पान:Samagra Phule.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ५७ ॥ चाल ।। ॥ शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला। ॥क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ।। माते पायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा । आशिर्वाद घेई आईचा॥ आलाबला घेई आवडता होतो जिजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥३॥ - लढे रांगणी विशालगडी घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥ रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥ स्वार तीन हजार घेई थोड्या पायदळास । आला थेट पन्हाळ्यास।। मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केले त्यास ॥ खंडणी घेत गेला भिडला विजापुरास । परत मग आला गडास ।। राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥ सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥ बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥