Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. + ये कैवण्यमसमासा ये चातीताश्च मूढताम् । वर्गिका लक्षणिका आरमान घातयन्ति ते ॥ १६ ॥ सज्ञानी स्वतां तरती । अज्ञानी सज्ञानां शरण येती । तेणें त्यांसी कैवल्यप्राप्ती । त्यांच्या वचनोक्तिविश्वासे ॥ ८३ ॥ जे अज्ञान ना सज्ञान । ज्यांसी केवळ ज्ञानाभिमान । त्यांचे विपयीं लोलुप मन । ते पुरुप जाण आत्मघाती ॥ ८४ ॥ साधावया अर्थ काम । जे करिती अभिचारधर्म । हे त्रैवर्णिक घोर कर्म । आत्मघाती परम ज्याचे त्या ॥ ८५ ॥ देहाचिया गोमेदिया । जे करिती अभिचारक्रिया । तेणें कम आपआपणियां । नजिला राया निजधातु ।। ८६ ।। जो स्वयें बैसली खांदी तोडी । तो खांदीसहित पडेबुडी । तेवीं काम्यकर्माच्या वोढी । क्रियेसी रोकडी अधःपात ॥ ८७॥ ___एत आत्महनोऽशान्ता अज्ञाने ज्ञानमानिन । सीदन्त्यकृतकृत्या वै कालध्वस्तमनोरथा ॥ १७ ॥ . कामी क्रोधी अतिअद्भुत । क्रूरकर्मी जे आसंक्त । तिही आपआपणा अनहित । निजात्मघात जोडिला ॥८८॥ स्वयें कर्म करिती अविधी । तेचि ह्मणती शुद्ध विधी । अज्ञान तेचि प्रतिपादी । ज्ञान निशुद्धी हणोनियां ॥८९॥ जे काम्यकर्मी छळिले । विषयबुद्धी आकळिले। निजहितासी उकले।मग अंतरले सद्बुद्धीसीं ॥ २९० ॥ गर्वादिष्वरितमुखें। गोडपणी कडू ठाके । विपप्राय विषयसुखें । अतिहेरिखें सेविती ॥ ९१ ॥ ऐशा विपयांलागी पाहाहो । आप्त मानूनि निजदेहो । रचूनि नाना उपायो । अर्थसंग्रहो स्वयें करिती ॥ ९२ ॥ हित्वारमायामरचिता गृहापत्यसुहृच्छिय । तमो विशन्त्यनिच्छन्तो वासुदेवपराङ्मुखा ॥ १८॥ । मरणेसी झंटे घेत । श्री मेळविती श्रीमंत । गृह दारा पुत्र वित्त । नाना वस्तुजातसंग्रहो ॥९३ ॥ ऐसे भोग आयासयुक्त । साडूनि ज्ञानगीं समस्त । ज्ञानाभिमाने नेइजेत । अधतमांत अतिगर्दै ।। ९४ ॥ जेथ अधाराचे डोळे । होऊनि ठाकती आंधळे । तेथ मोहरात्रीचे काळें । अंधतममेळे अधिक कौटे ॥ ९५ ॥ जया अंधारातें प्रकाशं येती । निखिल काळा होय सविता । जेथ गाढ मूढ अवस्था । अतिमौन्यता स्वयें पावे ॥९६ ॥ जेथ सुपुप्तीसी झोप लागे । आळसू आळसिजे सर्वागें । तेथ घर बांधोनि निजांगें। निंदा क्रोध दोघे सदा सती ।। ९७ ॥ तेथ भजनविमुख नरा । अधःपतन अभिमानद्वारा । जेवीं अधावी पडिला चिरा । तेवीं वारा निघों न शके ॥ ९८ ॥ जे वासुदेवीं सदा विमुख । ज्यासी हरिभजनी नाही हरिख । त्याची दशा हे अधोमुख । अतिदुखें दुःख भोगिती ॥१९॥ऐशी अभक्ताची गती । सांगीतली आहाच स्थिती । वांचूनि त्याची दुर्गती । वाग्देवता "भिती स्पष्ट वदता ॥ ३०० ॥ अभक्ताची गति बोलणे । यापरीस चाग मुकें होणे । प्राण जावो का सर्व प्राणे । परी ते दोप कोणें वोलावे ॥ १॥ राया तुझिया प्रश्नकाजी । हे दशा बोलणे पडे आजी । येन्हवीं अभक्तवाद आह्मांमाजीं । वाचेची पाजी विटाळली नाही ॥ २ ॥ यावरी आतां नृपनाथा । वक्ता आणि समस्त श्रोता । रामस्मरणे तत्वता । वाचेसी १ मोक्षप्राप्ति २ लुब्ध ३ पूर्ण ४ जारणमारण ५ लारनार्थ ६ नरकयास ७ अशांत. ८ की महामोहे आकळिले। गर्यदभादि मेद खिलिले । काळस गिळिले। सदुद्धीसी. ९मति पाने १० सगडा करीत ११ अमानात श्रुति असेंच सागते 'भसूर्या नाम ते लोका अधेन तममाऽऽता । ताले मेलाभिगच्छन्ति थे के बारमहनो जना' मगजे आत्मघातकी पुरुष गर्द अधाराने व्यापलेल्या अमुरांच्या लोकात मणोत्तर जाताा १२ दाटे १३ प्रकाश पर सागरासर १४ सूर्य, पटा १५ मूटपणा १६ खोल जागेत १७ वरदर, दिग्दर्शन करून 14 शिवाय. १६मिवे. २.जीमापणे २५ टॉक, अप्रमाग