Jump to content

पान:Samagra Phule.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा

पुरंधरी जाईं जसा भला माणूस न्यायास ।
कैद पाहा केलें सर्वास ||
गांव इनाम देऊन सर्वां टेबी चाकरीस ।
मारलें नाहीं कोणास ॥
वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास ।
सांठवी राजगडास ॥
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ।
बाकी चार किल्ल्यांस ।।
मावळ्यांस धाडी कोकणी गांव लुटायास ।
धूर्त योजी फितूरास ॥
सन्मान कैयां देई पाठवि वीजापुरास ॥
मुलान्या सुभेदारास ॥
विजापुरीं मुसलमाना झाला बहु बास ।
योजना केली कपटास ॥
करनाटकी पत्र पाठवी बाजी घोरपन्यास।
कैद तुम्ही करा शहाजीस ॥
भोजनाचे निमित्य केलें नेलें भोसल्यास ।
दग्याने कैद केले त्यास ।।
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास ।
खुशी मग झाली यवनास ॥
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास ।
टेविलें भोक वाऱ्यास ॥
शहाजीला पिडा दीली कळले शिवाजीस ।
ऐकूण भ्याला बातमीस ॥
पिताभक्ति मनी लागला शरण जायास ।
विचारी आपल्या स्त्रियेस ।।