पान:Samagra Phule.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय वडील बंधु संभाजीने लळे पुरवीले । धाकट्यासवें खेळले ॥ उभयतांचे एकचित्त तालमीत गेले । फरीगदग्या शिकले ॥ आवडीने खमकोठी कुस्ती पेंचाने खेळे । शीला पवित्रे दस्तीचे केले ॥ द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें घोडी फिरवू लागले ॥ आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले। गोळी निशाण साधले ॥ कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें। पुत्रा नीट ऐकिवलें ॥ अल्पवयाचे असतां शिकार करूं लागले । माते कौतुक वाटलें ॥ नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीने घेतले ॥ छाती कोट करून सर्व होतें साटिवलें। मुखमुद्रेने फसविले ॥ चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥ पुत्राचे डोळे फिरले मातें भय पडलें। हीत उपदेशा योजिले ॥ मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षाछायी बसीवलें ॥ पूर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळीलें। नेत्री पाणी टपटपलें।