Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा. १०९ माजीं निरूपण । अभक्तांची गति लक्षण । युगायुगी पूजाविधान । सांगेल पावन हरीचें ॥ ३४ ॥ अवतारचरितपुरुपाथु । सांगोन संपला चतुर्यु । आतां अभक्तांचा वृत्तातु । राजा पुसतु मुनीसी ॥ ३५ ॥ राजोवाच-भगवन्त हरि प्रायो न भवन्त्यात्मवित्तमा । तैपामशान्तकामाना का निष्ठाऽविजितात्मनाम् ॥ 1 ॥ राजा झणे जी मुनिवरा । जो भगवदजनी पाठिमोरा । ऐशिया अभका नरा । कोण दातारा गति त्यासी ॥ ३६॥ जे कामालागी अतिपट । जे सक्रोध कोधे तेजिष्ठं । जे अतिलोभ लोभिष्ठ । जे परम श्रेष्ठ प्रपची ॥ ३७॥ जे गर्वाचे अग्रगणी । जे अहकाराचे चूडामणी । जे विकाराची प्रवाश्रेणी । जे उघडली साणी विकल्पांची ॥ ३८ ॥ ज्याचे सदुद्धीआड आर्भाळ । महामोहाचे सदा सेवळ । जे छळणार्थी अतिकुगळ । जे अतिप्रवळ प्रैलोभे ॥ ३९ ॥ दिवसा न देखती निश्चिते । ते अधारी देखती दिवाभीते । तेवीं नेणोनि परमायोत । जे अतिज्ञाते प्रपंची ।। ४० ॥ जे नेणती आत्महित । ज्ञान विकूनि कामा पोशित । ऐसेजे का अभकात्यांची गति निश्चित मज सांग ॥४१॥ तुझाऐसे सदुद्धी। चालते बोलाचे उदधी भाग्य लाधली जाननिधी हा प्रश्न त्रिशुद्धी सागावा ॥४॥ राजा साक्षे यहवस । पुसे अभक्तगतिविन्यास । तो सागावया चमस । सावकाश सरसावला॥४३॥ चमस उवाच-मुपवारुपादेभ्य पुरपसाश्रम सह । घवारो जजिरे वर्णा गुणैर्विप्रादय पृथक् ॥ २ ॥ जो का जगाचा जनकु । मुख्य गुरुत्वे तोचि एकु । त्यासी न भजे अविवेकु । तो नाडला लोकु सर्वस्व ॥ ४४ ॥ पुरुषापासूनि जन्मले जाण । चाही आश्रम चान्ही वर्ण । त्याचे उत्पत्तीचे स्थान । ऐक सपूर्ण नृपनाथा ॥४५॥ मुखी वेदविद ब्राह्मण वाह जन्मले राजन्य । ऊरू जन्मले वैश्यवर्ण । चरणी जन्मस्थान शूद्रवर्णा ॥४६॥ मूळी अवघे तिन्ही गुण । गुणयोगें वर्ण जाण । त्रिगुणी चारी वर्ण । जन्मलक्षण घडे कैसे ॥४७॥ सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण । सत्वरजमिनं राजे जाण । रजतमें वैश्यवर्ण | केवळ तमोगुण द्रवर्ण ॥४८॥ क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण । द्विजन्मे हे तिन्ही वर्ण । त्यासी गायत्री वेदाध्ययन । शूद्र ते जाण सस्काररहित ॥ ४९ ॥ ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य । तिहीं वर्णा अवश्य प्राप्त । चहू आश्रमा आश्रयभूत । जाण निश्चित ब्राह्मण ॥ ५० ॥ गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणीं । ब्रह्मचर्य हृदयस्थानी । वक्ष स्थळी वसती वनीं । शिरोमणी "सन्यास ॥ ५१ ।। य एपा पुरप साक्षादात्मप्रभवमीश्वरम् । न भजन्यनजानन्ति स्थानाइदा पतन्त्यध ॥ ३ ॥ हे ब्राह्मणादि वर्ण पहा हो । ज्यापासोनि जन्मप्रभावो। तो न भजतां देवाधिदेवो । उत्तमदेहो अध पाती ।। ५२॥ पूर्वोत्तरमीमासा दोनी । नानाशास्त्रार्थकडसणी । स्वरूप पोलती निर्वचूनी । एवं शब्दज्ञानी अतिचतुर ।। ५३ ॥ यापरी जे पंडित । जानाभिमार्ने अतिउन्मत्त । तेण अभिमानचि येथ । भजनीं निश्चित विमुख केले ॥५४॥ एक अज्ञानी १ गुणलक्षणे २ युगीयुगी ३ भजन ४ आवेशी ५ तेजस्वी ६ पुतळे, प्रमुस ५ प्रवाहाची पक्ति, नदी महामोद्दार ज्याची घुद्धि प्रन्न झाली प्रबळ १. विषयमोहान ११ समुद्र १२ क्षनिय 'माझगोल मुगमासीद्वाह राजन्य कृत । तदम्म यद्वैदय पश्या हो अजायत '-पुरुषसूक १३ राजन्य १४ दो जन, एक सामान्य व दुसर गायत्री मनोपदेशा होत ते द्विजन्मे, द्विज १२ ब्रह्मचर्याश्रम १६ गृहस्थाश्रम १७ प्रबोधिनीकार पुढील वचन स्तात 'गृहाश्रमो जपनतो नाचर्य हदो मम 1 पक्ष सलाहने बामो न्यास शीर्षणि च स्थित" १८ मा प्रकारच्या शास्त्राच्या भानगरी १९ मदन, समजून, अगर भापणात