पान:Samagra Phule.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय स्नेह यशजी कंकाचा ॥ मित्रां आधीं ठेवी जमाव केला मावळ्याचा ॥ पूर करी हत्यारांचा ।। मोठ्या युक्तिने सर केला किल्ला तोरण्याचा ।। रोवला झेंडा हिंदूचा ।। राजगड नवा बांधला ऊंच डोंगराचा ॥ भ्याला मनीं विजापुराचा ॥ दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।। दादोजी कोंडदेवाचा ।। मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा । पवाडा गातो शिवाजीचा॥ कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा। छत्रपती शिवाजीचा ॥२॥ जाहागीरचा पैसा सार लावी खर्चास । चाकरी टेबी लोकांस ॥ थाप देऊन हाती घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिरंगोजीस ॥ थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास । करामत केली रात्रीस ॥ मुसलमानां लांच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिले त्यास ॥