Jump to content

पान:Samagra Phule.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६

नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले ।
ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें ।
कुरळे केंस मोघीले ॥
आजानवाहू पायांपेक्षां हात लांबलेले|
चिन्ह गादिचें दिसलें ॥
महात्मा फुले : समग्र वाङ्मय|
जडावाची कड़ीं तोडे सर्व अलंकार केले ।
धाकट्या बाळा लेविवले ॥
किनखाबी टंकोचें मोतीं घोसाने जडले ।
कलावतुचे गोंडे शोभले ॥
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले ।
डाग लाळीचे पडलेले ॥
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे ।
पायीं घुगरुं खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले ।
खेळण्यावर डोळे फिरवले ||
मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें|
चिन्ह पाळणी दिसलें |
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले ।
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले ।
गातों गीत तिनें केलें ॥

॥ चाल ॥

जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं ।
चला वेरुळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥
मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनंदाने गाऊं ।
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ।।