Jump to content

पान:Samagra Phule.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा

४७

पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ॥

॥ चाल ॥

मालोजी राजा । तुबा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ॥
विचरी पक्का । जाधवा धक्का ॥
शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।।
द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ||
देवळें बांधी। तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधी ॥
लिहिलें विधी | लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
सांगोनी गेला । गादी वा तुला ॥
उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा ।
शिपाई होता बाणीचा ॥
खोठ्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा|
छत्रपती शिवाजीचा ॥१॥