पान:Samagra Phule.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केले महाग दाण्यास ॥ त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस । कोडिलें गडी फौजेस ॥ चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास । योजना करी उपायास ॥ कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥ पासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥ सिद्दी जोहरा निरोपाने गोंची वचनास । खुशाल गेला भेटीस ॥ वेळ करून गेला उरला नाही आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥ सिद्दीस लाडी गोडी मधीं मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ।। सिद्दया पोटीं खुष्याली जाई झोपी सावकास । हयगय झाली जप्तीस ॥ तो शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥ सिद्दी सकाळी खाई मनी लाडू चुरमुऱ्यास । स्वारदळ लावी पाठीस ॥ चढत होता खींड शिवाजी गांठले त्यास । बंदुका लावी छातीस ॥ बाजीपरभु मुख्य केला टेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥