पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ एकनाथी भागवत नेणसी । कदाकाळेंसी कल्पांती ॥९॥ आपणियां दिधलें दान । यालागी तूं दासांअधीन । मग त्यांचेनि छदें जाण । सर्वस्वे आपण नाचसी ॥ १०॥ बळीने सर्वस्व केले दान । शेखीं तूं झालासी त्याअधीन । त्याचे द्वारपाळपण । अद्यापि आपण चालविसी ॥ ११॥ धर्मे अर्पिले अग्रपूजेसी । शेखी तूं त्याची सेवा करिसी । नाना सकटें स्वये सोशिसी । अगें काढिसी उच्छिष्टें ॥१२॥ तुझा निजभक्त अवऋपी । त्याचे गर्भवास तूं सोगिसी । तुज गौळिये राखिती हपीकेशी। शेखी त्या गोपाळांसी रक्षिसी॥१३॥ एव स्वस्वरूपता द्याययासी। उदारत्व तुजपासीं । हें न ये गा आणिकांसी । हपीकेगी कृपालुवा ॥ १४॥ तो तूं परम उदार ऐसा । राया रका समभावे सरिसा । भावो तेथ भरवसा । तूं आपैसा आतुडसी ॥१५॥ त्या तुझिया प्राप्तीलागी । कपाटें सदा सेविती योगी । एक ते झाले भोगविरागी। एक ते त्यागी सर्वस्वं ॥ १६ ॥ एक हिडती दशदिशे। एक तुजलागी झाले पिसे । परी तुझी भेटी स्वमीही दिसे । ऐसा न दिसे क्षण एक ।। १७ ॥ ऐशियाही तुझी प्राप्ती । सुलभ असे एके रीती । जरी संतचरणी रगती। अतिप्रीती सप्रेम ॥ १८ ॥ सतचरणी जो विनटला । तो निप्राप्तीसी पावला । सतस्वरूप अवतरला । स्वयें सचला परमात्मा ॥ १९ ॥ यालागी जी जो सताची रूपें । ती ती श्रीहरीची स्वरूपें । ह्मणोनि सतांचिये कृपे । अतिसाक्षे अंजावे ॥२०॥ ते ज्ञानार्थीचे परम पिसे । यालागी ग्रथाचेनि मिसें । त्यांचे चरण अनायासे । सावकाशे वंदीन ॥ २१॥ सतकरुणाअवलोकन । ते मज नेत्रीचे अंजन । चरणकृपा पाहतां जाण । श्रीजनार्दन प्रकाशे ॥ २२ ॥ तया जनार्दनाचिये "खेवे । गुरुत्वाचेनि आडनावे । रिघालों निजस्वभावे । जीवेंभावे भजनासी ॥ २३ ॥ भज्य-भजक-भजना । एके अगी त्रिविध भावना । दावूनिया जगजीवना । जनी जनार्दना निजभक्ती ॥ २४ ॥ हे अभेदभक्ती चोखडी । परम ऐक्ये भजनगोडी । अधिकाधिक ढोवढी । चाहे आवडी निजभकां ॥ २५ ॥ देवो आपली सर्वस्वजोडी । वेची भक्ताचिये वोढी । ऐसी अभेदभक्तीची गोडी । पंढिये गाढी गोविदा ॥ २६ ॥ यालागी भक्ताचा शरीरभार । स्वयें वागवी श्रीधर । आपुलेनि अगें पंरपार । पावधी साचार निजभक्ता ॥ २७ ॥ निजभक्ताचा देहभावो । निजांगें वागवी देवाधिदेवो । तरी अभक्ताचा देहो। वागवावया पहा हो काय आन आहे ।। २८ ॥ भक्तां नाही देहअहंता । यालागी देवो वाग. विता । पूर्ण देहाभिमान अभक्ता । त्यासी अतिवद्धता या हेतू ।।२९ ॥यालागी जो निरंभिमान । तोचि भगवद्भक्त सपूर्ण । ज्याच्या अगी देहाभिमान । त्यासी भक्तपण कदा न घडे ॥ ३० ॥ निजभक्त तारिता कौतुकें । त्याची रोमावळी केवीं दुखे । निर्भय करोनि पूर्ण हरिखें । देवो निजसुखें निजभक्ता तारी ॥३१॥ यालागी निरभिमानता । जे विनटले भक्तिपथा ते पावो देवोनि विघ्राचे माथापावती तत्वतां भगवत्पदा ॥३२॥ भक्ताची ऐशी स्थितीतरी अभका कवण गती। तेचि पुसावया नृपती । प्रश्नार्थी प्रवत ॥३३॥ पचमा। १ खत ला २ नादामध्ये ३ राजसूययज्ञप्रसगी धर्मराजान श्रीकृष्णाची प्रथम पूजा केली ४ तुधा गोकुळासी रक्षिले ५ सारसा ६ आपोआप ५ सापडतोस भावापाशी देव सापडतो ८ गुहा । ९ वीतरागी १० सतचरणरज जो भावें स्खशिरी धरितो, तो खखरूप पावतो ११ दीर्घ प्रयन्नानी १२ प्राप्त करून घ्यावे सत आणि भगवत हे एपच आहेत पुढे २६ व्या अध्यायात सागितल आहे -"देवता वाधवा मतः सत आत्माऽहमेव च" १३ आलिंगनामुळे, सेवे १४ हाव १५ चढे. १६ ओढीन, प्रेमाने १७ प्रिय १८ योगक्षेम वाहतो १९ परात्पर चागवी. २० देहानिमान किया देहबुद्धि ज्याची मुदली तेच भक्त सरे २१ लागले २२ पाय