पान:Samagra Phule.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ४९ या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगते मुळी कसें झालें ॥ क्षेत्रवासी ह्मणोन नांव क्षत्रिय धरले । क्षेत्री सुखी राहिले ॥ अन्यदेशिंचे दंगेखोर हिमालयी आले । होते लपून राहिले ॥ पाठीं शत्रुभौती झाडी किती उपासीं मेले । गोमासा भाजून धाले ॥ पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥ लेखणीचा धड शीपाया सेनापति केलें। मुख्य ब्रह्मा नेमलें॥ बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें॥ सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥ मुख्य ब्रम्ह राजा झाला जाने कायदे केले । त्याचे पुढे भेद केले ॥ ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥ महारमांग झाले किती देशोधडी केले। ब्राह्मण चिरंजीव झाले ॥ देश निक्षत्रिय झाल्यामुळे यवना फावलें । सर्वांस त्यांही पिडीलें॥ एच २२ ७