मागती । यालागी सविता उपासिती। देहो नश्वर हे नाठवे चित्ती । पडली भ्राती निजपदा ॥९२॥ एवं आयुष्य-यश श्रीकार्मा । १प्रमेश २ नित्य नूतन ३ मलिन होऊ ४ विचारिता ५ परिपूर्ण ६ निरिच्छ ७ बहुधा ८ धर्म, अर्थ व काम यांचीच केवळ इच्छा करणारे ९ विपयों १० श्रेय ११ उदरनिर्वाहाचे साधन १२ थोडीही, तेवेळी भीक १३ कीर्ति, प्रतिछा 'न शके विकू जोडले । स्फीतीसाठी-ज्ञानेश्वरी अध्याय १३-२०९, कीर्ति १४ वैद्य १५ देवात, नशिगत १६ लक्ष्मीची, सपत्तीची इच्छा करून 'अम आच्छादन । ई तो प्रारब्धा माधीन' हा तुकोवाप्रमाणे सर्व सताचा निश्चय असतो, झणून ते श्रीची उपासना करीत नाहीत १७ नरकात १८ सूर्य