________________
१०० एकनाथी भागवत. नुग्रहसमर्थ । ते सर्वदा कामक्रोधयुक्त । परी नवल तुझें सत्वोचित । केले अंकित कामक्रोध ॥ ३९॥ मज गर्व नाहीं सर्वथा । हेही तुज नाही अहंता । छळवाद्या द्यावी लघुता। अथवा उपेक्षता न करिसी ॥ १४० ॥ पृथ्वी दुःखी करिती नागरी । ते पिकोनि त्यांतें सुखी करी । तेवीं अपकाया जो उपकारी । तो मोक्षाच्या शिरी मुगुटु ॥४१॥ तुजमाजी निर्विकार शाती । हे नवल नव्हे कृपामूर्ती । तुझ्या स्वरूपाची स्थिती । आजि निश्चिती कळली आह्मां ॥ ४२ ॥ तूं निर्गुण निरुपम । मायातीत पूर्ण ब्रह्म । तुझें स्वभावें स्मरतां नाम । सकामाही काम स्पशी न शके ॥ ४३ ।। जो नित्य स्मरे तुझ नाम । त्यासी मी कामचि करी निष्काम । क्रोधचि करी क्रोधा शम । मोहो तो परम प्रबोध होय ॥४४॥ जे धीर वीर निजशांती । ज्यांसी परमानंद नित्य तृप्ती । ऐशियांचिया अमित पंक्ती । पायां लागती तुझिया ॥४५॥ तुज करावया नमस्कारु । पुढे सरसे महासिद्धांचा संभारु । त्यांसही न लभे अवसरु । तूं परात्पर परमात्मा ॥ ४६ ॥ तुझिया सेवकाकडे । विघ्न रिघतां होय बापुडें । तें रिघावया तुजपुढें । कोण्या परिपाडे रिघेल ॥४७॥ स्वा सेवता सुरकृता बहवोऽन्तराया खोको विलय परम प्रजता पद ते । नान्यस्य बर्हि पि बलीन् ददत स्वभागान् धत्ते पद स्वमविता यदि विनमृर्भि ॥१०॥ तापसां बहु विघ्नअपायो । आह्मीं करावा अंतरावो । हा आमुचा निजस्वभावो । नव्हे नवलावो नारायणा ॥४८॥ हृदयींचा गुप्त करोनि काम । बाह्य जप तप भक्तिसंभ्रम । ऐसे जे कां शठ परम । विघ्नाचा आक्रम त्यांवरी चाले ॥४९॥ ते आमची विघ्नस्थिती। न चले तुझिया भक्ताप्रती । तूं रक्षिता भक्तपती । तेथे विघ्नांची गति पराशुख सदा ॥ १५० ।। माझिया निजभक्तांसी । विघ्ने कैंची ह्मणसी त्यासी । ऐक त्याही अभिप्रायासी । सांगेन सुजपासी देवाधिदेवा ॥५१॥ पावावया निजपदातें । लाता हाणून स्वर्गभोगातें। जे नित्य निष्काम भजती तूतें । नाना विनं त्यांते सुरवर रचिती ॥ ५२ ॥ उलंघूनियां आमुतें । हे पावती अच्युतपदातें । यालागी सुरवर त्याते । अतिविघ्नांतें प्रेरिती ॥ ५३ ॥ 4ळी नेदूनि आझांसी । हे जाऊ पाहती पूर्णपदासी । येणे क्षोभे इंद्रादिक त्यापासीं । नाना विघ्नांसी मोकलिती ॥ ५४॥ यालागीं त्याच्या भजनापासीं । विघ्ने छळं धावती आपैसीं । विघ्नीं अभिभव नव्हे त्यासी । तूं हपीकेशी रक्षिता ॥ ५५ ॥ सांडूनि सकाम कल्पना । जे रतले तुझ्या चरणा । त्यास आठही प्रहर जाणा । तूं नारायणा रक्षिसी ॥५६॥ भक्त विघ्नीं होती कासाविसी । धांव धाव ह्मणती हपीकेशी । तेव्हा तू धावण्या धांचसी । निष्ठुर नव्हसी नारायणा ॥५७॥ विघ्न न येतां भक्तांपासी । आधीच भक्त १ सत्व झणजे शाति तिला उचित झणजे योग्य २ अधीन अफित-अक, चिन्ह अथवा मर्यादा घालून दिलेले घालून दिलेल्या मर्यादेचें किया सीमेचे जे उल्लघन करू शकत नाहीत, त्यास अफित झणतात ३ तुच्छन्य ४ उपहास ५ ज्ञानोबा रायानी निर्विकार शातीलाच अनाक्रोश क्षमा दाटर आहे "घेऊनि जळाचे लोट । आलिया नदीनदाचे संघाट । करी वाड प्रोट । समद जेवी ॥ ३५० ॥ तैसें जयाचिया ठायीं । न साहणे काहीच नाहीं ।आणि साइतसें ऐसही । स्मरण नुरे ॥३५१ ॥ तरी ज्ञान गा ते एथें । वोळस तू निरुतें । आक्रोशेंवीण जेथं । क्षमा असे ॥ ३४० ॥” (ज्ञानेश्वरी अध्याय १३) ६मान ७ पुढे भरनो ८ समुदाय, र ९ मोठेपणाने, सामार्ने १० पराक्रम, सत्ता ११ परमात्मस्थितीप्रत, ज्या पदा. पासून च्युति भणजप्रतन नाही से निर्विकार पद नाय की रात In "कामवाणी नव्हे च्युत । यारागी ना तो अच्युत । भोग भोगूनि भोगातीत । कृष्ण पाठवितात १४ पराभव