Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ एकनाथी भागवत. पानी । ते यज्ञशेप अवघाणी । परी सर्वथा वदनी घालू नये ॥३८॥ हे विषयांचे विविध विदान । मैथुन मांसभक्षण सुरापान । यदर्थी निवृत्तीचि प्रमाण । हे मनोगत पूर्ण वेदाचें ॥३९॥ विषयांपासूनि निवृत्ती । वेद विभागें हेंचि द्योती । परी धरावी विषयासक्ती । हे वेदोक्ती सर्वथा न घडे ।। २४० ॥ चोनियों निजधन । करोनियां विवाह यज्ञ । सेवावे मद्य मांस मैथुन । हे वेदवचन कदा न घडे ॥ ४१॥ धन च धर्मकफल यतो वे ज्ञान सविज्ञानमनुप्रशान्ति । गृहेषु युआन्ति कलेवरस मृत्यु न पश्यन्ति दुरन्तवीर्यम् ।। १२ ।। नायकोनि भगवत्कथा । ज्ञानाभिमानी नोडले तत्वतां । धने परमार्थ यावा हाता । तोही स्वधर्मता न लाविती धर्मों ॥ ४२ ॥ विपयांचिया कामना । सर्वस्वे वेचिती धना । तेचि धर्मार्थ वेचिता जाणा । सांडिती प्राणा कवडीसाठी ॥ ४३ ॥ जया धनाचेनि पांगें। हा धर्मचि आलासे निजागें । जेवी पायाळाचेनि योगें । महानिधि वेगें आतुडे हातीं ॥४४॥ वीज तेथे द्रुम फळ । चदन तेथे परिमळ । जळाचे ठायीं केवळ । नांदती सकळ रसस्वाद ॥ ४५ ॥ देह तेथ असे कर्म । रूप तेथ वने नाम । धन तेथ उत्तमोत्तम । सकळ धर्म सदा वर्सती ॥ ४६॥ जेवी एकादशीव्रतयोगें । जागरी गीतनृत्यपागें । तुष्टला देवो लागवेगें। आतुडे धनयोगें निजभक्ता करी ॥ ४७ ॥ तेवी धनाचिया पाठोवाठीं । परम धर्मासी पडे गाठी । धर्म तेथ उठाउठी । ज्ञानाची भेटी विज्ञानसीं ॥ ४८ ॥ चद्रास्तव वाढती कळा । जीवनास्तव जिव्हाळा । तेवीं धनास्तव सोज्वळा । धर्माचा सोहळा धार्मिका घरी ॥४९॥ धर्म तेथ शुद्ध ज्ञान । ज्ञान तेथ विज्ञान । विज्ञान तेय समाधान । शांति संपूर्ण नादे तेथ ॥ २५० ।। एवढें फळ ज्या धनापासी । मूर्ख वेचिती विषयांसी । देहलोभे भुलली पिसी । अगींच्या मृत्यूसी विसरले ॥५१॥ जळते घरी ठेवा ठेवणे । मरत्या देहा सुरवाड करणे । तो नागवला वेदु ह्मणे । ते वेदाचे बोलणे नायके कोणी ॥५२॥ उपजलेनि दिवसदिवसे । देहाते काळु ग्रासीतसे । हें नीच नवे मरण कैसे । देहलोभवशें विसरले ॥ ५३ ॥ ज्याचे त्या देखता कैसा । कालु गिळी वाळवयसा । मग तारुण्याची दशा । मुरडूनि घसा ग्रासी काळ ||५४॥ गिळोनिया तारुण्यपण । आणि वार्धक्य कंपायमान । एसे काळाचे विदान। दुर्धर पूर्ण ब्रह्मादिका ॥५५॥ जयाचेनि चपेटघातें । मरण आणी अमरांतें । म मूर्ख तेये जीवितातें । अक्षय चित्ते दृढ मानिती ॥ ५६ ॥ मूळी देहचि तंव अनित्य । मग तेथींचे भोग काय शाश्वत । परी धन वेंचूनि विषयार्थ । भुलले जाणा भ्रांत स्त्रीलोमें ॥ ५७ ॥ ऐसे नश्वर भोग जगीं। ते भोगावया रिघाचे स्वगी। तदर्थ प्रवर्तती यागी । लागवेगी भोगेच्छा ॥ ५८ ॥ सुख भोगावया वेगीं । पतंगु जेवी उडी घाली आगीं । तेवी इहामुत्रभोगी। पतनालागी पावती ॥ ५९॥ स्त्री आमिप मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण । तेथ केवीं पडे पतन । तें वेदविधान नेणती मूर्ख ॥ २६० ॥ १ यावशेष २ हुगाचे ३ क्सम, कृनिम ४ लाग निष्काम यज्ञयागात पशुहिंगा मुळीच नको,सौनामणिनामक यज्ञात मद्यपान नको, तर पळ मय हुगले पण शालें अम नाथ गणतात हा अकरावा ओक व सारील नाथाची टीका फार महत्वाची माह। ५ वेद विभाग करून हच सागतो ६ खर्च करन ५ फसरे ८ अपेक्षेन, पारणान प्राप्त होतो १. असती ११ सापहनो १२ पाठोपाठ धनाना उपयोग धर्म संपादन करणे हाच होय १३ आमसाक्षात्कारासह हानप्राप्ति होते द्रव्याचा साटा १५ सुख देणे, त्याचे चोचले करणे, त्या शरीराला फार जपणे, १६ील, १७ करणी. १८ चापट मारस्पानामग. २. ऐहिक द पारमाधिक भोगात २१मास २२ मुख्य