पान:Samagra Phule.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडी दुसमानास ॥ स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिले पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥ चाकर झालों तुमचा आतां येतो चाकरीस सोडवा माझ्या पित्यास ॥ मोगल थैली गेली थेट मुसलमानास । ठेविले किल्ल्यावर त्यास । बाजी शामराज कां लाजला जात सांगायास । धरूं पाही शिवाजीस ॥ धेड ह्मणावा नाक नाहीं द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ।। सिद्धिस बेत गेला नाहीं अंती भ्याला जिवास । काळे केलें महाडास ।। शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥ करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास॥ वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥ चंद्रराव मोऱ्यास मारी घेई जावळीस । दुसरे वासोट्या किल्ल्यास ॥ प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥ आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलास ॥