Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० एकनाथी भागवत. सर्वथा । स्वप्नी नेणती परमार्था । ते नेणपणेचि तत्वतां । श्रीजगन्नाथा न भजती ॥५५॥ शेळी उसाची चवी गाढी । नेणोनि पाचोळा करेडी । तेवी नेणोनि हरिभक्तीची गोडी । अज्ञाने बापुडी विषयलुब्ध ॥ ५६ ॥ आलोडूनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातेपणे जे पंडित । गर्वे हेलसिती भक्तिपंथ । अतिउन्मत्त ज्ञातृत्वे ॥५७॥ जेवी ज्वरिताचे मुख । दूध मानी कडू विख । तेवीं ज्ञानगवे पंडित देख । ठेले विमुख हरिभजनीं ॥५८॥ यापरी ज्ञानाभिमानी । विमुख झाले हरिभजनी । ते जरी वर्णामाजीं अग्रणी । तरी अधःपतनी पडतील ॥५९॥ हो का वर्णामाजीं अग्रणी । जो विमुख हरिचरणी । त्याहूनि श्वपच श्रेष्ठ मानी । जो भगवजनी प्रेमळु ॥ ६० ॥ आली मुक्त हे मानुनी । जे विमुख भगवद्भजनीं । ते पंचिजती अधःपतनीं । तिर्यग्योनी जन्ममरणे ।। ६१ ॥ मनुष्यदेही जे भजननष्ट । ते होती गा स्थानभ्रष्ट । अधःपाते भोगिती कष्ट । अतिउन्ट यातना ।। ६२ । ज्ञानाभिमाने जे न भजती । ते प्रौढपतनी पचिजती । अज्ञानाही तेचि गती । सर्वथा नृपती ह्मणों नये।।६।। दूरे हरिकथा केचिहरे चाच्युतकीर्तना स्त्रिय शुदाढयचव तेऽनुकम्प्या भवादृशाम् ॥ ४॥ एका पित्याचे दोघे अर्भक । एक प्रबुद्ध एक वाळकं । पित्यासी अवमानितां देख । ताडी जनक प्रबुद्धासी॥६४॥ बाळक पित्याचे माथां चढे । जरी लाता हाणी तयाकडे । तरी त्यासी दोपु न घडे । दोपांचे सांकडे सज्ञानासी ॥ ६५ ॥ ज्ञात्यांपासोनि भजन ठाके । ते कवळिजती महादोखें । अज्ञाने तरती भाविकें। साधुकृपामुखें अनुगृहीता ॥६६॥ अज्ञाना नाही विशेष वाधु । तो साधुविश्वासें होय शुद्ध । ज्ञानाभिमानिया भाव विरुद्ध । यालागी सवद्ध दोप वाधी ।।६७ ॥ अज्ञानी विश्वासें साधु वंदी । ज्ञानाभिमानी दोहोंते निदी। यालागी त्यातें त्रिशुद्धी। अवश्य वाधी अतिदोप ।। ६८ ॥ साधुविश्वासे अज्ञान फिटे । ज्ञानाभिमानिया विकल्प मोठे । त्यासी विश्वास कदा न घटे । अभिमानहठे अधःपात ।। ६९ ॥ एवं विचारिता नेटेपाटें । अहंतेचे बंधन मोटें । अभिमानाऐसें नाही खोटें । दुजे वोखटे त्रिलोकी ॥७०॥ अभिमानु ईश्वरा बाधी । तोही सवळ कीजे सोपाधी । अभिमाने देहबुद्धी । बाधक त्रिशुद्धी सुरनरासी ॥ ७१ ॥ यालागी जे अज्ञान जन । ज्यासी नाहीं ज्ञानाभिमान । तेही विश्वासल्या सपूर्ण । साधु सजन अनुग्रहो करिती ॥ ७२ ॥ ज्यासी ह्मणती नीच वर्ण । स्त्रीशूद्रादि हीन जन ।ज्यासी का दूरी शास्त्रश्रवण ज्यासी दूरी श्रवण वेदोक्त ।। ७३ ॥ त्यांसी जालिया सद्भावो सपूर्ण । ते होतु का हीन जन । परी सतकृपेसी आयतन । विश्वासे पूर्ण अधिकार झाला ।। ७४ ॥ ऐसे पूर्ण भावार्थी । त्यासी तुह्माऐशा साधुसती । अनुग्रहोनि तारिती । कृपामूर्ती कृपालुवा ॥७५॥ अज्ञानी यापरी तरती । परी ज्ञानाभिमान ज्याच्या मतीं । ते ब्रह्मादि कान तरती। त्याचीही स्थिती मुनि सागे ॥७६॥ विप्रो राजन्यवैश्यों चहरे प्राप्ता पदान्तिकम् । श्रौतेन जन्मनास्थापि मुहरयानायवादिन ॥ ५॥ अज्ञान जे नीच वर्ण । भावे धरोनि सतचरण । निजविश्वासे संपूर्ण । जन्ममरण १ चघळते २ मधून, दपढ़न ३ तुच्छ मानतात ४ चांडाळ "निप्रापिधुणयुतादरविन्दनाभपादारविन्द विमुसात् श्वपच वरिष्ठम् ।" (स्कप ७ अध्याय ९) ५ पाविजेति ६ मनुष्याशिवाय इतर पशुपक्ष्यादियाचे जन्म त्यात ७दुसह ८ तान्ह, मेणते, अज्ञ ९ ज्ञान असून भजन न केल्यास दोप अधिक १० सरोसर ११निश्चयान, चागला विचार करिता १२ ऐसें खोट । नाहीं वोसटें १३ वाईट १४ उपाधीसहित १५ करू नये पठण वेदोका १६ पान, स्थान. १७ कृपा करून