पान:Samagra Phule.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥ हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस पठाण मुकला प्राणास ॥ स्वामीभक्त धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥ त्याची घोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस 11 दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥ नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥ तान्हाजिला हूल देई मारी हात शिवाजीस। न्याहाळी प्रेती धण्यास ॥ उभयतांसी लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥ छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस । चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास । दुसऱ्या सरंजावास ॥ अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥ वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुया गोपीनाथास ॥ नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाही आनंदास ॥