या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा
५१
॥ चाल ॥
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी॥
बामना ओडी। इंद्रिये तोडी ॥
पीडीस फोडी । देऊळे पाडी ।।
चित्रास तोडी । लेण्यास छेडी।।
गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंड्यात ताडी । जेजुरी गडीं।
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटली खेडीं ।
गडांस वेढी । लावली शीडी।
हिंदुस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देऊळे फोडी। बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी।
बुरखा सोडी । पत्नीस पीडी ॥
गायनी गोडी। थैलीते सोडी ॥
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा ।।
बेत मग केला लढण्याचा ॥
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा ॥