पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ एकनाथी भागवत. तुझे अभेदभक्तीचे कोड । आह्मां संसारुचि गोड' । ठेचूनि त्रिगुणाचे तोंड । भक्त प्रचंड भजताती ॥ ८९॥ .' सरन्त कीर्तयन्तस्ते कृतानि गदितानि च । गत्युत्सितेक्षणदरेलि यलोकविडम्बनम् ॥ ४९ ॥ । तुझ्या चरित्राचे श्रवण । आवडी करितां कीर्तन । त्यांचा भववंधच्छेदन । बळेंचि जाण तूं करिशी ॥ ३९ ॥ पुसोनियां ससारभावो । निजपदी देसी ठायो । हाः श्रवणकीर्तनलाभ पाहा हो । आह्मी सहजें लाहो निजभक्त ॥९१॥ स्वभावे कीर्तन करितां । एवढा लाभु होये तत्त्वतां । मा तुझिये मुखींच्या कथा गातां । आपणिया देता तूं होशी ।।१२।। तुझी गोकुळींची गमनपदे । आवडी वर्णिती आनंदें । त्यांसी खादी वाऊनियां निजबोधे । कीर्तनच्छंदें नाचशी ॥ ९३ ॥ तुवां जे केली लीला । ते आवडी गातां जी गोपाळा । नित्य त्या सेवकाजवळा । अगें अगवळा तू होशी ॥ ९४ ॥ तुझें वर्णिती जे हास्यवहन । त्या भक्तांचे तूं करिशी ध्यान । त्यांचेनि बोले समाधान । स्त्रीशूद्रां जाण तूं देशी ॥९५ ॥ तुझे दृष्टीचे दर्शन । दृश्यातीतनिरीक्षण | सर्वत्र देखणेपण । कीर्तनी गान जे गाती ॥ ९६ ॥ त्यांच्या पाउलापाउलासी । आपुले सांग तू वोवाळिसी । अगं टाकूनि तिष्ठसी । त्यांपाशीं सर्वदा ॥९७॥ आपुली गुह्य ज्ञानमुद्रा । त्यांसी अर्पिसी तू ज्ञानिनरेद्रा । निजबोधे प्रबोधचंद्रा । त्यांच्या निज द्रा तूं करिशी ।। ९८ ॥ रासक्रीडादि नाना छंद । अंगनामंगनादि प्रबंध । कीर्ति अतिगयें विशद । भावार्थे शुद्ध जे गाती ।। ९९ ।। कां ठकूनिया ब्रह्मयासी । गोपाळवत्से तूं जाहलासी । ऐसऐसिया विनोदांसी । हुपीकेशी जे गाती ॥ ४०० ॥ त्यांसी सर्या भूती निजात्मता । देसी तू आपुली सत्ता । त्याच्या बोलामाजी वर्तता । कृष्णनाथा तूं होशी ॥१॥ मनुष्यनाथ्याचेनि योगे । जे जे केले तुवा अगें । तें गातां ऐकता अनुरागें । तरले वेगें निजभक्त ॥२॥ म्याचि केली जे जे आळी । ते त्वा पुरविली सर्व काळीं । त्या मज उपेक्षुनि वनमाळी । अंतकाळी कां जाशी ॥ ३ ॥ श्रीशुक उवाच-ण्य विज्ञापितो राजन भगवान्देवकीसुत । एकान्तिन प्रिय मृत्यमुदव समभापत ॥ ५० ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कधे पष्ठोऽध्याय ॥६॥ एव यापरी देवकीसुत । पूर्ण पूर्णाशे भगवंत । विनविला श्रीकृष्णनाथ । निजभृत्यें उद्धवे॥४॥ निजभृत्य झणणे । उद्धवासी याकारणे | निजगुज श्रीकृष्णे । त्यासी बोलणे सर्वदा ॥५॥ जेथ रिगंमु नाही रुक्मिणीसी । ठावो नाहीं वसुदेवदेवकीसी । वळिभद्रा प्रद्युम्नासी । अनवसरू यांसी जे ठायीं ॥ ६॥ ते ठायीं कृष्णाप्रती । उद्धव असे अहोराती । यालागी पै एकातीं । ज्ञाते ह्मणती तयासी ॥ ७ ॥ श्रीकृष्णासी वाकोडें । जीवापरीस जे जे आवडे । तें उद्धवासी देणे घडे । प्रेम गाढ़े भक्ताचें ॥ ८॥ देतां तो जरी नेघे । तरी धावोनि आळिगी वेगें । न घेतां देवो पाया लागे। भक्तपागें पागिली ।।९॥ यालागी कृष्णासी प्रियकर । उद्धवुचि साचार । याहूनि प्रेम थोर । नाही संधर आनाचें ॥४१०॥ १ थापड २ स्थान ३ अनुभवू ४ वाहून ५ जवळचा, निकटचा ६ अदृश्य परमह्माचे दर्शन पाहणे, दर्शन ८ ऑपादन टाक्त्तोस ९ निराकार होऊन १० ज्ञानाचा ठसा ११ आत्महिताला, कल्याणाला १२ आज्ञाधारक १३ लीडे मनुष्यरूप घेऊा १४ प्रेमाने १५ १६ प्रवेश १७ असमय 'जैसा मातेच्या वारी । अपत्या अनवसर नाहीं-ज्ञानेश्वरी अनवसर ह्मणजे तिच्यापाशी जाण्याची वदी १८ पराधीन झाला पांग झणजे पराधीनपणा पाग फेडणे, पांगम हे शब्द 'पाग' या शब्दापासूनच तिच्यापाशी झाले आहेत १९ मोठे ।