________________
एकनाथी भागवत. भवअभवभावना | नेदिसी मना आतळों ॥ ३ ॥ आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन । सहज देशी समाधान । आनंदघना, अच्युता ॥ ४ ॥ ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्ये चरणी माथा । पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥ ५॥ उद्धवें विनविलियावरी । कृपाकळवळला श्रीहरी । निजज्ञान अतिविस्तारी । वोधकुसरी सांगतु ॥ ६ ॥ होते कृष्णाचे मानसीं । मज गेलिया निजधामासी । माझें निजज्ञान कोणापासीं । अतियलेंसी ठेवावे ॥७॥ तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहले श्रीकृष्णनाया। वैराग्ययुक्त उपदेशितां । होये सर्वथा निजज्ञान ॥ ८॥ एवं पांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी । शाप न वाधी ब्रह्मवेत्त्यांसी । हे हपीकेशी जाणतु ॥९॥ ब्रह्मउपदेशाची हातवटी । उपदेशं जाणे जगजेठी । वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणे पडे मिठी निजतत्त्वी ॥ १० ॥ नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण । हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविदान बोलतु ॥११॥ पहिले उद्धवाच्या वोलासी । अनुमोदन दे हपीकेशी । तेणे अन्वयें सावकाशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतु ॥ १२ ॥ श्रीभगवानुवाच-यदात्थ मा महाभाग तचिकीर्पितमेव में! ग्रह्मा भवो लोकपाला खास मेऽभिकाविण ॥ ॥ जो वेदांचा वेधवक्ता । जो ज्ञानियांचा ज्ञानदाता । तो श्रीकृष्णु ह्मणे भाग्यवंता । ऐकें निजभक्ता उद्धवा ॥ १३ ॥ जे तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तुझे सत्य सत्य । तेंचि माझें मनोगत । जाण निश्चित निर्धारें ॥ १४ ॥ माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां । येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥ १५ ॥ येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटीं । पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणे तुज मोटी अवस्था ॥ १६ ॥ म्यां वेगी यावें वैकुंठा । हे समस्तासी उत्कंठा । आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां जालीसे ॥ १७॥ मया निप्पादित बन देवकार्यमोपत । यदर्थमवतीणोऽहमशेन ब्रह्मणार्थित ॥२॥ ज्यालागी ब्रह्मेनि प्रार्थिले । तें देवकार्य म्यां सपादिले । अवतार नटनाट्य धरिले । ज्येष्ठत्व दिधले पळिभद्रा ॥ १८ ॥ ज्येष्ठकनिष्ठभावना । दोधामाजी नाही जाणा । कृष्णा आणि सकर्षणा । एकात्मता निजांशे ॥ १९ ॥ कुल वै शापनिर्दग्ध नक्ष्यत्यन्योन्यविग्रहात् । समुद्र सक्षमेऽहयेता पुरी च सावयिष्यति ॥ ३ ॥ उरले असे आमुचे कुळ । शापनिर्दग्ध केवळ । अन्योन्य विग्रहें सकळ । कलहमूळे नासेल ॥ २० ॥ भूमि मागोनि समुद्रापासीं । म्या रचिले द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसी बुडवील ॥२१॥ ___ यार्चेवाय मया त्सको रोकोऽय नएमङ्गल । भविष्यत्यचिरारसाधो कलिनापि निराकृत ॥ ४ ॥ ऐकें उद्धया हितगोष्टी । म्यां सांडिलिया हे सृष्टी । थोडियाचि काळापाठी । नटेदृष्टी जन होती ॥ २२ ॥ अधर्म वाढेल प्रवळ । लोक होतील नष्ट अमंगळ । ते अमंगळते. मूळ । ऐक समूल सागेन ॥ २३ ॥ मज नादता ये सृष्टी । कलि उघड न शके दृष्टी । १सयों २ एकात्मतेच्या भावाने -"किबहुना या भासा । दूताचा जेथें उपसा । फेतियाँ बसरा।। श्रीगुरु वदिला।" । अमृतानुभव प्रकरण २-५४ गुरुशिष्याच्या समसाम्याबद्दल ह प्रकरण जरूर पाहावे ३ चातुर्ये ४ गुपी, चातुर्य ५ नीलकटाला, साराला. ६ प्रादेवाने आपस्प अमीन बारटेल ८ परसरक्लहाां. वाफ. पाहणारे